हरभरा उत्पादन वाढीचे सुधारित तंत्र!! Gram Production 2025

Gram Production 2025 रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक पीक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. त्याच्या त्या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाट 17 टक्के आहे.

Gram Production 2025

जमीन: हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी हलकी अथवा भरड, पाणथळ चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.

राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी, बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा? 

पूर्वमशागत: खरिपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळव्याच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरिपामध्ये शेतात हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे याप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

WhatsApp Group Join Now

पेरणीची वेळ: Gram Production 2025

हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडे व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणा नंतर म्हणजे 25 सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय आणि दिग्विजय हे वाण वापरावेत. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर यादरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.

सुधारित वाण: Gram Production 2025

चाफा, अन्नेगिरी असे जुने वान रोगाला बळी पडतात. म्हणून जुन्या अथवा स्थानिक वाण न वापरता सुधारित वाण वापरावे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, हे वान मर रोगास प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत, तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, विहार, पी.के.व्ही.-2, पी.के.व्ही.-4 आणि कृपा हे वाण आधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय आणि दिग्विजय हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास चांगला प्रतिसाद देतात. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वान अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे.

पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:

सामन्यतः देशी हरभऱ्याची पेरणी पभरणीने किंवा तीफनी ने करावी. दोन ओळीतील अंतर 30 सेमी व दोन रोपातील 10 सेमी अंतरावर टोकन होईल असे ट्रॅक्टरवर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे अधिक चांगले. या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्टरी 65 ते 70 किलो तर विशाल, दिग्विजय, विराट या वाणांचे हेक्टरी 100 किलो बियाणे लागते.

हरभरा सरीवरंब्यावरही चांगला येतो. भारी जमिनीत 90 सेमी रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंबाच्या दोन्ही बाजूला 10 सेमी अंतरावर एक बियाणे टोकावी. वे काबूली वानासाठी जमीन ओली करून वाफश्यावर पेरणी केले असता उगवण चांगली होते.

WhatsApp Group Join Now

बीजप्रक्रिया: Gram Production 2025

पेरणीपूर्वी प्रतिक्रिया प्रति किलो बियाणास 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम बाविस्टीम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकांचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात. आणि पिकांची वाढ चांगली होते.

खतमात्रा: Gram Production 2025

हरभऱ्याचा हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश खतांची आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी 125 किलो डीएपी आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियानालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पभरणीने पेरून घ्यावे. पीक फुलोऱ्यात असताना आणि घोटे भरण्याच्या अवस्थेमध्ये 2 टक्के युरियाची फवारणी करावी.

आंतरमशागत: Gram Production 2025

पिकांच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तनविहरित ठेवावे. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते. कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणी मुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते.

तण नियंत्रणासाठी तणनाशके वापरावयाचे असल्यास पेरणी करताना पेंडीमेथिलिन हे तणनाशक 2.5 लिटर प्रति हेक्टर प्रमाणे 500 लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

पाणी व्यवस्थापन:

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागतच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेतीची राणबांधणी करताना दोन सऱ्यांतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी. म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते.

मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोन पाया पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी व दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी यावे.

हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 से.मी. पाणी लागते प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याच्या धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आत पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा मूळ कुजव्या रोगाने आणि पिकाचे नुकसान होते.

पीक संरक्षण: Gram Production 2025

हरभरा पिकांचे घाटे अळीमुळे 30 ते 40% नुकसान होते. पीक 3 आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानावरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. यावेळी निंबोळी अर्क 5 टक्के द्रावणाची एक फवारणी घ्यावी. याकरिता पिकास फुल कळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी 5 किलो निंबोळी पावडर रात्रभर 10 लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये 90 लिटर पाणी टाकावे. असे द्रावण 20 गुंठे क्षेत्रावर फवारावे.

पुढे 10 ते 15 दिवसांनी हेलियॉकिल 500 ml 500 लिटर पाण्यातून प्रती हेक्टर या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी 20% प्रवाही रानोक्झिपीर 90 मिली अथवा 48 टक्के प्रवाही फायबेण्डमाईड 125 मिली प्रति हेक्टरला 500 लिटर पाण्यातून फवारावे. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 200 ग्रॅम ज्वारी, शेतामध्ये पेरावी.

या पिकांचा मित्रकिडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो. त्यामुळे घाटे अळीचे नियंत्रण होते. पक्षांना बसण्यास जागोजागी तूर काटक्याची मचाण लावावी. त्यावर कोळसा चिमण्या साळुंख्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात हेक्टरी 5 फेरोमन सापळे लावावेत त्यामुळे किडींचे नेमके प्रमाण कळते आणि फवारण्या देणे योग्य ठरते.

काढणी: Gram Production 2025

110 ते 120 दिवसांमध्ये हरभरा पिक तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास 6 ते 7 दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा त्यामध्ये कडुलिंबाचा पाला 5 टक्के टाकावा त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.

उत्पादन: Gram Production 2025

अशाप्रकारे सुधारित वाण आणि तंत्रज्ञान वापर करून हरभऱ्याची शेती केल्यास सरासरी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment