Fertilizers to dry-growing fruit trees 2025 फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन हवामान खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे यापैकी खत व्यवस्थपणास अनन्य साधारण महत्व आहे.

Fertilizers to dry-growing fruit trees 2025 फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे. फळझाडाची वाढ आणि त्यावर होणारी फळधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांवर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. त्यामुळे या 2 महत्वाच्या बाबीपैकी जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
डाळिंब फळ तडकणे, कारणे आणि उपाययोजना!!
Fertilizers to dry-growing fruit trees 2025 जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ कमी होते आणि झाडे किडी व रोगास बळी पडतात झाडांची वाढ निकोप व्हावी म्हणून योग्य मशागत तणांचा बंदोबस्त खतांचा संतुलित पुरवठा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन म्हणून वापर, आच्छादनाची पिके, आंतरपिके इ. मार्गानी जमिनीची सुपीकता चांगली ठेवणे फायदेशीर ठरते.

फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य आकाराचा खड्डा योग्य अंतरावर एप्रिल मे महिन्यातच खोदावेत उन्हाळ्यात खड्डे तापू द्यावेत. खड्डा भरताना तळाला पालापाचोळा टाकून 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत व पोयटा माती व 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 50 – 100 ग्रॅम फोलिडोल पावडर यांच्या मिश्रणाने जून च्या पहिल्या आठवड्यात भरून घ्यावा.
दोन चांगले पाऊस पडून गेल्यावर सर्वसाधारणपणे जून जुलै महिन्यात रोपांची कलमांची लागवड करावी रोपे कलमे खात्रीशीर रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत.
सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर व जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात खते द्यावीत परंतु खते देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याच्या कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत. सर्व साधारणपणे जून-जुलै च्या महिन्यात संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत संपूर्ण स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी, नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यात विभागून द्यावी. खाते देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Fertilizers to dry-growing fruit trees 2025 खताची मात्र देताना मोठ्या विस्ताराखाली खोडापासून एक मीटर लांब 40 ते 50 सेमी रुंद आणि 15 सेमी खोल वर्तुळाकार चर काढावा. प्रथम चरित पालापाचोळा आणि शेणखत नंतर रासायनिक खते सर्व बाजुनी टाकावीत नंतर चर मातीने बुजवावी.
सीताफळ:
पूर्ण वाढलेला (4 वर्ष +) झाडास 30 ते 40 किलो शेणखत 550:125:125 ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश प्रति झाड 550 ग्रॅम युरिया 800 ग्रॅम एसएसपी व 200 ग्रॅम एमओपी प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हप्त्यात विभागून द्यावे शेणखताबरोबर अझोस्पिरिलम व पिएसबी या जिवाणू खतांचा वापर करावा.
बोर:
पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत 50 किलो प्रति झाडास चटणी नंतर द्यावे 25:250:50 ग्रॅम नत्र स्फुरद पालाश प्रति झाड अर्धा किलो युरिया दीड किलो एसएसपी व एक किलो एमओपी प्रती वर्ष द्यावे नत्र 2 समान हफ्त्यात विभागून द्यावे.
आवळा:
पूर्ण वाढलेल्या 5 वर्ष व नंतर झाडास 50 किलो शेणखत 500:250:250 ग्रॅम नत्र स्फुरद पालाश प्रति झाड (1 किलो युरिया दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी ) प्रति वर्ष द्यावे नत्र 2 समान हफ्त्यात विभागून द्यावे.
जांभूळ:
पूर्ण वाढलेल्या (5 वर्ष व नंतर ) झाडास 50 किलो शेणखत 500:250:250 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रती झाड ( 1 किलो युरिया दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति वर्ष द्यावे. नत्र 2 समान हफ्त्यात विभागून द्यावे.

चिंच:
पूर्ण वाढलेल्या (5 वर्ष व नंतर ) झाडास 50 किलो शेणखत 500:250:250 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रती झाड ( 1 किलो युरिया दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति वर्ष द्यावे. नत्र 2 समान हफ्त्यात विभागून द्यावे.
कवठ:
पूर्ण वाढलेल्या (5 वर्ष व नंतर ) झाडास 50 किलो शेणखत 350:250:250 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रती झाड ( पाऊण किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी) प्रति वर्ष द्यावे. नत्र 2 समान हफ्त्यात विभागून द्यावे.

कोरडवाहू फळझाडांच्या लागवडीचे अंतर हेक्टरी झाडांची संख्या आणि प्रमुख जाती: Fertilizers to dry-growing fruit trees 2025
| फळझाड | लागवडीच्या खड्यांचा आकार (सें.मी.) | लागवडीचे अंतर (मीटर) | हेक्टरी झाडांची संख्या | एकरी झाडांची संख्या | प्रमुख जाती |
| सिताफळ | 30*30*30 | 5*5 | 400 | 140 | बलानगर, फुले, पुरंदर, गूळ, जानकी |
| बोर | 60*60*60 | 5*5 | 400 | 140 | उमराण, कडाका, चुहारा, मेहरूण, नरेंद्र बोर नं.1, फुले शबरी |
| चिंच | 1*1*1 | 10*10 | 100 | 40 | प्रतिष्टान, नं.236,अकोला स्मुती |
| जांभूळ | 1*1*1 | 10*10 | 100 | 40 | कोकण,बहाडोली, स्थानिक |
| आवळा | 1*1*1 | 7*7 8*8 | 204 156 | 80 62 | कृष्ण, कांचन, निलम |
| कवठ | 1*1*1 | 10*10 | 100 | 40 | एल्लोरा, स्थानिक |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |