Farmer ID 2025 पुणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने अॅग्रीस्टॅक या डिजीटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे.

कागदपत्रे
- आधारकार्ड
- 7/12 किंवा नमुना 8 अ
- आधारकार्ड सलग्न असलेला मोबाईल (ओटिपी करिता)
‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी’
Farmer ID 2025 फार्मर आयडी का बनवावी?
ज्याप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधारकार्ड आहे. त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर आयडी राहणार आहे. त्यामुळे 7/12 शी संबधीत सर्व लाभाकरिता फार्मर आयडी अत्यावश्यक होणार आहे.

Farmer ID 2025 फार्मर आयडी न बनविल्यास
- पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ बंद होईल.
- नमो शेतकरी अंतर्गत लाभ मिळणार नाही.
- पीक विम्याचाही लाभ घेता येणार नाही.
- पीक कर्ज मिळनार नाही.
- धान खरेदी तथा बोनस थांबून जाईल.
- कृषीविषयक सर्व योजनाकरिता आवश्यक
- नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान मिळणार नाही.
- जमीन खरेदी विक्री करता येणार नाही.
- कर्ज माफी लाभ घेता येणार नाही. इ.
अशाप्रकारे अनेक लाभाकरिता फार्मर आयडी मागविला जाईल. तेव्हा शेतक-यांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आजच फार्मर आयडी बनवून घ्या.
सर्व शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक लवकरात लवकर (Farmer ID) तयार करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |