अवकाळी नंतर द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन कसे करावे? Grape Disease Management 2025

Grape Disease Management 2025 द्राक्ष पट्ट्यातील बऱ्याच भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे. या महिन्यातील पडणारा हा 2रा अवकाळी पाऊस आहे. या आधीच्या दोन पावसांमध्ये अनेक भागांमध्ये द्राक्षामद्धे क्रॉकिंगची समस्या उदभवली. त्यामुळे बागायतदार अडचणीत सापडलेला आहे.सांगली जिल्ह्यातील मिरज तासगांव भागात १ ते २ दिवस अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. या परिसरात ५० टक्के भागांची खरड छाटणी झालेली आहे. काही ठिकाणी बाग फुटून 3 ते 4 पाणी किंवा सबकेनची अवस्था सुरू आहे.

Grape Disease Management 2025

Grape Disease Management 2025 या काळातच अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे येथील भागांना मोठा फटका बसला आहे. सतत होणाऱ्या अशा पावसामुळे बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अवस्थेतील द्राक्ष बागांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

उजनी धरणातून 1 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग; धरणात उरला किती पाणीसाठा?

1) या पावसामुळे वातावरण आद्रता वाढताना दिसत आहे. यामुळे नवीन फुटणाऱ्या फुटींवर डाऊनी आणि करपा या रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याला प्रतिबंध म्हणून मॅकोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे त्वरित एक फवारणी करून घ्यावे त्यामुळे नवीन फुटणाऱ्या फुटी निरोगी राहतील.

WhatsApp Group Join Now

2) Grape Disease Management 2025 गारांच्या मारामुळे काड्या तुटलेल्या असल्यास, जागेच्या एक डोळा खाली येऊन काडीचा तुटलेला भाग कापून मुख्य वेलीपासून वेगळा करावा. यामुळे सुव्यवस्थेत असलेल्या लगतच्या डोळ्यामधून नवीन फूट निघण्यास मदत होईल.

3) वादळी वाऱ्यामुळे कोवळ्या असणाऱ्या काड्या पूर्णपणे तळापासून तुटलेल्या आढळून येतात. अशा तुटलेल्या कोवळ्या काड्या लागलीच काढून टाकाव्यात. यामुळे ओलांड्यावर व काड्यांमध्ये हवा खेळती राहील.

तुटलेल्या काड्यांमुळे अन्य काड्यांवर होणारा रोगाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळता येईल. अशा काढलेल्या काड्या बागेबाहेर दूर नेऊन टाकाव्यात किंवा बागेत खंडा करून पुराव्यात.

4) सबकेन तयार होत असल्यास कॉपरयुक्त बुरशीनाशकांची एक फवारणी करून घ्यावी. कॉपरऑक्सक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कॉपर हायड्रॉक्साइड एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे डाऊनी आणि करप्याचा बाजारभाव प्रादुर्भाव टाळता येईल.

WhatsApp Group Join Now

5) द्राक्ष बागेमध्ये आद्रता वाढलेली असल्यामुळे ट्रायको वाइनगार्ड 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे ट्रायकोड्रमच्या दोन फवारण्या फायद्याच्या ठरतील. जमिनीमध्ये असलेल्या बुरशीचे बीजाणू नष्ट करण्यासाठी ट्रायको शक्ती (भुकटी) 10 ग्रॅम प्रति एकर या दराने ठिबकद्वारे द्यावे.

ट्रायकोड्रम ही बुरशी रोगकारक बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. त्यामुळे रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन व जीवनसत्वांची कमतरता निर्माण होऊन त्याची वाढ खुंटते.

6) खरड छाटणी झालेल्या बागांमध्ये एक टक्का बोर्डो मिश्रणाच्या एक किंवा दोन फवारण्या करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटींच्या वाढीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.

1 % बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत (1:1:100) : 1 किलो कळीचा चुना व 1 किलो मोरचूद वेगवेगळ्या धातुरहित भांड्यात घ्यावे. त्यात थोडे पाणी मिसळून त्याचे वेगवेगळे द्रावण तयार करावे. प्रथम चुन्याची निवळी गाळून स्वतंत्र भांड्यात ठेवावी.

दोन्ही द्रावणे एकत्र करण्यासाठी प्लास्टिक किंवा सिमेंट टाकीचा वापर करावा. दोन्ही द्रावणे एकत्र मिसळताना द्रावणी काठीच्या सहाय्याने सारखी ढवळत राहावीत. या तयार होणाऱ्या मिश्रणाचा सामू (पीएच) उदासीन म्हणजेच 7 इतका असावा.

मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकांना अपाय होतो. म्हणून मिश्रणाची तपासणी करण्यासाठी निळा लिटमस पेपरचा वापर करावा. लिटमस पेपर द्रावणात बुडवल्यानंतर पेपरचा रंग जर लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद असून ते आम्लधर्मी झाल्याने फवारणीस अयोग्य समजावे. अशावेळी त्या मिश्रणात थोडी थोडी चुन्याची निवळी घालून पेपर निळा होईपर्यंत ढवळावे.

Grape Disease Management 2025 बोर्डो मिश्रण तयार करतेवेळी घ्यावयाची काळजी

  • बोर्डो मिश्रण तयार करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये.
  • मिश्रणाचे द्रावण फवारणी पर्यंत प्लास्टिक ड्रम मध्ये साठवावे.
  • दोन अलग द्रावणी मिसळताना थंड करावीत.
  • पावसाळी वातावरण असताना फवारणी करणार असाल तर चिकट द्रव्यांचा वापर करावा.
  • द्रावण तयार करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरावे क्षारयुक्त पाणी वापरू नये.
  • विरी गेलेला चुना वापरू नये.
  • मिश्रण ढवळायला लाकडी किंवा प्लास्टिक काठीचा वापर करावा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment