Farmer Success Story 2025 चरण : चरण (ता.शिरोळ) येथील पांडुरंग नायकवडी यांनी दहा गुंठ्यामध्ये काकडी लावली आहे. दीड महिन्यातच काकडी पीक जोमात आले.

गेली आठ-दहा दिवस रोज 70 ते 80 किलो काकडे रोज निघत आहे. काकडीस तर 80 किलो रुपये प्रमाणे गावातच विकली जात आहे.
दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर;
Farmer Success Story 2025 काकडी कोवळी व चवदार असल्याने लोकांची मागणी आहे. एक-दोन तासात 70 ते 80 किलो काकडीची विक्री होते. यामध्ये आईची सुद्धा मदत होते.

जून महिन्यात अखेर उत्पन्न आम्हाला मिळणार, असे पांडुरंग खात्रीने सांगतात. शेतकरी असल्याने ग्राहकास सुद्धा वजनापेक्षा जास्त काकडी देण्याचा दिलदारपणा पांडुरंग या शेतकऱ्याकडे आहे.
Farmer Success Story 2025 पांडुरंग यांना याबाबत विचारले असता काकडीचे बियाणे चांगले लागले आहे. पीक जोमाने आल्याने काकडीस वाढ असल्याने रोज काकडी काढायला जावे लागते.
जून झालेल्या काकडीस मागणी कमी व दर सुद्धा कमी मिळतो. या उलट कोवळ्या काकडीस ग्राहकांची मागणी अधिक आहे. आठ ते दहा वेळा पाणी, कीड फवारणीकडे सुद्धा लक्ष असल्याचे ते म्हणतात.
Farmer Success Story 2025 यावेळी काकडीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कुटुंबास चांगला हातभार लागत असल्याचे आवर्जून सांगायला विसरत नाही. पांडुरंगाचा हा शेतीतील प्रयोग इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |