Gram Seeds 2025 नाशिक: जिल्हा परिषद सेस फंड योजना सण 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी 50 टक्के अनुदावर एकूण 141.40 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

या योजनेच्या अटी व शर्थी अशा:
Gram Seeds 2025 प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभार्थी निवड करून हरभरा या पिकाची लागवड करणाऱ्या इच्छुक सर्व शेतकऱ्यांना 50 तक्के अनुदानावर हंगाम सुरु होण्यापूर्वी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज विहित नमुन्यात पंचायत समिती कार्यालयात सादर करावा.
कांद्याच्या सुधारित जाती!!
Gram Seeds 2025 अर्जासमवेत स्वतःच्या कुटूंबाच्या नावे असलेला सातबारा व आठ ‘अ’ चे अद्यावयत उतारे सादर करावेत. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त एक हेक्टरसाठी बियाणांचा लाभ देण्यात येईल. लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना दुबार लाभ दिला जाणार नाही.

Gram Seeds 2025 त्यानुसार दर असे:
20 किलोची बॅग, 2260 रुपये दर, 1130 रुपयांचे अनुदान, म्हणजेच शेतकऱ्याला 1130 रुपये या दराने हरभरा बियाणे मिळेल. असेही जिल्हा कृषी विकास अधिकारी, नाशिक यांनी कळवले आहे.
Gram Seeds 2025 या योजनेसाठी आवश्यक बियाणे हा महारष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, सातपूर, नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे खरेदी करून पुरविण्यात येईल. 50 टक्के अनुदानावर हरभरा बियाणे देण्यात येईल.
वजा जाता 50 टक्के वसूल करावयाची रक्कम गटस्तरावर बियाणे वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल करून पुरवठा संस्थेला नावे डीडी/धनादेश काढून या कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |