रब्बी हंगामासाठी या खतांवर एनबीएस आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता!! Fertilizer NBS Subsidy 2025

Fertilizer NBS Subsidy 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38,000 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली.

Fertilizer NBS Subsidy 2025

WhatsApp Group Join Now

Fertilizer NBS Subsidy 2025 केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रण तंत्रज्ञान!!

Fertilizer NBS Subsidy 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2025-26 (01/10/2025 ते 31/03/2026 पर्यंत ) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर पोषक तत्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

Fertilizer NBS Subsidy 2025 रब्बी हंगाम 2025-26 साठी अंदाजे 37,952.29 कोटी रुपयांची आवशक्यता असून ती 2025 मधील खरीप हंगामाच्या अर्थसंकल्पीय गरजेपेक्षा 736 कोटी रुपयांनी जास्त आहे.

WhatsApp Group Join Now

रब्बी 2025-26(01/10/2025 ते 31/03/2026 पर्यंत लागू ) साठी मंजूर दरांवर आधारित डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि एनपीकेएस (नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅश, सल्फर ) ग्रेडसह पी अँड के खतांवर अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. खतांच्या आणि कच्चा माल यांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडचा कल लक्षात घेऊन पी अँड के खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण केले आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment