गहू मळणीनंतर साठवण्यासाठी ओलावा किती असावा ? जाणून घ्या सविस्तर; Gahu Sathvanuk 2025

Gahu Sathvanuk 2025 सद्यस्थितीत गव्हाची काढणी सुरू आहे. हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू कापणी केली जात आहे. दुसरीकडे लागलीच अनेक शेतकरी मळणी देखील करीत आहेत. शेतातून घरी नेऊन व्यवस्थित साठवणूक केली जात आहे. गव्हाची मळणी आणि साठवणूक करताना काय काळजी घ्यावी हे समजून घेऊयात….

Gahu Sathvanuk 2025

गहू मळणी म्हणजे गव्हाच्या देठापासून आणि त्याला झाकणाऱ्या भुसा पासून गव्हा वेगळे करणे. ही प्रक्रिया कापणीनंतर आणि विणण्यापूर्वी केली जाते. गहू मळणी यंत्राच्या साह्याने केली जाते. काही मोजक्याच ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला जातो.

खात्यावर अनुदान हवंय, तर आधार लिंक केले का? वाचा सविस्तर;

Gahu Sathvanuk 2025 गहू मळणी करण्याची पद्धत

1. मळणी म्हणजे धान्य रोपांपासून वेगळे करण्याची प्रक्रिया.

2. मळणी किंवा घासणे म्हणजे धान्याचा (किंवा इतर पिकाचा) खाण्यायोग्य भाग जा पेंढ्याला जोडला जातो, त्यातून सोडण्याची प्रक्रिया.

WhatsApp Group Join Now

3. मळणी काळजीपूर्वक करणे खूप महत्त्वाचे आहे

4. गहू कापणी पासून ते मळणी पर्यंत आणि गव्हाच्या साठवणुकी पर्यंत काळजी घेणे महत्त्वाचे असते.

5. मजुरांची टंचाई आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता, शेतकरी हार्वेस्टरच्या साह्याने कमी वेळेत आणि कष्टात मळणी करण्यास प्राधान्य देत आहेत.

Gahu Sathvanuk 2025 गव्हाची साठवण

  • साठवणुकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे.
  • त्यासाठी मळणीनंतर गव्हास तीन ते चार दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड होऊ द्यावा.
  • त्यानंतर साठवण करावी.
  • शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा.
  • गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी.
  • गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंट पासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा.
  • पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे.
  • पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या शीटवर ठेवावीत.

– ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment