Farmer ID Apply Online 2025 देशभरातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी सरकारने शेतकरी ओळखपत्राची नोंदणी अनिवार्य केली आहे. या माध्यमातून अनुदान, कर्जसुविधा आणि शेतीविषयक विविध योजनांचा लाभ सहज मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही नोंदणी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असून, शेतकरी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय ?
शेतकरी ओळखपत्र हे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. या ओळखपत्राच्या साहाय्याने अनुदान, पीक विमा, कर्जसुविधा आणि शेतीविकास योजनांमध्ये शेतकऱ्यांना त्वरित पात्रता मिळेल.
परिणामी, सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल.याशिवाय, बँकांकडून कर्ज घेताना हे ओळखपत्र ओळख व पात्रतेचा आधार म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे, त्यामुळे कर्जमंजुरी प्रक्रिया सुलभ होईल.
आवश्यक कागदपत्रे
1 | आधार कार्ड |
2 | पॅन कार्ड |
3 | बँक खाते तपशील |
4 | उत्पन्नाचा दाखला |
5 | जात प्रमाणपत्र (असल्यास) |
6 | रहिवासी पुरावा |
7 | मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी |
8 | पासपोर्ट साईझ फोटो |
“सर्व कागदपत्रे स्कॅन करून अधिकृत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.”
राज्यातील ‘या’ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगत आहेत हवामान तज्ञ..
कोण अर्ज करू शकतो?
- शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार:
- भारतीय नागरिक असावा.
- किमान 18 वर्षे वय असणे आवश्यक आहे.
- कृषी व्यवसायाशी संबंधित असावा.
ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
- शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी AgriStack पोर्टल उपलब्ध आहे.त्याला भेट देऊन खालील प्रक्रिया करावी.
- संकेतस्थळावर “नवीन खाते तयार करा” वर क्लिक करा.
- आधार क्रमांक प्रविष्ट करून ओटीपीद्वारे पडताळणी करा.
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी नोंदणी करून पासवर्ड तयार करा.
- लॉगिन करून “शेतकरी म्हणून नोंदणी करा” पर्याय निवडा.
- आवश्यक माहिती भरून वरील कागदपत्रे अपलोड करा.
- “ई-साइन” प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करा.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय ?
- पुढे जाऊन अर्जदाराला नोंदणी यशस्वी झाल्याची पावती मिळेल.
- ही पावती डाउनलोड करून जतन करणे आवश्यक आहे.
- नोंदणी मंजूर झाल्यानंतर शेतकरी ओळखपत्र जारी केले जाईल.
सरकारच्या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा
सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र, शेतकरी ओळखपत्रामुळे संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि या सुविधेचा लाभ घ्यावा.
अधिकृत संकेतस्थळ | https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ |
हेल्पलाइन नंबर | 022-6789001 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |