पावसामुळे फुल शेतीचे नुकसान; आवक झाली कमी, वाढणार भाव!! FulSheti 2025

FulSheti 2025 जयसिंगपूर: मे जून मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे फुले पोजल्याने उत्पादनात घटून आवक कमी झाले आहे. शिवाय कर्नाटक कोकणात फुले पाठवली जात असल्याने बाजारात कमी प्रमाणात फुले उपलब्ध होत आहेत. फुलांचे भाव देखील दीडपट वाढले आहे. गुरुपौर्णिमेला उंचाक्की दर गाठलेल्या फुलांच्या महागाईत श्रावण महिन्यात आणखी भर पडणार आहे. या पावसात शिरोळ तालुक्यातील 38 हेक्टर जाईल पूल शेतीचे नुकसान झाले.

FulSheti 2025

FulSheti 2025 लग्नसमारंभात फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे फुल शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम भाव वाढीवर झाला. बाजारात दीडपट फुलांचे भाव वाढले आहेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने फुल महागच होती 25 जुलैपर्यंत श्रावण मासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे फुलांचे भाव आणखीन वाढणार आहेत.

पूर्वतयारी खरीप हंगामाची!!

फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम दरावरही दिसून येत आहे. मात्र लिलाव बाजारात आवक कमी झाल्या असल्याचेही दिसून येत आहे. कर्नाटक कोकण भागात फुले मोठ्या प्रमाणात पाठवली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढलेल्या दराचा फटका देखील बसत आहे.

WhatsApp Group Join Now

FulSheti 2025 पावसाने फुलांची नासाडी, उत्पन्न घटले!!

  • मे महिन्याच्या अखेरीस व त्यानंतर जून मध्ये झालेल्या पावसामुळे फुल शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
  • अन्य ठिकाणावरून येणाऱ्या फुलांवर विक्रेत्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
  • लग्न समारंभात फुलांना विशेष महत्त्व असते. याच काळात मे आणि जून मध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे फुल शेतीचे मोठे नुकसान झाले याचा परिणाम भाव वाढीवर झाला.

FulSheti 2025 बाजारातील सध्याचे दर

पांढरा शेवंती200 रु. कि.
निशिगंध250 रु. कि.
झेंडू140 रु. कि.
पिवळा शेवंती200 रु. कि.
गलांडा200 रु. कि.
पर्पल शेवंती240 रु. कि.
मोगरा1200 रु. कि.
बट मोगरा300 रु. कि.
गुलाब20 नग 250 रु.

मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी आहे त्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत श्रावण महिन्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. -सविता सावंत, फुल विक्रेत्या, जयसिंगपूर”

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment