या 5 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025

Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी, 65 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिला, कुटुंबात चार चाकी असलेल्या महिला, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अशा राज्यातील तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरले आहेत. अशी माहिती आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.

Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील अर्ज करणाऱ्या बहुतांश महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति महिना यानुसार आर्थिक मदत करण्यात आली.

आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर 7 हप्त्याचे 10,500 रक्कम जमा करण्यात आले. मात्र आता याचा भार वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यातील पात्र नसताना ही ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला अशा महिलांची नावे अपात्र ठरवण्यास केली आहे.

WhatsApp Group Join Now

Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025 यामध्ये पहिल्या टप्प्यात 5 लाख लाडक्या बहिणींना राज्य सरकारने अपात्र ठरवला आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025 या महिलांची नावे अपात्र

राज्य सरकारने 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. या महिला अपात्र ठरल्या आहेत त्या खालील प्रमाणे…

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला- 2 लाख 30 हजार अपात्र ठरल्या आहेत.
  • ज्या महिलांचे वय 65 पेक्षा अधिक आहे अशा 1 लाख 10 हजार महिला अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
  • कुटुंबातील सदस्याचा नावे चार चाकी गाडी असलेल्या आणि नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या तसेच स्वच्छते योजनेतून नावे मागे घेणाऱ्या अशा एकूण 1 लाख 60 हजार महिलांना राज्य सरकारने पात्र ठरवला आहे.

अशा एकूण राज्यातील 5 लाख लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. अशा महिलांच्या खात्यावर आता इथून पुढे लाडक्या बहिणीचा हप्ता जमा केला जाणार नाही.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोठी गाजत वाजत सुरू केली होती. यासाठी राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले त्यावेळी वेळ नसल्याने राज्य सरकारने नियम अटी याचा विचार न करता अनेक महिलांना या योजनेचा लाभ दिला. यामध्ये नियम व अटीची विचार न करता अनेक महिलांनी अर्ज केले आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या.

मात्र आता सरकारला हे हप्ते डोईजड झाल्यानंतर आता सरकारने त्यांनी काढलेल्या शासन निर्णयातील अटी व नियमांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राज्यातील तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now

Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025 अपात्र महिलाकडून पैसे वसूल करणार ?

शुक्रवार दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंट वरून राज्यातील 5 लाख लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरल्या असल्याची माहिती दिली आहे. मात्र ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सात हप्यांची रक्कम मिळाली आहे अशा बहिणींच्या खात्यातून किंवा त्यांच्याकडून त्यांना दिलेली रक्कम परत घेतली जाणार नसल्याची माहितीही तटकरे यांनी दिली आहे.

त्यामुळे लाडक्या बहिणींचा जीव भांड्यात पडला आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेतून आपण अपात्र ठरलो हे दुःख जरी असले तरी आपल्याला मिळालेले हप्ते परत करण्याची वेळ आपल्यावर आली नाही किंवा सरकार आपल्या पैसे परत घेणार नसल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार छोटा ट्रॅक्टर घेण्यासाठी 90 टक्के अनुदान

Five Lakh Women Beneficiary Excluded From Ladki Bahin Scheme 2025 या महिला ही ठरणार अपात्र ?

राज्यातील अनेक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्याने त्या पात्र ठरल्या. मात्र अनेक बहिणींनी याचे नियम आणि अटीचे पालन केलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील अजून अनेक महिला या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

कारण नमो शेतकरी योजना, संजय गांधी निराधार योजना, 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिला किंवा कुटुंबात चार चाकी गाडी असणाऱ्या महिला या योजनेत अपात्र ठरणार आहेत. आता या अशा अर्जांची छाननी राज्य सरकार करत आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत अजून किती लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरतील हे आपल्याला समजेल.

Leave a Comment