Gay Gotha Anudan 2025 गडचिरोली : शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राज्य सरकारने गाय-म्हैस पालनासाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल.

महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्रामसुरमृद्धी योजना जाहीर केले यानुसार शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालन करण्यासाठी ही योजना आहे. ग्रामीण भागातील पशुपालना संचालना देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
सदर योजनेचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळत आहे. सदर योजना पशुपालकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर 22 कामे गाय गोठ्याची मंजूर आहेत. यापैकी 1007कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या 453 कामे सुरू आहेत. योजनेच्या माध्यमातून पशुपालनाचा व्यवसाय सुलभ करण्यासाठी मदत मिळत आहे, अशी माहिती रोहयोचे कार्यक्रमाधिकारी चेतन हिवंज यांनी दिली.
Gay Gotha Anudan 2025 योजनेचे फायदे काय ?
- आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते. दूध उत्पादन वाढ होण्यास मदत होते.
- पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही.
- अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल.
अर्ज कसा करणार ?
ऑनलाईन :
सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
ऑफलाईन
शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावे लागते. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो.
Gay Gotha Anudan 2025 काय आहे गोठा योजना ?
शेतकरी पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरीत्या करता यावे. त्यांना त्यांचे संरक्षण करता यावे, यासाठी गोठा योजना राबविली जात आहे.
सिंचनासाठी या धरणातून 4800 क्युसेक पाण्याचे विसर्ग; दुष्काळी भागांना दिलासा
आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :
1 | सातबारा उतारा |
2 | आधार कार्ड |
3 | बँक पासबुक |
4 | पशुधन असल्याचा पुरावा |
5 | जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे |
अनुदान किती ?
दोन ते सहा जनावरे : गोठा दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधण्यासाठी 77,188 अनुदान शासनाकडून वितरित केले जाते.
सहा ते बारा जनावरे : गोठा सहा ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच एक लाख 54 हजार 376 रुपये दिले जातात.
तेरा पेक्षा अधिक जनावरांसाठी : तेरा पेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकारच्या तीन पट म्हणजेच 2 लाख 31 हजार 564 रुपयांचे अनुदान दिले जाते.
कोणाला अर्ज करता येणार ?
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
- त्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.
- याशिवाय पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा.
- ग्रामीण भागातील पशुपालकांना सदर योजनेचा लाभ मिळत आहे.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |