Farmer ID 2025 केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विषयक योजनांचा लाभ जलद आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ऍग्रीस्टॅक’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन माहिती, आधार संलग्न माहिती आणि भू-संदर्भीय माहिती शेतकरी ओळख क्रमांका सोबत जोडली जाणार आहे.

हा क्रमांक नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, पिक विमा योजना, बाजारपेठ माहिती, तसेच किमान आधारभूत किमतीवर खरेदीसाठी नोंदणी सहज आणि सोपी होईल.
तसेच, शेत जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहिल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळू शकेल.
सिंचनासाठी या धरणातून 4800 क्युसेक पाण्याचे विसर्ग; दुष्काळी भागांना दिलासा
वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सामायिक सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Farmer ID 2025
Farmer ID 2025 त्यासाठी आधार कार्ड, आधार संलग्न, मोबाईल क्रमांक आणि सातबारा, 8-अ उतारा घेऊन जावे.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |