Grape Cultivation 2025 वनस्पती शास्त्राच्या शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार द्राक्ष फळपिकाचे दोन उगमस्थानचे भाग आहेत. अमेरिकन द्राक्षांमध्ये वेटिस लॅब्रुस्का आणि मस्कादिनिया यांचे उगमस्थान उत्तर अमेरिकाचा भाग आहे की, ज्या भागांमध्ये प्रचंड प्रमाणावर द्राक्ष पिकातील वेटिस या कुळातील प्रजातींचा आढळ आहे.

दुसऱ्या उगम स्थानाप्रमाणे युरोपियन द्राक्ष प्रथमता काऊकॅकस या कॅस्पियन आणि ब्लॉक सी दोन्ही ठिकाणाच्या मधील भागात आढळत आहेत. आणि याच प्रजातीचे दुय्यम अढळस्थान उत्तर पश्चिम हिमालयीन भाग दक्षिण युरोप आणि पश्चिम आशिया भागात आहे.
हळद पिक नियोजन!!
द्राक्ष घटक: Grape Cultivation 2025
द्राक्ष फळाच्या प्रकाराला वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या बेरीज म्हटले जाते. या प्रकारांमध्ये बियाविहिरीत आणि बियायुक्त जातींचा समावेश होतो. द्राक्ष मण्यांमध्ये 5-12 % मन्याच्या सालीने (आवरण) व्यापलेला असतो. जर बेरीज मनी बियायुक्त जातींच्या असतील तर त्यामध्ये 5 ते 8 % टॅनिन हा घटक असतो. द्राक्ष फळ हे उत्तेजित करणारे असून या फळांमध्ये 15 % पर्यंत शर्करायुक्त घटके असतात. 0.5 ते 0.6 % पर्यंत खनिजुक्त घटक आणि 0.3 ते 1.5 % पर्यंत सेंद्रिय आम्लयुक्त घटक असतात. यामध्ये 90% पर्यंत टार्टरीक आणि मॅलिक आम्ल असते.

द्राक्षमण्यांमध्ये ऑक्सिडायझिंग विकरे असतात. यामध्ये प्रामुख्याने पॉलिफिनॉल, ऑक्सिडेज, फिनॉलेज, फॉस्फेटेज, प्रोटियेनीज, आणि सुक्रेज प्रामुख्याने मण्यांच्या बाह्य आवरणात देखील टॅनीनयुक्त घटके असल्यामुळे चवदारपणा वाढतो द्राक्ष मानाचा रंग लाल, निळा, जांभळा आणि काळा अशा रंगयुक्त छटा असलेला असतो. कारण या मण्यांमध्ये अनेक प्रकारचे घटक ऍंन्थोसायनिन्स असतात. द्राक्ष मण्यांना पक्वतेच्या वेळी मिथाईल अन्थरीणीलेटमुळे मस्कत प्रकारचा सुगंध येतो.
द्राक्ष वेलवर्गीय फळपीक आहे. द्राक्ष शेती करण्यासाठी खालील गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
जमीन आणि हवामान:
द्राक्ष बागेसाठी योग्य पाण्याचा निचरा होणारी, रेती मिश्रित, पोयटायुक्त परंतु चांगल्या जलधारणा असलेल्या जमिनीची गरज असते. जमिनीचा सामू साधारणतः 6.7 ते 7.5 च्या दरम्यान, हवा कमी अधिक प्रमाणात क्षरांचे प्रमाण सहन केले जाऊ शकते. परंतु जास्त प्रमाणात मुक्त स्वरूपातील सोडियम आणि कॅल्शियम फळबागेसाठी व द्राक्ष वेलींच्या वाढीसाठी घातक ठरते. जमिनीची विद्युत वाहकता 4 मिली मोह/मी पेक्षा जास्त नसावी आणि वीनियमित सोडियमचे प्रमाण 15 % पेक्षा कमी हवे.
द्राक्षवेली क्षारयुक्त जमिनीत वाढवण्यास संवेदनशील आहे. परंतु, क्षारयुक्त जमिनीला प्रतिकार करणारे अनेक खुंट उपलब्ध आहेत. उदा. डीग्रेसेट, डॉगरीज, साल्ट, क्रिक, इत्यादी. खुंटाचा वापर करून द्राक्षवेलीची अभिवृद्धी केली जाते.
हवामान: Grape Cultivation 2025
द्राक्ष पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान गरजेचे असते थंड प्रदेशांमध्ये तसेच हिवाळ्यामध्ये द्राक्ष वेलीला कमीत कमी 6 दिवसांसाठी विश्रांतीची गरज असते. यावेळी दैनंदिन सरासरी तापमान 100 सेल्सिअसच्या खाली असावे लागते. उत्तर भारतामध्ये हिवाळ्यामध्ये द्राक्ष वेली नैसर्गिक रित्या सुक्ताअवस्थेत जातात. परंतु समतोष्ण आणि शितोषण भागामध्ये द्राक्ष वेली सलग खंड न पडता शाकीय वाढीत असतात.
निष्प्रभ सूर्यकिरणांमुळे मण्यांमध्ये शर्करायुक्त घटकांचे प्रमाण वाढते. द्राक्ष मण्यांची पक्वता आणि वाढ डिग्री दिवसांवर अवलंबून असते. यास हीट युनिट समेशन असे म्हटले जाते. हिट युनिट समेशन म्हणजे द्राक्ष वेली मध्ये फुलोराअवस्था येते. तेव्हापासून मनांच्या पक्वतेपर्यंतच्या काळात निश्चित केली जाते. विविध प्रकारच्या जातीनुसार द्राक्षवेलींच्या हिट युनिट समेशन साठी 1600-3500 डिग्री डेज दिवसांची गरज असते.
अभिवृद्धी: Grape Cultivation 2025
द्राक्षवेलींचे अभिवृद्धी स्वमुळावरची व खुंटावरची लागवड पद्धतीने केली जाते. खुंटावरची लागवड करण्यासाठी योग्य त्या खुंटाचे जानेवारीमध्ये लागवड करून सप्टेंबर महिन्यात 45-60 सेमी उंचीवर चांगल्या जातीचे पाचर कलम करावे.

लागवड अंतर:
3*1.5 मी 3*3 मी 4*3 मी इ द्राक्षवेलीच्या वाणाच्या गुणधर्मानुसार व वळण देण्याच्या पद्धतीनुसार निश्तित करावे द्राक्ष लागवड करण्यासाठी साधरणतः 75*120 सेमी. किंवा 100*100 सेमी चे खड्डे खोदावेत. खड्ड्यांमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आल्ड्रिन ची डस्टिंग करावी. 1*1 मी चे खोदलेले खड्डे 3:2:1 या प्रमाणात सुपीक जमिनीतील माती, रेती आणि पूर्णतः कुजलेले सेंद्रिय खतांनी भरून घ्यावेत. आणि खड्ड्यातील घटकांना एकसंघ होण्यासाठी पाणी सोडावे. पाणी देण्याच्या आधी प्रती खड्ड्यांमध्ये 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 0.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश टाकावे.
नंतर त्या खड्ड्यांमध्ये स्वमुळावरची किंवा खुंटावरची लागवड करावी. साधारणता: 20-30 सेमी लांबी असलेली आणि 3-4 डोळे असलेली फाटेकलम काडी लागवडीसाठी वापरावी. फाटे कलमासाठी आय.बी.ए. 500 पीपीएम या संजीवकाची प्रक्रिया करावी या संजीवकामुळे 90% मुळे फुटण्यास मदत होते. असे मुळे फुटलेले 3 ते 4 महिन्यांचे कटिंग मोसमी हवामानाच्या वेळी लावले जातात.
वळण व छाटणी:
द्राक्ष ही वेलवर्गीय असल्यामुळे वळण देणे गरजेचे असते द्राक्ष वेलीच्या योग्य वाढीसाठी आणि द्राक्ष शेतीमध्ये निविष्ठांचा वापर करण्यासाठी उदा. पीक संरक्षण, छाटणी काढणी व त्यांचा खर्च कमीत कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या वळन देण्याच्या पद्धती अवलंबल्या जातात. वळण देण्याच्या पद्धती या वेलीची वाढ जाती गुणधर्म मण्यांची धारण क्षमता सूर्यकिरणांमुळे मण्यांचे इजाळण्याचे प्रमाण तसेच द्राक्ष बागायतीदारांची पैसे गुंतवण्याची क्षमता या बाबींवर अवलंबून असते. प्रामुख्याने द्राक्ष वेलींसाठी हेड, निफिन, ओव्हरहेड ट्रेलिस वाय पद्धत आणि मंडप वळण पद्धतींचा अवलंब केला जातो.
हेड पद्धत: Grape Cultivation 2025
हेड पद्धत ही सोयीस्कर व कमी खर्चिक आहे या पद्धतीचा वापर सघन लागवडीसाठी केला जातो. विशेषतः ही पद्धत कमी वाढ क्षमता असलेल्या वाणांसाठी योग्य आहे ज्या वाणांमध्ये बेसल डोळ्यांपासून कार्यक्षम शूट्स ची निर्मिती होते. हेड पद्धतीमध्ये नवीन लागवड केलेल्या वेलींची एकाच वाणांमध्ये शेंड्याच्या अग्रणी भागास वाढू दिले जाते. वेळोवेळी ऑक्सिलरी शूटची तोडणी केली जाते. एकाच वेळी खोडाला वाढण्यासाठी बाबुंचा आधार दिला जातो.
ज्यावेळेस मुख्य खोड्याचा अग्रणी शेंडा 1.2 मी. उंचीवर गेलेला असतो, त्यावेळेस अग्रणी शेंडा खुडला जाऊन बाह्य शूट्सची वाढ होण्यासाठी वेलींची वाढ होऊ दिली जाते. साधारणता 75 cm वर जमिनीपासून 4 दिशेला 4 लॅटरल फांद्या वाढू दिल्या जातात व इतर फांद्या कट केल्या जातात. नंतर प्रत्येकी 4 फांद्यांपासून दोन उपफांद्या वाढू दिल्या जातात. या वळण पद्धतीचा आकार हा बुश प्रकारचा आहे.
कोर्डोन पद्धत:
या वळण पद्धतीमध्ये 1-2 फांद्या शाखा समांतर पद्धतीने मुख्य खोडाला काटकोनात वाढू दिल्या जातात. समांतर फांद्यांची वाढ होण्यासाठी तारेचा वापर केला जातो.
ओहर हेड ट्रेलीस:
मध्यम प्रकारच्या वाढव क्षमता असलेल्या द्राक्ष जातींसाठी या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आहे प्रा. कोपालकृष्णन यांनी 1960 मध्ये पुणे येथे या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीमध्ये वेली 150 ते 160 सेमी पर्यंत सरळ वाढू दिली जाते. नंतर 45-60 सेमी अंतराच्या दरम्यान मुख्य खोडाला काटकोनात समांतर दिशेने 3 ते 5 बाहुंवर वाढू दिले जाते. जास्त तापमानाच्या भागांमध्ये या वळण पद्धतीचा फायदा होतो.
मंडप पद्धत:
या पद्धतीमध्ये द्राक्ष वेली 2-2.5 मीटर उंचीपर्यंत वाढवली जाते आणि नंतर बाह्य फांद्या या काँक्रीट किंवा लाकडी पोलवर ताणलेल्या समांतर क्रिस क्रॉस तारेच्या जाळीवरती वाढू दिल्या जातात. मुख्य वेलीचा खोडाचा अग्र भाग हा मंडप पद्धतीच्या उंचीपर्यंत पोहोचताच कट केला जातो. जेणेकरून आजूबाजूच्या फांद्यांची निर्मिती होईल.
प्रथमता: विरुद्ध दिशेने दोन प्राथमिक बाहू वाढू दिल्या जातात व नंतर प्रत्येकीवर 60 सेमी अंतराने 3 3 लॅटरल विकसित होतात. त्याचा दुय्यम उपफांद्या म्हटले जाते. अशा प्रकारे 12 दुय्यम प्रत्येक बाहू वेलीवर असतात. तृतीय उपफांद्या 8 ते 10 संख्येने सेकंडरी आर्म्सवर वाढू दिल्या जातात. या तृतीय आर्म्स परिपक्व झाल्यानंतर द्राक्षमणी धारक कार्यक्षम काडी विकसित करतात. मंडप वळण पद्धत सर्व उंच द्राक्ष जातींसाठी उपयुक्त आहे. प्रामुख्याने जगातील समतोष्ण आणि उष्ण कटिबंधात या पद्धतींचा अवलंब केला जातो. कारण या वातावरणात द्राक्ष वेलींमध्ये अपीकल डॉमिनन्स आढळतो.

छाटणी आणि गुणवत्तेशीर द्राक्ष निर्मिती:
द्राक्षवेलींच्या काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्मघड निर्मित होण्यासाठी एप्रिल खरड छाटणी महत्वाची असते. एप्रिल छाटणीनंतर 7 पानांवर गरजेनुसार सबकेन करावी. ऑक्टोबर महिन्यांमध्ये द्राक्षाच्या काडीमधून घड बाहेर पडण्यासाठी ऑक्टोबर छाटणी करावी. प्रति वेलीवर 35-40 निर्धारित करणे आवश्यक असते.
द्राक्षवेलीमध्ये ऑक्टोबर गोडी छाटणी केल्यानंतर 7-12 दिवसात डोळे फुटण्यास सुरुवात होते. गोडी छाटणी केल्यानंतर 3-4 डोळ्यांवर काडीला हायड्रोजन सायनाईड 30 ते 40 मिली/ लिटर या प्रमाणात गेरुमध्ये मिश्रित करून कापडाने चोळावे.
गुणवत्ता द्राक्ष निर्मिती:
शेंडा विरळणी : जसे घड बाहेर पडण्यास सुरुवात होते तशी तत्परतेने शेंडा विरळणी करावी.
पर्णक्षेत्राची गरज : पाने ही विकसित होणाऱ्या घडांचे मुख्य अन्नस्त्रोत आहेत. सरासरी मण्यांच्या आकारांसाठी 16 ते 17 पानांची शूटवर आवश्यकता असते. शूटची वाढ होण्यास प्रारंभ होतात तिसऱ्या पानाच्या जवळ घडाची निर्मिती होते. याप्रमाणे एका वेलीवर 80 ते 100 घड नियंत्रित करू शकतो. सर्वच्या सर्व घडांची जोपासना केली तर निर्यातक्षम गुणवत्तेची घड तयार होणे शक्य नाही. म्हणूनच घडांची विरळणी ही प्राथमिक फुलोरा अवस्थेत करावी, जेणेकरून सिंक व अन्नसाठवणूक, शेंडावाढ व घड या काळात नियंत्रित करता येते. शेंडावाढ व घडांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काडीच्या व्यासाचा व वेलीच्या लागवडीच्या अंतराचा विचार करावा.
काडीची जाडी (मी. मी.) | घड धारण केलेले शेंडे संख्या | घड धारण न केलेले शेंडे | घडांची संख्या किती ठेवावी |
6.00 | 1 | – | 1 |
6-8 | 1 | 1 | 1 |
8-10 | 2 | 1 | 2 |
7-10 | 3 | 2 | 3 |
घडांची विरळणी:
मणी चांगले पोसण्यासाठी व घड मोकळा भरण्यासाठी आणि ममीफिकेशन टाळण्यासाठी घडांची विरळणी करावी. घडांची वेळ आणि हातांनी तोडून करता येते किंवा घड फुलवराच्या आधी 10 ते 20 पीपीएम जीए च्या द्रावणात बुडवून करता येते. आणि 1/4 घडाचा शेंडा कापणे अधिक फायद्याचे ठरते.
मण्यांचा आकार वाढवणे:
मण्यांचा आकार वाढवण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करावा.
वाढीची अवस्था | संजीवकाची मात्रा | उद्देश |
पोपटी-हिरवट रंगाचा घड | जी ए 10 | मण्यांचा आकार वाढ |
पहिला फवारणी नंतर 3-4 दिवसांनी फवारणी | जी ए 15 | रॅचिसची लांबी वाढणे |
दुसऱ्या फवारणीनंतर 3-4 दिवसांनी | जी ए 20 | रॅचिसची लांबी वाढणे |
3 -4 मीमी मण्यांची झाडे जाडी | जी ए 40 + सीपीयू 12 पिपीएम | मण्यांचा विकास |
6 ते 7 मीमी मण्यांची जाडी | जी ए 30 + सीपीयू 1 पिपीएम | मण्यांचा विकास |
जी ए द्रावणाची डिपींग:
साधारणपणे डिपींग दोन वेळा केली जाते. पहिल्या डिपींग 10 पीपीएम जी ए ने प्रीब्लूम अवस्थेत करतात तर दुसरे डिपींग 50 पीपीएम चे पोस्ट ब्लूम अवस्थेत करतात.

खत व्यवस्थापन (प्रती हेक्टरी मात्रा):
एप्रिल छाटणी नंतर 500 किलो नत्र 250 किलो स्फुरद 300 किलो पालाश या खतांची मात्रा छाठणीनंतर 15, 30 व 45 दिवसांनी क्रमशः द्यावी. तसेच ऑक्टोबर छाटणीनंतर 250 कि स्फुरद द्यावे. व छाटणीनंतर 15 दिवसांनी 15 पालाश द्यावे. मण्यांमध्ये पाणी उतरण्याचे वेळी 260 कि. पालाश द्यावे.
द्राक्ष मण्यांची काढणी:
द्राक्ष मण्यांची काढणी करण्यासाठी पूर्ण पक्व मण्यांच्या गुणधर्म मापदंडाचा अवलंब करावा. मण्यांवर मेनयुक्त चमकदार आकर्षकपणा आलेला असावा. घडांपासून मण्यांची सहजपणे सूट झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा द्राक्ष मन्याच्या काढणीचा मापदंड म्हणजे मण्यांचा टी एस एस 18-200 ब्रिक्स असणे आवश्यक आहे. द्राक्ष मण्यांच्या एकसंघ रंग निर्मितीसाठी आणि काढण्यासाठी व एकसंघ पकवतेसाठी 250 पीपीएमची फवारणी करावी. शर्करा व आम्लपनाचे गुणोत्तर हे 27 व 38 च्या दरम्यान असावे.
उत्पादन:Grape Cultivation 2025
भारतातील द्राक्ष बागेचे सरासरी उत्पादन 21.5 टन/ हेक्टरी आहे. द्राक्षबागेचे सरासरी आयुष्यमान 20 वर्ष आहे. सर्वसाधारणपणे जवळपास 6 ते 10 टन /हेक्टरी द्राक्ष उत्पादन हे द्राक्ष बागेची योग्य प्रकारे निगा ठेवून घेतले जाते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |