शेतकऱ्यांनो, तुमचं भविष्य सुरक्षित करा फार्मर आयडी कार्ड मिळवा ! Farmer id 2025

Farmer id 2025 नमस्कार वाचकहो, फार्मर डिजिटल आयडी नक्की काय आहे कसा वापरायचा कुठे वापरायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. 60 % पेक्षा अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. शेतकऱ्यांसाठी सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकार शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी सतत प्रज्ञाशील असते. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीएम किसान योजना सह इतर अनेक योजनांचा फायदा देण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षात राबवण्यात आली आहे.

Farmer id 2025

WhatsApp Group Join Now

2025 नवीन या वर्षात शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे. देशातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक आयडी दिला जाईल. त्यावर बारा अंकी नंबर असेल आणि ते कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचे ओळखपत्र असेल शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे.Farmer id 2025

Table of Contents

फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय ? Farmer id 2025

देशातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत, डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने ‘फार्मर आयडी कार्ड ‘ तयार करण्याची योजना आखरी आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाराला त्यांचा आधार क्रमांक लिंक करायचा आहे. सातबारावर एकापेक्षा अधिक नावे असल्यास त्या सर्वांचे आभार क्रमांक लिंक करणे अनिवार्य आहे. या शेतकऱ्यांच्या जमीन नोंदीचा तपशील जोडला जाईल. तसेच या कार्डमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहिती बरोबरच पेरणी केलेल्या पिकाचा तपशील ही नोंदविला जाईल. भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा योजनांचे लाभ याच unique farmer id फार्मर आयडी माध्यमातून मिळणार आहे. जसे की, किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणारे 6000/- रुपये शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय मिळणार नाहीत.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांची “ॲग्रीस्टॅक” योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ‘युनिक फार्मर आयडी’ आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची (लिंक करण्याची) मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp Group Join Now

फार्मर आयडी कसा काढायचा ?

शेतकऱ्यांना फार्मर आयडी हे ओळखपत्र देण्यासाठी देशभरात प्रत्येक गावात शिबिरे आयोजन केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी गावोगावी ज्या ठिकाणी कॅम्प होतात, त्या कॅम्पमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या सोबत सातबारा उतारा, आपले आधार कार्ड व आधार कार्ड सोबत लिंक असणारा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.Farmer id 2025

गावातील शेतकऱ्यांनी या कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार करून घ्यायचा आहे. प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला एक युनिक आयडी दिला जाईल.

हे डिजिटल आयडी कसे काम करेल Farmer id 2025

शेतकऱ्यांना अनेक योजनांचा फायदा एका आयडी कार्डच्या माध्यमातून घेण्यात येईल. पीएम किसान योजना, पीएम विमा योजना, माती परीक्षण, माती आरोग्य कार्ड यासारख्या अनेक योजनांचा फायदा या फार्मर डिजिटल आयडी कार्ड च्या माध्यमातून घेता येईल.

एका आयडी कार्ड मार्फत शेतकरी सहजपणे योजनांचा लाभ घेऊ शकतील. प्रत्येक शेतकऱ्याचा एक डिजिटल डेटा तयार होईल. त्या शेतकऱ्याने वर्षभरात घेतलेल्या योजनांचा फायदा, त्याला देण्यात आलेले अनुदान आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर सरकारकडे उपलब्ध होईल.

शेतकऱ्याला कृषी कर्ज योजना आणि आर्थिक मदतीविषयीच्या सर्व योजनांचा फायदा या कार्डद्वारे घेता येणार आहे. यामुळे देशभरात एकूण किती शेतकरी काम करतात हे याचा आकडा सरकारकडे उपलब्ध होईल त्यावरून योजना राबवण्यासाठी सरकारकडे मोठा डेटा उपलब्ध होईल.Farmer id 2025

त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्या जवळ किती जमीन आहे हे देखील लक्षात येईल आणि अल्पभूधारक, बागायतदार, बागायती क्षेत्र, जिरायती क्षेत्र याची आकडेवारी देखील समोर येईल.

Farmer id 2025 फार्मर डिजिटल आयडी कार्ड देण्यामुळे काय होईल

भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. पीएम किसान योजना, पीएम विमा योजना इत्यादी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी डिजिटल ओळख कार्ड उपयोगी येईल. पात्र लाभार्थ्याकडे योजनेची मदत पोहोचवण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरेल. या कार्डमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. त्याला युनिक आयडी कार्डद्वारे सेवा आणि आर्थिक मदत देण्यात येईल.Farmer id 2025

भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध नाही. जिल्हा सहकारी बँका, सरकारी बँका, विविध एजन्सी यांच्यामार्फत काही योजना राबवण्यात येतात. कृषी खात्यासह इतर काही खात्यांमध्ये मदत पोहोचवण्यात येते. हे सर्व एकत्र आणण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे आहे.

सर्व राज्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी त्यांची स्थिती, त्यांच्याकडील शेत जमीन, क्षेत्र, शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान, शेतकऱ्यांना मिळालेला लाभ, शेतकऱ्यांना मिळालेला सवलती, योजनेअंतर्गत मिळालेली सबसिडी, त्यांच्या खतांचा वापर, जमिनीचा पोत, विविध फळ वर्गीय पिके, पारंपारिक पिके, रोग अळीचा प्रादुर्भाव, कृषी विद्यापीठांचा कारभार, तज्ज्ञांचा कृषीक्षेत्राला होणारा फायदा, कृषी अधिकाऱ्यांच्या कृषी विभागासाठी होणारा फायदा, कृषी विभाग योजना राबवण्यासाठी हवामान बदला आधारे शेतीत बदल सुचविण्यासाठी आणि इतर अनेक कामासाठी फार्मर डिजिटल आयडी चा उपयोग होणार आहे.Farmer id 2025

Farmer id 2025 या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटवणे सोपे जाईल. जमिनीचे रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होतील. सरकारकडे यामुळे मोठा डेटा उपलब्ध होईल. एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती पाहता येईल.Farmer id 2025

देशात कृषी योजनांचा अनेक लाभार्थी फायदा घेतात. कृषी खात्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्यासाठी विविध योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. या कार्डमुळे पारदर्शकता वाढेल.

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योजना राबवते, परंतु नेमके त्याचे किती लाभार्थी आहेत? त्यासाठी कोणत्या बँकेकडून मदत होते? कृषी क्षेत्राची अशी माहिती एकाच ठिकाणी नाही. आकडेवारीतील हा घोळ संपवण्यासाठी आणि प्रत्येक योजनेचे लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी या कार्डचा उपलब्ध होणार आहे.Farmer id 2025

11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार हे डिजिटल कार्ड

देशातील ११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांपैकी 6 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष 2024-25, 3 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष 25-26 आणि 2 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये हे डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे.

यासाठी ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाने या विषयीचा पत्रव्यवहार केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार आणि कृषी खात्यांना याविषयीचे पत्र देखील दिले आहे. Farmer id 2025

फार्मर आयडी कार्ड का महत्त्वाचे आहे ? Farmer id 2025

फार्मर आयडी कार्ड चे अनेक फायदे आहेत यातील मुख्य फायदे पुढील प्रमाणे आहेत :

  • शासकीय योजनांचा लाभ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पिक विमा योजना, आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे.
  • सवलतीत खते आणि बियाणे : शेतकऱ्यांना अनुदानित दराने खते बियाणे आणि शेतीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचे ठरते.
  • कर्ज उपलब्धता : शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांकडून फार्मर आयडी मागितले जाते.
  • सिंचन योजनांमध्ये प्रवेश : सौर पंप योजना किंवा अन्य सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य आहे.
  • कृषी विषयक प्रशिक्षण : सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कृषिविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे.Farmer id 2025

ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी लागणारी प्रक्रिया

शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय, CSC केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) किंवा महाभुमी पोर्टल याचा उपयोग करून अर्ज करावा लागतो.Farmer id 2025

स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया :

  1. तुमच्या गावातील तालुका कृषी कार्यालयाला भेट द्या.
  2. अर्जासाठी आवश्यक नमुना फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  4. तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  5. तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड दिले जाईल.

फार्मर आयडी काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

कागदपत्राचे नाव कशासाठी आवश्यक आहे ?
1. आधार कार्डशेतकऱ्याची ओळख सिद्ध करण्यासाठी.
2. 7/12 आणि 8अ उताराजमीन मालकीचा पुरावा म्हणून.
3. फोटो (पासपोर्ट साईज)अर्जावर चिकटवण्यासाठी.
4. बँक खाते पासबुकयोजनांचा लाभ बँक खात्यात जमा करण्यासाठी.
5. राशन कार्ड (जर असेल तर)कुटुंबातील व्यक्तींची माहिती दर्शवण्यासाठी.
6. मोबाईल नंबरआवश्यक अपडेट साठी.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin

अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा video credit : Mumbai Tak

फार्मर आयडी काढण्यासाठी फी किती लागते ?
  • फार्मर आयडी काढण्यासाठी फार कमी किंवा कोणतेही शिल्लक लागणार नाही.
  • CSC केंद्रामध्ये अर्ज केल्यास 10 ते 50 रुपये सेवा शिल्लक आकारले जाऊ शकते.
फार्मर आयडी काढल्यानंतर काय करावे ?
  • मिळालेल्या फार्मर आयडी कार्डची योग्य प्रकारे देखभाल करा.
  • जर सरकारी योजनांसाठी अर्ज करत असाल तर फार्मर आयडी कार्डचे झेरॉक्स प्रति तयार ठेवा.
  • तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा फार्मर आयडी काढण्यासाठी प्रोत्साहित करा.
निष्कर्ष

फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे कार्ड शेतकऱ्यांना शासकीय योजनांमध्ये प्रवेश देण्याबरोबरच त्यांचे आर्थिक व सामाजिक हक्क बजावण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरते. शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर हे कार्ड काढून घ्यावे आणि त्यांच्या शेतीसाठी उपलब्ध लाभांचा फायदा घ्यावा.Farmer id 2025

Leave a Comment