Farmer ID 2025 केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. यात लाखो शेतकरी सहभाग घेत नोंदणी करत आहे.

शिवाय पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी देखील हा फार्मर आयडी अनिवार्य आहे. आज मितीस महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे? कुठल्या जिल्ह्यात आज दिवसभरात सर्वाधिक नोंदणी झाली ते पाहूया….
पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जून मध्ये; पण ‘हे’ कराल तरच मिळतील पैसे!
Farmer ID 2025 देशभरातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परिणामी देशातील लाखो शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला आहे.

आज मितीस देशात 98 लाख 18 हजार 342 शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे Agri Stack या संकेतस्थळावर दिसून येते. यापैकी 80 लाख 15 हजार 714 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी Approv करण्यात आले आहे.
तर महाराष्ट्रातील स्थिती पाहता फार्मर आयडीची नोंदणी संख्या वाढते आहे. आज दिवसभर दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात
जिल्हा | नोंदणी |
कोल्हापूर | 457 |
लातूर | 386 |
नागपूर | 343 |
धाराशिव | 333 |
बीड | 308 |
अकोला | 27 |
पालघर | 18 |
वर्धा | 11 |
ठाणे | 04 |
नंदुरबार | 02 |
शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे?
- सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर फर्मर आयडी बनवले जात आहेत.
- याशिवाय राज्य सरकारी वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता मोहीम राबवत आहेत.
- शेतकरी पंचायत स्तरावर शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी देखील मदत घेऊ शकतात.
अधिकृत लिंक | https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |