Fruit Crop Insurance 2025 चालू आर्थिक वर्षात आंबिया बहर योजनेत आंबा, डाळिंब, केळी, पपई व द्राक्ष या फळांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना जिल्ह्यातील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे.

Fruit Crop Insurance 2025 ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पअंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देणार आहे. जिल्ह्यात ही योजना बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे, या विमा कंपनी मार्फत कार्यान्वित केला जात आहे.
गहू लागवड तंत्रज्ञान!!
Fruit Crop Insurance 2025 लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, देवणी, या सर्व तालुक्यातील सर्व महसूल महा मंडळांसाठी आंबा फळ पिकासाठी ही योजना लागू असून यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार रुपये असून शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपयांचा विमा हप्ता भरायचा आहे.

डाळिंबासाठी लातूर तालुक्यातील तांदूळजा, मुरुड, औसा तालुक्यातील औसा, किल्लारी, बेळकुंड, भादा, उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद, रेणापूर, तालुक्यातील कारेपूर, पानगाव, उदगीर तालुक्यातील नागलगाव, हेर, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, किनगाव व खंडाळी, चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडगाव, नागनाथ या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील.
यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जानेवारी 2026 पर्यंत असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 60 हजार तर हप्ता 8 हजार रुपये आहे. केळीसाठी औसा तालुक्यातील किल्लारी व मातोळा, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर या महसूल मंडळामध्ये ही योजना लागू राहील यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे.
विमा संरक्षण रक्कम 1 लाख 70 हजार रुपये तर विमा हप्ता साडेआठ हजार रुपये आहे. पपईसाठी औसा तालुक्यातील उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, उदगीर तालुक्यातील देवर्जन, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत विमा संरक्षण रक्कम 40 हजार रुपये असून विमा हप्ता 2 हजार रुपये आहे.
द्राक्षासाठी औसा, लामजना, किणीथोट, किल्लारी, बेळकुंड, भाधा, निलंगा, अंबुलगा, कासार बालकुंदा, उदगीर मोघा व देवर्जन, रेनापुर, तालुक्यातील कारेपूर, चाकूर, नळेगाव व शेळगाव या महसूल मंडळामध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत विमा संरक्षण रक्कम 3 लाख 80 हजार रुपये तर विमा हप्ता 19 हजार रुपये असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी दिली.
भाडेपट्ट्याने जमीन कसणारेही पात्र
Fruit Crop Insurance 2025 कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन कसणारे शेतकरी करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. तसेच सहभागी होण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक राहील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |