पारंपारिक शेती परवडेना शेतकरी करीत आहेत शेतात नवनवे जुगाड! Farming Culture 2025

Farming Culture 2025 यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कायम व घोन्सा येथे नियमित आठवड्यातून एकदा बैल बाजार भरतो, तर वणी येथे होळी नंतर यात्रेदरम्यान बैल बाजार भरतो.

Farming Culture 2025

यामध्ये यात्रेदरम्यान, वनीत भरणारा जनावरांचा बाजार विदर्भात प्रसिद्ध आहे. काही शेतकरी शेतीसाठी यंत्राचा वापर करतात, तर काही शेतकरी अजूनही बैलाद्वारे शेती करतात.

राज्यात ज्वारीला मिळतोय का समाधानकारक दर? वाचा आजचे ज्वारी बाजारभाव!

सध्या बाजारात दर्जेदार बैलजोड्यांचे दर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या चाऱ्याच्या वाढलेल्या किंमती, चारा टंचाई व देखभाल खर्चामुळे पारंपरिक शेतीत वापरले जाणारे बैल शेतकऱ्यांना परवडेनासे झालेत. त्यामुळे ट्रॅक्टर कडे कला वाढला आहे.

WhatsApp Group Join Now

तसेच अनेक शेतकरी ट्रॅक्टर द्वारे शेताची मशागत करण्याकडे भर देत आहे. बदलते हवामान, शेती खर्चात वाढ आणि यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरकडे वळणारे शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हळूहळू गोधनाची संख्या ही झपाट्याने घटत चालली आहे. ही चिंतेची बाब मानली जात आहे.

Farming Culture 2025 मजुरांपेक्षा कमी खर्च

  • बैलजोडीच्या तुलनेत ट्रॅक्टर हे अधिक टिकाऊ कमी देखभाल खर्चाचे आणि वेळ वाचविणारे साधन ठरत आहे..
  • विशेषतः मध्यम व ज्यांच्याकडे शेती अधिक आहे, असे शेतकरी ट्रॅक्टरची खरेदी करताना दिसून येत आहेत.
  • कामाच्या वेळी लागणाऱ्या मजुरीची खर्चही ट्रॅक्टर मुळे कमी होतो.

Farming Culture 2025 ट्रॅक्टर खरेदीसाठी अनेक पर्याय झाले उपलब्ध

बाजारात अनेक ट्रॅक्टर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. शून्य डाऊनपेमेंट, हप्ता योजनेसारखे पर्याय उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टरकडे वाढतो आहे. काही शेतकरी बैल विकून त्याच पैशातून ट्रॅक्टरची आगाऊ रक्कम भरत आहेत.

WhatsApp Group Join Now

50 चाऱ्याची पेंडी 50 रुपयांना एक

सध्या चाऱ्याचे दर वाढले असून एक कडबा पेंडी सरासरी 50 रुपयांना मिळत आहे. उन्हाळ्याच्या मौसमात स्थानिक पातळीवर चारा उत्पादन घटल्याने चाऱ्याची टंचाई भासत आहे. परिणामी बैलांचे संगोपन करणे कठीण झाले आहे.

Farming Culture 2025 शेती पद्धतही बदलतेय

उत्पादन खर्च आणि पिकाला बाजारात मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतीतील खर्च कमी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. यातून गटशेती, समूहशेती तसेच ठराविक बाजारपेठेत समूहाने मालविक्रीसाठी पाठविण्यासाठी हे शेतकरी पुढाकार घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होत आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment