शेतकऱ्यांनो…! फार्मर आयडी नसेल तर, मिळणार नाही पिक विमा योजनेचा लाभ; Farmer ID 2025

Farmer ID 2025 पुणे: यंदाच्या मृग बहारातील फळपीक विमा योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले असून वेगवेगळ्या फळ पिकांसाठी अर्जासाठीची अंतिम मुदत वेगवेगळी आहे.

Farmer ID 2025

WhatsApp Group Join Now

फळफिक विमा योजना राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स, जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोंम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी, या विमा कंपन्या मार्फत राबविण्यात येत आहे. पण यंदा फळपिक विमा साठी अर्ज करायचा असेल तर कृषी विभागाने एक महत्वाची अट घातली आहे.

कृष्णाचे पाणी कधी येणार? टप्पा 6 ची निविदा प्रक्रिया सुरूच नाही वाचा सविस्तर; 

Farmer ID 2025 दरम्यान राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समिती मध्ये दिलेल्या सूचनानुसार, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे.

त्यामुळे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व अंबिया बहार साठी ॲग्री स्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, अशा शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही.

WhatsApp Group Join Now

गाव पातळीवर शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक अंतर्गत नोंदणी करता येत असून, फार्मर आयडी देण्यात येतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार ॲग्री स्टॅक अंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही एक कोटींच्या वर गेली असून बहुतेक शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे.

Farmer ID 2025 फळपिक विमा योजनेबरोबरच खरिपातील पिकांच्या विमा अर्जासाठी सुद्धा फार्मर आयडी आवश्यकता असणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी विभागाकडूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment