Farmer Success Story 2025 कुंडल बांबवडे (ता. पलूस) येथील तरुण शेतकऱ्यांने 20 गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात 9 लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात 15 लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ही यश कथा आहे बांबवडे (ता. पलूस) तरुण शेतकरी विक्रम संकपाळ यांची. येथील काळ्या मातीच्या 20 गुंठे क्षेत्रात शेताची उभी आडवी नांगरट करून, तीन फुटी बेड केला त्यामध्ये 7 टेलर शेणखत घालून शिफारशीत अंतराप्रमाणे खड्डे काढून घेतले.

यामध्ये व्हीएनआर जातीचे पेरू वाण जानेवारी 2022 साली लागण केली, यासाठीची रोपे कलम केलेली वापरली. साधारण 150 रुपये प्रमाणे 400 रुपये 10 बाय 6 अंतरावर लावून जास्तीत जास्त हवा खेळती राहील अशी लागण केली आणि बुडक्यात ठिबक टाकले. ठिबक द्वारे खते दिल्याने खतांची मात्रा आवश्यक तेवढी देऊन खर्च आटोक्यात आणला गेला. पाणी आणि माती परीक्षणानुसार वेळोवेळी खतांची मात्रा देऊन झाडांची निगा राखली.
शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपले;
Farmer Success Story 2025 त्यानंतर झाडे टुमदार झाल्यावर दहाव्या महिन्यात त्यांची छाटणी घेतली आणि पीक धरले तिथून सात महिन्यात पहिले पीक घेतले. या वीस गुंठे क्षेत्रातून पहिल्या वर्षी 5 टन पेरूचा माल आला तो मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवला आणि दर प्रति किलो 65 रुपये लागला होता याचे अंदाजे 3 लाख रुपये झाले.

त्यानंतर झाडांची लगेच छाटणी घेऊन पुन्हा पीक धरले आणि पुढील सात महिन्यात पुन्हा पेरू काढायला आले आणि 9 टन पेरूचा माल निघाला तो म्हैसूर येथे पाठवून त्याला प्रतिकिलो 72 रुपये दर मिळाला यातून 6 लाखांचे उत्पन्न मिळाले. आता पेरू बागेचे तिसरे पीक आहे. यंदा खतांची मात्रा आणि कीटकनाशके वेळेच्या वेळी देऊन यांना 15 टना पेक्षा जास्त उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे.
Farmer Success Story 2025 उन्हाच्या झळा वाढताना लहान पेरू उन्हाच्या तडाख्यामुळे पिवळा पडत असल्याने झाडांना शेडनेटने झाकून घेतले जाते. तसेच पेरूला पिशवी घातल्याने फळांचे संरक्षण केले जाते. पेरू पिकाला जास्त करून मिलीबग कीड येत असल्याने यासाठी कीटकनाशक फवारणी करूनही कीड आटोक्यात आणून जास्तीत जास्त सुदृढ पाने ठेवण्याचा प्रयत्न केला.
Farmer Success Story 2025 शेती परवडत नाही, क्षेत्र कमी आहे असे सांगण्यासाठी ही पेरूची लागवड एक पथदर्शक उदाहरण आहे. कमी भांडवलात, वेळच्यावेळी नियोजन केले तर 20 गुंठ्यात पेरूच्या लागवडीतून लखपती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही हे या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे.
“ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून खड्डे काढणे पासून ते पीक जाईपर्यंत मजुरी खर्च आणि सामग्री खर्च दिला जातो यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांनी जॉब कार्ड काढणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. – संभाजी पटकुरे, तालुका कृषी अधिकारी, पलूस”
” पेरू पिकाला कमी रोग आहे आणि आटोक्यात येणारा असल्याने थोड्या काळजीने चांगले उत्पन्न घेता येते. यासाठी पाण्याचे खतांचे आणि शेतीच्या कामांचे वेळेत नियोजन महत्वाचे आहे. -विक्रम संकपाळ शेतकरी”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |