लसुण लागवड तंत्रज्ञान!! Garlic Cultivation Tecnhology 2025

Garlic Cultivation Tecnhology 2025 लसूण हे कंद कुळातील एक मसाल्याचे पीक आहे. अन्नपदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. लसणात प्रोपील डायसल्फाईड व लिपिड हि द्रव्ये असतात.

Garlic Cultivation Tecnhology 2025

Garlic Cultivation Tecnhology 2025 चटण्या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्या विकारावर, पचनशक्ती, कानदुखी, डोळ्यातील विकार, खोकला, इत्यादींवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत. महाराष्ट्रात जवळ जवळ 5000 हेक्टर जमीन या पिकाखाली असून नाशिक पुणे ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लागवड केली जाते.

जमिनीची सुपीकता कशी वाढवाल?

हवामान: Garlic Cultivation Tecnhology 2025

  • रब्बी हंगामातील पीक असून लसूण वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान हवे असते.
  • गड्ड्यांची वाढ सुरु होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पादनाची हमी असते.
  • ऑक्टोबर मध्ये लागण केल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते.
  • फेब्रुवारी मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते.
  • हवेतील आद्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो.
  • एप्रिल महिन्यात तापमान आखणी वाढते या काळात गड्डे काढणीस येतात.

WhatsApp Group Join Now

जमीन: Garlic Cultivation Tecnhology 2025

भुसभुशीत आणि कसदार लागते

मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते.

पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी टाळाव्यात.

पूर्व मशागत: Garlic Cultivation Tecnhology 2025

खोल नांगरट करून 2 ते 3 कुळव्याच्या पाळ्या द्याव्यात.

हरळी, लव्हाळ्याच्या गाठी किंवा पूर्वपिकाची धसकटे वेचून घ्यावीत.

एकरी 4 ते 6 टन शेणखत शेवटच्या कुळविद्वारे जमिनीत मिसळून द्यावे.

WhatsApp Group Join Now

लागवडीसाठी 2*4 किंवा 3*4 मिटर अंतराचे वाफे करावेत.

जमीन सपाट असेल तर दीड ते दोन मीटर रुंदीचे आणि 10 ते 12 मीटर लांबीचे सरे करता येतात.

लसूण पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.

निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात 15*10 सेमी अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात.

रुंदीशी समांतर वाफ्यात दर 15 सेमी अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात 10 सेमी अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात.

बियाण्याची निवड:

लसणाच्या गाठ्या एकावर एक अशा गोलाकार पाकळ्यांनी बनलेली असते गाथ्यातील पाकळ्या सुट्या करण्यासाठी गड्डे पायाखाली तुडवून मग ऊफुवून साफ केल्या जातात. लागवडीसाठी मोठ्या निरोगी व परिपक्व पाकळ्यांचा उपयोग करावा.

बीजप्रकिया: Garlic Cultivation Tecnhology 2025

लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेनडझीम व कार्बोसल्फानच्या द्रावणात 2 तास बुडवून लागवड करावी 10 लिटर पाण्यात 20 मिली कार्बोसल्फान व 25 ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून द्रावण तयार करावे.

जाती व लागवड:

महाराष्ट्रात पांढऱ्या रंगाच्या जामनगर जातीची तसेच गोदावरी श्वेता जी-41 व जी-50 या जातीची लागवड केली जाते. लसणाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात साध्या वाफ्यात कोरड्या 10*7.5 सेमी वर करतात. गड्डे फोडून पाकळ्या किंवा काड्या सुट्या करून टाकून मातीने झाकतात. त्यासाठी हेक्टरी 500 ते 600 किलो कुड्याच्या स्वरूपात बियाणे लागते लागण झाल्यानंतर कुड्या निघणार नाहीत असे पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन:

लसूण पिकाला एकरी 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश लागते. लागवडीपूर्वी 50 टक्के नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद द्यावे. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी तर दुसरी मात्र 45 ते 50 दिवसांनी द्यावी. अमोनियम सल्फेटचा वापर केल्यास आवश्यक गंधकाची मात्र पिकास मिळू शकते. अन्यथा 25 किलो गंधक देण्यासाठी दाणेदार गंधकाचा वापर करावा.

पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात पाटात आणि वरंब्यावर तणनाशक फवारावे, त्यासाठी 15 मिली. ऑक्सीफ्लोरफेन किंवा 15 मिली. पेंडीमिथॅलीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. तणनाशकाचा वापर नंतर लगेच पाणी द्यावे, किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक वापरले तरी चालते.

लागवडी सोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळपास 30 ते 40 दिवस गवत उगवत नाही, त्यानंतर हलकी खुरपणी करणे आवश्यक्य असते. खोल नागरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.

अंतर मशागत:

लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर एक महिन्याने खुरपणी करून गवत काढून घ्यावे. त्यानंतर तण पाहून 1-2 वेळा निंदणी करावी. लागवडीनंतर अडीच महिन्यांनी लसणाचे गड्डे धरण्यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करून माती चांगली मोकळी ठेवावी म्हणजे मोठ्या आकाराचे व चांगले भरदार गड्डे धरण्यास मदत होते. त्यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करू नये.

पाणी व्यवस्थापन: Garlic Cultivation Tecnhology 2025

प्रक्रिया युक्त लसूण पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर 8 ते 10 दिवसा दिवसाच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सूक्ष्म सिंचनासाठी 120 सेमी. रुंदीचे, 40 ते 60 मीटर लांबीचे व 15 सेमी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्रणाने तयार करावेत.

सर यंत्राच्या फळाची दोन टोके 165 सेमी अंतरावर कायम करून ट्रॅक्टर चालविला, तर 120 सेमी रुंदीचा गादी वाफा तयार होतो. वाफ्याच्या दोन्ही कडेला 45 सेमी रुंदीच्या 2 सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे गवत काढणे पिकांचे निरीक्षण करणे इ. कामांसाठी होतो.

रोग व किडींचे नियंत्रण:

तपकिरी करपा: पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास झाडांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो व प्रसंगी पूर्ण झाड मरते.

जांभळा करपा: पानांवर सुरुवातीला खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात चट्ट्यांच्या मधला भाग जांभळा व नंतर काळपट होतो असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात व वळतात.

नियंत्रण: 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 25 ते 30 ग्रॅम मॅंकोझेब किंवा 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात कीडनाशकासोबत आलटून पालटून फवारावे फवारणीच्या द्रावणात स्टिकर जरूर वापरावे.

फुलकिडे:

लक्षणे: पूर्ण वाढलेली किड व त्यांची पिल्ले पानातून रस शोषून घेतात त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात या किडीची पिल्ले व प्रौढ दिवसा पानाच्या बेचक्यात लपून राहतात व रात्री पानातून रष शोषतात.

नियंत्रण: पाकळ्या उगवून आल्यानंतर एकरी 4 किलो फोरेट वाफ्यात वापरावे व पाणी द्यावे तसेच दर 12 ते 15 दिवसांनी सायपरमेथ्रीन 10 मिली. प्रति 10 लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारावे.

सूत्रकृमी:

लक्षणे: लसणाच्या खोडालगत पेशींमध्ये शिरतात पेशींचा भाग पोखरतात व तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो व त्याला वास येतो. खोडाचा भाग सडल्यामुळे झाड सहज उपटून येते व मुळांचा भाग तसाच जमिनीत राहतो.

नियंत्रण: पिकांची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तसेच पिका भोवताली झेंडू लागवड केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

काढणी व उत्पादन:

लावणी नंतर 4.5 ते 5 महिन्यांनी हे पीक काढणीस योग्य होते. पिवळी पडावयास लागले म्हणजे गाठे काढावयास तयार झाले असे समजावे. लसून पातीसह तसेच बांधून ठेवावा म्हणजे 8-10 महिने टिकतो. विक्रीसाठी पाती कापून गड्डे स्वच्छ करून आकाराप्रमाणे प्रतवारी करून बाजारात पाठवतात. जमिनीचे पोत, खते, व जात यावर लसणाचे उत्पादन अवलंबून असते. दर हेक्टरी 9 ते 10 टन उत्पादन मिळते.

अधिक उत्पन्नासाठी:

लसणाच्या पाकळ्या उभ्या लावाव्यात त्यामुळे उगवण एकसमान होते. लागवडी पूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिम कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. तणनाशक फवारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी एक ते दोन तासात आला पाहिजे हे लक्षात ठेवावे. लव्हाळ किंवा हरळीकरिता ग्लायफोसेट तणनाशक वापरू नये. ठिबक किंवा तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते. उत्पादन अधिक येते, पाण्याची बचत होते, तसेच तणांचा व किडींचा उपद्रव कमी होतो.

लसूण पॅकिंग अशी कराल:

लसूण पीक काढणी नंतर लसूण चांगला वाळलेला असला पाहिजे. गड्डे योग्य प्रकारे प्रतवारी करून जाळीदार पिशव्यांमध्ये पॅकिंग केले जाते. त्यानंतर विक्री केली जाते.

लसूण साठवण अशी कराल:

वर्षभर साठवण करण्यासाठी लसणाच्या वाळलेल्या पातीसहित जुड्या बांधून साठवण करता येते. जुड्या टांगून ठेवाव्यात. पात कापून निवड करून जाळीदार पिशव्यांमध्ये लसणाची साठवण करता येते. साठवण करण्याच्या ठिकाणी हवा खेळती राहणे आवश्यक आहे. तसेच साठवणीपूर्वी लसूण चांगला वाळलेला असला पाहिजे. लसूण पूर्ण पक्व न होता काढणी केल्यास साठवणीत नुकसान होते. साठवणीत प्रामुख्याने वजनात घट होते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment