Ghevda Cultivation Technology 2025 श्रावण घेवडा किंवा फ्रेंचबीन ही एक महत्त्वाची शेंगवर्गीय भाजी आहे. ही भाजी कोवळ्या शेंगांसाठी तसेच पिकाच्या वाळलेल्या दाण्यांपासून उसळीसारखे मसालेदार भाजी करण्यासाठी ही प्रसिद्ध आहे. उसळीसारखी भाजी केल्यास तिला राजमा असे संबोधतात.

Ghevda Cultivation Technology 2025 राजमात प्रथिनांचे प्रमाण 22 टक्के इतके असते. यांचे दाणे विविधरंगीत असतात. श्रावण घेवडा तयार होण्यासाठी 75 ते 90 दिवसांचा कालावधी लागतो. हे पीक कमी पाण्यावर हलक्या ते मध्यम जमिनीत येऊ शकते. तसेच शेंगवर्गीय पीक असल्यामुळे जमिनीची प्रत सुधारण्यासही मदत होते.
पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या वेलवर्गीय भाज्यांचे लागवड तंत्रज्ञान!!
त्यांच्या 100 ग्राम शेंगांच्या भाजीत प्रथिने 1.7 ग्रॅम, कार्बोदके 4.5 ग्रॅम, खनिज द्रवे 0.5 ग्रॅम, कॅल्शियम 50 मि. ग्रॅम, मॅग्नेशियम 29 मि.ग्रॅम, फॉस्फरस 28 मि.ग्रॅम, लोह 1.7 मि.ग्रॅम, क जीवनसत्व 14 मि.ग्रॅम, इ. विविध प्रकारची पोषकद्रव्य आढळतात. या सर्व बाबींचा विचार केल्यास हे एक फायदेशीर भाजीपाला पीक आहे.

Ghevda Cultivation Technology 2025 हवामान
हे पीक मुख्यता मध्यम थंडीत येणारे पीक आहे. यासाठी 150 सेल्सिअस ते 200 सेल्सिअस तापमान आवश्यक असते. या पिकास अल्हाददायक वातावरण चांगले मानवते. महाराष्ट्रातील हवामान हे पीक चांगले येते. कोकणाखेरीज इतर ठिकाणी पाण्याची सोय असल्यास बाराही महिने हे पीक येऊ शकते. परंतु, उन्हाळ्यातील पेरणीस कडक उन्हामुळे फुले गळून उत्पादनात घट येते, म्हणून खरीप हंगामात हे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते.
Ghevda Cultivation Technology 2025 जमीन
या पिकाची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येऊ शकते परंतु मध्यम प्रतीची जमिनी या पिकास चांगली मानवते. भारी जमिनीत उन्हाळी आणि रब्बीचे पीक घ्यावे. भारी जमिनीत यांचे चांगले उत्पादन मिळते. चोपण अथवा पाणी साचणारी जमीन या पिकाकरिता निवडून नये.

Ghevda Cultivation Technology 2025 पूर्व मशागत
जास्त उत्पादनाकरिता जमीन लोखंडी नांगराणे ट्रॅक्टरद्वारे नांगरावी. त्यानंतर हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत घालून वखराच्या दोन-तीन पाळ्या द्याव्यात जेणेकरून जमीन भुसभुशीत होईल.
लागवडीचा हंगाम
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान लक्षात घेता खरीप हंगामात हे पीक घेणे चांगले असते. पाण्याची सोय असल्यास रब्बी व उन्हाळी हंगामात सुद्धा लागवड करता येते. परंतु रब्बी हंगामात लागवड उशिरा झाल्यास हे पीक कडक सापडते, कडक उन्हात याची फुले गळून पडतात व उत्पादनात घट येते खरीप हंगामामध्ये जूनच्या पहिल्या पावसानंतर पेरणी करावी.
लागवडीचे अंतर व बियाणे
लागवडीचे अंतर, वाण व जमिनीच्या प्रतीनुसार बदलते दोन ओळींमध्ये 30 ते 45 सेंटीमीटर आणि 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीसाठी 60-70 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची 25 ग्रॅम प्रत्येकी प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पीक उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी एक कोळपणी आणि खुरपणी करावी.
सुधारित जाती- Ghevda Cultivation Technology 2025
महाराष्ट्रात श्रावण घेवड्याचे स्थानिक वाण स्थानिक आहेत. परंतु त्यांची उत्पादन क्षमता कमी आहे. त्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या, चवीला चांगले असणाऱ्या, सुधारित जातींची लागवड करावी. यासाठी पुढील वाण निवडावेत.
फुले सुरेखा:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला हा वाण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेंगा फिकट हिरवा रंगाच्या सरळ आणि चपट्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात हा लोकप्रिय वाण आहे. हा वाण मर, करपा आणि पाने चुरमळने या रोगास प्रतिकारक आहे.
फुले सुयश:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला हा वाण आहे. या वाणाच्या शेंगा हिरव्या रंगाच्या असून सरळ ते थोड्याशा वळणदार आहेत. शेंगांची लांबी 14 ते 15 सेमी लांब असते.
कंटेडर:
ही जात अमेरिकेत विकसित झालेली असून या जातीच्या शेंगा लांब, व भरपूर गरयुक्त असतात. उत्पादनाला चांगली व भुरी रोगाला प्रतिकारक्षम अशी ही जात आहे.
पुसा पार्वती:
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथून ही जात विकसित केलेली आहे. या जातीच्या शेंगा आकर्षक हिरव्या रंगाच्या गोलसर असून भरपूर उत्पन्न देते.
अर्का कोमल:
ही जात भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था बंगळूर येथून प्रसारित करण्यात आलेले आहे. शेंगा हिरव्या रंगाच्या कोवळ्या चपट्या आणि सरळ वाढणाऱ्या वाहतुकीस उत्तम आहेत.
अंतर मशागत व पाणी व्यवस्थापन
Ghevda Cultivation Technology 2025 पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून घ्यावे. पावसाळी पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. हिवाळी पिकास 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे व उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे.

पीक संरक्षण
या पिकावर फारसे रोग पडत नाहीत तथापि विषाणूजन्य रोग व मर रोग हे रोग पडतात. आणि मावा, तुडतुडे, पाणी पोखरणारी अळी, इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून टाकावीत त्याचा प्रसार रोखण्यासाठी कीटकनाशकांच्या दोन फवारण्या घ्याव्यात. मर रोग होऊ नये म्हणून पिकाची फेरपालट करावी या पिकावरील पुढील किडींचे नियंत्रण केले तर साधारणपणे रोग येत नाहीत.
मावा :
ही कीड पानाच्या आतील बाजूस राहून पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. शेंडे सुकतात, फुले गळतात, तसेच शेंगाही सुकतात. हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. म्हणून त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा.
उपाय:
आजूबाजूच्या बांधांवरील गवत वाढू देऊ नये, प्रादुर्भाव जास्त असल्यास शेंगा येण्यापूर्वी 30 टक्के प्रवाही डायमेथोएट 10 मिली 10 लिटर पाण्यातून किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 15 मिली 10 लिटर पाण्यातून 15 दिवसांच्या अंतराने फवारावे. शेंगा आल्यानंतर ट्रायझोफॉस 40% प्रवाही 15 लिटर पाण्यातून फवारावे.

खोडमाशी:
ही अळी खोडात प्रवेश केल्यानंतर खोडाच्या जमिनीलगतच्या भागात राहते. त्यामुळे खोडाचा खालचा भाग तांबुस होतो. खोडाची साल तडकते प्रादुर्भाव झालेली झाडे वाळतात. अशी झाडे उपटून पाहिल्यास खोडावर कोश दिसतात. किडींमुळे झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते.
उपाय:
प्रादुर्भाव झालेल्या झाडांना भर लावावी. पिकाची लागवड शक्यतो जून महिन्यात करावी. या महिन्यात लागवड झाल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. लागवडीनंतर 15 दिवसांनी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा सायपरमेथ्रीन 15% प्रवाही 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून पीक उगवल्याबरोबर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळेस फवारावे.
काढणी आणि उत्पादन
Ghevda Cultivation Technology 2025 लागवडीनंतर साधारणता 6 ते 7 आठवड्यात शेंगा तोडणीस येतात. नुकतेच बी तयार होण्यास सुरुवात होणाऱ्या कोवळ्या शेंगा तोडून बाजारात पाठवाव्यात या पिकाचे 4 ते 5 तोडे मिळतात. हेक्टरी सरासरी 100 ते 110 क्विंटल हिरव्या शेंगा मिळतात. जून झालेला शेंगांचा राजमा म्हणून भाजीसाठी वापर करतात. अशा राजमा बियांचे सरासरी 20 ते 25 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन घेता येते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |