उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर; Gotha Niyojan 2025

Gotha Niyojan 2025 उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आहार, निवारा, आरोग्य व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

Gotha Niyojan 2025

रोजच्या दुधाचे प्रमाण व दुधाची प्रत टिकून राहील. सध्या उन्हाळी हंगाम असून काही ठिकाणी उष्मा खूप वाढला आहे अशावेळी जनावरांना गोठ्यात सुसह्य वाटावे यासाठी पशुपालन शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात.

मोठी बातमी; शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, 

Gotha Niyojan 2025 पशुपालन उपायोजना

  • उन्हाळ्यात जनावरांना हवेशीर गोठ्यात किंवा झाडाच्या दाट सावलीखाली बांधावे.
  • गोठ्याची उंची भरपूर असावी जेणेकरून गोठ्यात मोकळी हवा राहील.
  • गोठ्याच्या छतासाठी सिमेंटचे पत्रे असणे केव्हाही चांगलेच, स्टीलचे पत्र असतील तर त्यावर गवत अंथरावे. गोठ्याचा रंग पांढरा असावा.

WhatsApp Group Join Now
  • गोठ्याभोवती दाट सावली देणारी झाडे लावावीत, त्यामुळे उन्हाळ्यातील गरम वाऱ्यापासून जनावरांचे संरक्षण होईल.
  • जनावरांना गोठ्यात दाटीवाटीने बांधू नये, त्यांना सर्व हालचाली आरामशीरपणे करता याव्यात याची काळजी घ्यावी.
  • जास्त उष्णता असल्यास गोठ्यामध्ये पंखे, शॉवर्स यांचा वापर करता येईल.
  • तापमान वाढल्यास छतावर पसरलेल्या गवतावर पाणी शिंपडावे. गोठ्याच्या खिडक्यांना बारदाना बांधून तो पाणी शिंपडून ओला ठेवावा.
  • चाऱ्याकरिता गव्हाणीचाच वापर करावा जेणेकरून चारा खराब होणार नाही.
  • Gotha Niyojan 2025 गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी करू नये.
  • जनावरांना चाऱ्याबरोबर गोठ्यात 24 तास स्वच्छ व ताजे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.
  • टंचाईच्या काळात त्यांना भरपूर पाणी पाजावे. साधारणपणे जनावरांना 40 ते 50 लिटर पाणी दररोज पिण्यासाठी लागते पिण्यासाठी लागते.
  • तसेच दुधाळ जनावरांना 1 लिटर दूध तयार होण्यासाठी अतिरिक्त 4 लिटर पाण्याची गरज असते. त्यानुसार जनावरांचे पाणी व्यवस्थापन करावे.
  • उन्हाळ्यात गोचीड, उवा यासारखे बाह्यपरोपजीवीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यासाठी जनावरांच्या अंगावर व गोठ्यात कीटकनाशकाची फवारणी करावी.

पशुपालकांनी उन्हाळ्यात हवेशीर गोठा, मुबलक हिरवा चारा, खुरकाचे नियोजन, स्वच्छ पाणीपुरवठा या बाबींचा अवलंब करावा. जेणेकरून दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन टिकून राहते तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहील.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment