Finger Millet Lagwad 2025 नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट (Finger Millet Lagwad 2025) म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते.राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियम बरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं यांना नाचणी पासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात.

हे पीक राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नाचणी हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाता इतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते. यात 6 ते 11% प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात. मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. यामुळे रक्तातील कोलेस्टेटरॉल कमी होते तसेच मधूमेहाचे प्रमाण कमी होते.
नाचणी म्हणजे काय ? Finger Millet Lagwad 2025
हा एक भरड धान्याचा प्रकार आहे. कोकण आणि गुजरात प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि अंबिल बनवण्यासाठी होतो.
नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते. त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात. त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो.
हवामान व जमीन
नाचणी हे पीक उष्ण कटिबंधीय प्रकारातील असून 12 ते 28 अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य आहे. 16 ते 21 अंश सेल्सिअस या तापमानात बी उगवण लवकर होते व लोंब्या तयार होण्याच्या काळात 19 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच 50 ते 100 से. मी. पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी चांगले पीक येते.
नाचणी पीक काळया, रेताड लाल जमिनीत तसेच हलक्या व डोंगर उताराच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते. या पिकासाठी हलक्या ते मध्यम प्रतीची अधिक सेंद्रिय पदार्थ असणारी व 5.5 ते 8.5 सामू असणारी योग्य निचरायुक्त सुपीक जमीन नाचणी पिकास योग्य असते. नागली हे पीक सर्व राज्यात विशेष करून खरिप हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात या पिकाची पेरणी जून ते जुलै महिन्यात केली जाते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रवारी मध्ये पेरणी केली जाते.Finger Millet Lagwad 2025
पूर्व मशागत
नाचणी पिकाची लागवड करण्यापूर्वी उन्हाळी हंगामात रोप लावणीच्या 3 आठवडे अगोदर लाकडी नांगर, लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोरड्या शेत जमिनीची उभी आडवी नांगरट करावी. जमिनीच्या उतरानुसार ठराविक अंतरावर समपातळी बांध अथवा समतल चर काढावेत. लाकडी फळी फिरवून ढेकळे फोडून घ्यावे. व कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात.Finger Millet Lagwad 2025
उपलब्धतेनुसार एकरी 2 ते 2.5 टन शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर जमिनीत मिसळावे. जमीन भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीतील धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकावा जेणे करून खोडकिडीचा बंदोबस्त करता येतो.
सुधारित वाण : Finger Millet Lagwad 2025
वाणाचे नाव (हळवे वाण) | कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विं./हे) | विशेष गुणधर्म |
व्ही. आर 708 | 90 ते 100 | 12 ते 15 | हलक्या जमिनीस योग्य |
व्ही. एल 149 | 90 ते 100 | 15 ते 20 | करपा रोग प्रतिकारक्षम |
पी. ई. एस. 400 | 98 ते 102 | 18 ते 20 | करपा रोग प्रतिकारक्षम |
वाणाचे नाव (निमगरवे वाण) | कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विं./हे) | विशेष गुणधर्म |
दापोली 1 | 100 ते 110 | 20 ते 25 | मध्यम खोल जमिनीस योग्य |
दापोली सफेद | 110 ते 120 | 15 ते 20 | महाराष्ट्रासाठी प्रसारित |
एच. आर. 374 | 110 ते 120 | 15 ते 20 | करपा रोग प्रतिकारक्षम |
वाणाचे नाव (गरवे वाण) | कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विं./हे) | विशेष गुणधर्म |
पी. ई. एस. 110 | 115 ते 125 | 20 ते 25 | जास्त पाऊस क्षेत्रास योग्य |
पी. आर. 202 | 120 ते 130 | 20 ते 25 | जास्त पाऊस क्षेत्रास योग्य |
फुले नाचणी | 115 ते 120 | 25 ते 30 | लोह प्रणाम अधिक, करपा रोगास प्रतिकारक्षम |
लागवड पद्धत
Finger Millet Lagwad 2025 नाचणी पिकाची लागवड बी पेरणी, टोकण किंवा रोप लागवड पद्धतीने केली जाते. अती उताराच्या जमिनीत व जास्त पावसाच्या प्रदेशात नाचणी पिकाची लागवड पेरणी किंवा टोकण पद्धतीपेक्षा रोपलागण पद्धत फायदेशीर आहे. पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. तर दोन रोपांमधील अंतर 10 सें.मी. राहील याची दक्षता घ्यावी. पेरणी पद्धतीने लागवड करण्यासाठीं एकरी 4 किलो बियाणे लागते. पेरा दाट होऊ नये या करिता बियाणे वाळू किंवा मातीत मिसळून पेरणी किंवा टोकण करावी. पेरणी करतांना बी जास्त खोल (3 ते 4 सें.मी.पेक्षा जास्त) जाणार नाही याची दक्षता बाळगावी.
पुनर्लागवड पद्धतीने पेरणी केल्यास 1 ते 1.5 किलो प्रति एकर बियाणे वापरावे. सुरुवातीला बियाणे पेरणीसाठी जमिनीच्या उतारानुसार गादी वाफे तयार करावेत. बियाणे जूनच्या मध्यावर गादीवाफ्यावर सरळ रेषेत पेरावे. गादीवाफ्यावर बियाणे 7 ते 8 सें.मी. अंतराच्या ओळीने आणि 1 ते 2 सें.मी. खोल पेरून मातीने झाकून द्यावे. बियाणे पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी 500 ग्रॅम युरीया प्रती गुंठा या प्रमाणे खताचा हप्ता द्यावा. एक एकर क्षेत्र लागवडीसाठी 2 ते 2.5 गुंठ्याची रोपवाटिका तयार करावी. रोपांच्या पुनर्लावणीसाठी हळव्या जातीमध्ये 20 ते 21 दिवसांची, गरव्या व नीमगरव्या जातींमध्ये 25 ते 30 दिवसांची रोप निवडावीत.
सर्वसाधारण बियांपासून रोपे तयार करून नंतर त्यांची पुनर्लावणी करतांना दोन ओळीतील अंतर 22.5 सें.मी. आणि दोन रोपातील अंतर 10 सें.मी. ठेवून प्रत्येक ठिकाणी दोन रोपे लावावीत. नाचणीची रोपे ओळीत अंगठ्याच्या साहाय्याने दाबून लावली म्हणजे झाडांची वाढ समान होते व आंतरमशागत करण्यासाठी सोपे जाते.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पी एम किसान च्या 19 वा हप्त्याची रक्कम ‘या’ दिवशी होणार जमा…
बीजप्रक्रिया Finger Millet Lagwad 2025
बियाणे पेरणीपूर्वी बुरशीजन्य रोगांपासून बचाव होण्यासाठी प्रती किलो बियाण्यास 3 ते 4 ग्रॅम थायरम चोळावे तसेच 25 ग्रॅम अझोस्पिरीलम ब्रासिलेंस व 25 ग्रॅम अस्पर्जिलस अवामोरी या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
पाणी व्यवस्थापन
नाचणीची रोपे 25 ते 30 दिवसांची तयार होण्याच्या कालावधीत असताना, रोपांना गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे. लागवड केलेली रोपे मुळेधरे पर्यंत पाणी मिळणे आवश्यक असते. त्यानंतर नाचणीच्या दाण्याची चि्क किंवा दुधाळ दाणा अवस्थेपर्यंत आणि लोंब्या आल्यानंतर 8 ते 10 दिवसापर्यंत नाचणीच्या पिकास गरजेप्रमाणे पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन Finger Millet Lagwad 2025
नाचणी या पिकास सर्वसाधारणपणे एकरी 2 टन शेणखतासोबत 24 किलो नत्र, 12 किलो स्पुरद आणि 12 किलो पालाश या अन्नद्रव्याची शिफारस करण्यात आली आहे. खत व्यवस्थापन करत असताना 12 किलो नत्र, संपूर्ण स्पूरद व पालाश पुनर्लागवडीच्या वेळीं द्यावा आणि उरलेला 12 कीलों नत्र पुनर्लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावा.

पीक संरक्षण
Finger Millet Lagwad 2025 नाचणी या पिकावर मावा, लष्करी अळी, पाने खाणारी अळी, लोंबितील दने खाणारी अळी व खोडकीडा इत्यादी किडी दिसून येतात. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास डायमिथोयेट 30 इ.सी.19 मी.ली. अथवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस. सी. ६ मी.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. लष्करी अळी किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी शेतातील व बांधावरील गवत कापून टाकावे. या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास सायपरमेथरिन किंवा फिनवलरेट 20 इ. सी 4 मी.ली. प्रती 10 लीटर पाण्यातून फवारावे.
नाचणी पिकावर (Finger Millet Lagwad 2025)मुख्यत्वे पानावरील करपा, मानेवरील करपा आणि कणसा वरील करपा हे रोग येतात. पानावरील करप्या मुळे पान जळल्या सारखे दिसते. तसेच मानेवरिल करपा हा रोग बुरशीमुळे दाणे भरण्याच्या वेळी कणासाच्या मानेवर येतो. त्यामुळे दाने न भरता कणीस वांझ राहते व मानेतून मोडून पडते. कणसा वरील करपा कणसाच्या टोकापासून ते खालपर्यंत जाऊन संपूर्ण कणीस काळे होते. या सर्व करप्यांच्या नियंत्रणासाठी करपा प्रतिबंधक वाणांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ते 4 ग्रॅम थायरम बीजप्रक्रिया करावी. प्रादुर्भाव दिसून येताच डायथेन एम.45 या बुरशीनाशकाची 25 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उपयोग Finger Millet Lagwad 2025
नाचणीपासून भाकरी, माल्ट,नुडल्स, पापड, आंबील, इडली बनवितात.
रोग व त्यावरील उपाय Finger Millet Lagwad 2025
करपा, काणी, पानावरील ठिपके व केवडा हे रोग नाचणीवर पडतात.
करपा :
हा रोग पायरीक्यूलेरिया एल्युसिनी या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. त्यात राखाडी रंगाचे डाग कणसाच्या खालील भागावर आढळतात. त्यामुळे कणसात दाणे चांगले भरत नाहीत. लहान रोपे रोगाला लवकर बळी पडतात. 5:5:50 बोर्डो मिश्रण पिकावर फवारतात.Finger Millet Lagwad 2025
काणी :
हा रोग मेलॅनोप्सिकियम एल्युसिनीस या कवकामुळे होतो. त्यात कणसातील काही दाण्यांचे काणीयुक्त बीजाणुफळांत रूपांतर होते. रोग तुरळक आढळतो. उपाय म्हणून रोगट कणसे काढून नष्ट करतात.
पानावरील ठिपके :
हा रोग हेल्मिथोस्पोरियम नोड्यूलोजम या कवकामुळे होतो. यामुळे पानावर तपकिरी ठिपके पडतात. याकरिता बी पेरण्यापूर्वी बियांवर अॅग्रोसानची क्रिया (1:400) करून घेतात.
केवडा :
हा रोग स्क्लेरोस्पोरा मॅक्रोस्पोरा या कवकामुळे उद्भवतो (ज्वारी; बाजरी).
कीड :
Finger Millet Lagwad 2025 नाचणीवरील महत्त्वाची कीड म्हणजे सुरवंट होय. याच्या पतंगांचा नाश करणे हाच उपाय आहे.
FAQ :
i) नाचणी वाढण्यास किती दिवस लागतात ?
उत्तर – नाचणी पिकाची पिकण्याची पद्धत आणि प्रकारानुसार सुमारे 120 -135 दिवसांत पिकते.
ii) कोणत्या राज्यात जास्त नाचणीचे उत्पादन होते ?
उत्तर – कर्नाटक हे भारतातील नाचणीचे अव्वल उत्पादक राज्य आहे. कर्नाटकमध्ये, नाचणी उत्पादक क्षेत्रे दक्षिण मैदानात केंद्रित आहेत.