Ghewda Cultivation 2025 घेवडा पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे आणि हमी बाजारभाव देणारे असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या पिकाच्या हिरव्या शेंगाचा उपयोग भाजीपाल्यासाठी तसेच वाळलेल्या दाण्यांचा उसळीसाठी उपयोग होतो. महाराष्ट्र मध्ये घेवड्याची लागवड खरीप हंगामात प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हमखास पाऊस पडणारा तालुक्यात केले जाते.

Ghewda Cultivation 2025 हे पीक खरीप तसेच काही प्रमाणात रब्बी हंगामात घेतले जाते. हलक्या ते मध्यम प्रतीच्या पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते. शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. घेवड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाणात 23 ते 28 टक्के असून पिष्टमय पदार्थ 61 टक्के असल्याने आहारात विशेष महत्त्व आहे.
सततच्या पावसामुळे कापूस पिकावर ‘मर’ रोगाची शक्यता; त्यासाठीचे उपाय!!
Ghewda Cultivation 2025 महाराष्ट्र मध्ये सुरुवातीला प्रचलित स्थानिक वाण वाघ्या मोठ्या प्रमाणात वाळविलेल्या दाण्यासाठी घेतला जात होता. परंतु या वाणापेक्षा अधिक उत्पादन आणि बाजारभाव मिळवून देणारा वरून हा वाण मूफुकृवि राहुल अंतर्गत, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड पुणे, येथून प्रसारित करण्यात आला असून, त्याचे उत्पादन क्षमता (18 ते 20 किं/ हे )असल्याने पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच हे पीक कमी कालावधीचे 75 ते 80 दिवस असल्याने विविध पीक पद्धतीमध्ये सुद्धा पुरेसा वाव मिळू शकतो.

घेवड्याच्या 100 ग्रॅम वाळलेल्या बियांमध्ये पुढील अन्नघटक आढळतात
अन्नघटक | प्रमाण | अन्नघटक | प्रमाण |
पाणी | 12.0 | खनिजे | 3.2 |
प्रथिने | 22.0 | फॉस्फरस | 410 मी.ग्रॅ |
कार्बोदके | 60.6 | कॅल्शियम | 260 मी.ग्रॅ |
फॅट्स | 1.2 | लोह | 5.8 मी.ग्रॅ |
तंतुमय पदार्थ | 4.4 | उष्मांक | 346 |
राजमा पिकांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन करणे गरजेचे आहे.
हवामान जमिनीची निवड व पूर्व मशागत:
उष्ण दमट तसेच कोरडे हवामान या पिकाला चांगले मानवते. पश्चिम महाराष्ट्र मध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केले जाते. हलक्या ते मध्यम प्रतीच्या, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन, लागवडीसाठी निवडावी जमिनीची नांगरट करून कुळव्याच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी व क्षेत्र स्वच्छ करावे.
Ghewda Cultivation 2025 बीजप्रकिया:
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3-4 ग्रॅम कॅप्टन किंवा 1-2 ग्रॅम बाविस्टीन हे बुरशीनाशक मर रोगाच्या नियंत्रणासाठी चोळावे.
रायझोबियम जिवाणू संवर्धकाचे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणास बीजप्रकिया करावी.

Ghewda Cultivation 2025 लागवडीचा कालावधी:
या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. खरीप हंगामात या पिकाची लागवड 15 जून ते 15 जुलै आणि रब्बी हंगामात 15 ऑक्टो. ते 15 नोव्हेंबर या कालावधीत करावी. उशिरात उशिरा खरीप हंगामात 30 जुलै ते रब्बी हंगामात 30 नोव्हेंबर पर्येंत करावी.
बियाणे प्रमाण प्रती हेक्टरी, लागवडीची पद्धत, लागवडीचे अंतर:
बियाण्याचे प्रमाण : प्रती हेक्टरी 90 ते 100 किलो.
लागवडीची पद्धत : सपाट वाफे किंवा सरी आणि वरंबा टोकण पद्धतीने किंवा पेरणी यंत्राच्या साह्याने.
लागवडीचे अंतर : 30*10 से.मी.
Ghewda Cultivation 2025 खताची मात्रा:
घेवड्याच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीपूर्वी हेक्टरी 5 ते 7 टन शेणखत बरोबर 75 टक्के शिफारसीत खत मात्रा 45 किलो नत्र + 60 किलो स्फुरद प्रति हेक्टर, किंवा 0.5% तीव्रतेच्या फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेटच्या दोन फवारण्या पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी शिफारशीत खत मात्रेबरोबर 60 किलो नत्र आणि 80 किलो स्फुरद प्रती हेक्टर देण्यात यावेत.
Ghewda Cultivation 2025 आंतरमशागत:
पीक साधारणपणे 15 ते 20 दिवसाचे झाल्यावर एक कोळपणी द्यावी. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते. आणि पिकास मातीची भर मिळते. त्यानंतर गरजेनुसार एक खुरपणी देऊन तनविहरीत ठेवावे. या पिकांमध्ये गाजरगवत, लव्हाळा, हराळी, इत्यादी. तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या तणांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोलवर नांगरणी करावी. आणि आवश्यकतेनुसार एक खुरपणी करावी तण नियंत्रणासाठी पेंडमेथिलिन 1.0 किलो प्रती हेक्टर या प्रमाणात पेरणीपूर्वी करावी.
पाणी व्यवस्थापन:
पहिले पाणी पीक रोप अवस्थेत असताना लागवडीनंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरे पाणी पीक फुलोरात असताना लागवडीत नंतर 25 ते 30 दिवसांनी आणि तिसरे पाणी पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे. पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते.
रोग आणि कीड व्यवस्थापन:
विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विषाणूजन्य झाडे मुळांसहित उपटून टाकावेत व मेटॅसीस्टॉक या कीटकनाशकाची एक मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ते 3.0 ग्रॅम किंवा कार्बेनडीझम एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी कॅप्टन 3 किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.
मावा व तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलेथीऑन या कीटकनाशकाची 500 मिल प्रति 500 लिटर पाण्यातून हेक्टरी फवारणी करावी.
नागअळी व खोडमाशीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 इसी प्रती हेक्टरी 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे.
शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी हेलिओकील 500 मिली प्रति 500 लिटर पाण्यातून मिसळून हेक्टरी फवारणी करावी.

काढणी आणि मळणी:
या पिकाची काढणी खरीप हंगामात 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर व रब्बी हंगामात 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत करावी. पीक पकवतेच्या अवस्थेत असताना झाडाची पाने पिवळी पडून पानगळ होते, फांद्या पिवळ्या पडतात. आणि शेंगा वाळून पिवळ्या होतात. अशा वेळी काढणी करावी मळणी यंत्राच्या साह्याने बियांची फूट न होता मळणी करावी आणि मळणीनंतर बियाणातील आद्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्के राहील याची काळजी घ्यावी.
Ghewda Cultivation 2025 अपेक्षित उत्पादन:
बागायती क्षेत्रामध्ये या पिकाचे 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते, तर जिरायती क्षेत्रामध्ये साधारणता 9 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
राजमाचे प्रसारित वाण:
फुले राजमा: गुण वैशिष्ट्ये
- सरासरी उत्पादन 16.70 क्विंटल प्रति हेक्टर वरूण वाणापेक्षा 21.72% जास्त उत्पादन.
- दाण्यांचा रंग : आकर्षक फिकट पांढरा रंगावर गर्द गुलाबी रंगाची छटा .
- टपोरा दाना, 100 दाण्यांचे वजन 63.50 ग्रॅम.
- प्रथिनांचे प्रमाण 23.38%
- कार्बोदकाचे प्रमाण 63.93%
- सरासरी शेंगांची संख्या 16 ते 18 प्रती झाड
- मर आणि विषाणूजन्य रोगास मध्यम प्रतिकारक्षम
- 78 ते 80 दिवस या कालावधीत येणारा आणि सरळ वाढवणारा वाण
- 50% फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी 32-34 दिवस
- खरीप व रब्बी दोन्ही हंगामात येणारा वाण
- दुबार आंतरपीक पद्धतीत योग्य.
वरुण -वरुण वाणाचे विशेष गुणधर्म:
- मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीत कमी पाण्यावर अधिक उत्पादन
- टपोरा दाना 100 ग्रॅम दाण्याचे वजन 34 ग्रॅम
- कमी कालावधीत 70 ते 75 दिवस येणारा वाण
- 50% फुलोऱ्यात येण्याचा कालावधी 30 ते 35 दिवस
- शेंगांची संख्या 14 ते 16 प्रति झाड
- प्रथिनांचे प्रमाण ते 20.3% ,कार्बोदकाचे प्रमाण 61%
- कीड व रोगास इतर वाणांच्या तुलनेने कमी बळी पडणारा वाण
- कमी कालावधीत अधिक उत्पादन.
- दाण्यांचा रंग : फिकट तपकिरी रंगाच्या दाण्यावर करड्या रंगाची छटा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |