हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका, Fruit Crop Insurance 2025

Fruit Crop Insurance 2025 रत्नागिरी: हवामानावर आधारित असणाऱ्या फळपिक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चतम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळ पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो.

Fruit Crop Insurance 2025

परंतु, कंपन्यांच्या चुकीच्या निकषामुळे हंगाम संपून एक महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप विमा परतावा मिळालेला नाही.

यंदा पिक विमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे! वाचा सविस्तर;

Fruit Crop Insurance 2025फळपीक विमा परतवण्यासाठी कंपन्यांकडून जे निकष लागू केले आहेत, त्यामध्ये दि.15 मे पर्यंतच होणारे नुकसान ग्राह्य धरले जाते. यावर्षी दि. 8 मे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा, काजू पीक झाडावर असताना झालेले नुकसान विमा कंपन्या ग्राह्य धरणार का? असा प्रश्न केला जात आहे.

WhatsApp Group Join Now

Fruit Crop Insurance 2025 यावर्षी दि. 8 मे पासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 20 मे पासून सलग सर्वाधिक पाऊस पडला. यादरम्यान अनेक बागायतदारांचा अंबा झाडावर होता. या आंब्याला वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले. याची दखल कंपन्यांकडून घेत बागायतदारांना परतावा देणे अपेक्षित आहे.

50 टक्के शेतकरी सहभागी होत नाही

Fruit Crop Insurance 2025 सुरुवातीला दिनांक 30 मे पर्यंत झालेले नुकसान ग्राह्य धरले जात होते. सन 2021 साली विमा कंपन्यांनी निकष बदलले व दिनांक 15 मे पर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात आहे. वास्तविक 7 जून पर्यंत आंबा हंगाम असतो.

ज्यावेळी झाडावर आंबा असतो, त्यावेळी होणारे नुकसान ग्राह्य धरणे ऐवजी 15 दिवस आधीच मुदत दिली जात आहे. परिणामी चुकीच्या निकषामुळे विमा काढूनही बागायतदारांना प्रत्यक्ष लाभ होत नसल्यामुळे 50 टक्के बागायतदार फळपीक विमा योजनेत सहभागी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

WhatsApp Group Join Now

सन 2025 च्या हंगामातील स्थिती

Fruit Crop Insurance 2025 आंबा पिक

सहभागी बागायतदार30,132
क्षेत्र14,383.50478
शेतकरी हप्ता19,56,15,664.1
राज्य शासन5,01,26,513.6
केंद्र शासन30,56,49,470.4

Fruit Crop Insurance 2025 काजू पीक

सहभागी बागायतदार6,333
क्षेत्र3,635.99867
शेतकरी हप्ता21,81,15,992.02
राज्य शासन3,05,42,388.48
केंद्र शासन3,05,42,388.48

Fruit Crop Insurance 2025 एकूण आकडेवारी

सहभागी बागायतदार36,465
क्षेत्र18,019.50342
शेतकरी हप्ता21,74,31,656.1
राज्य शासन53,18,07,524.8
केंद्र शासन33,61,91,857.9

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment