Falbag Lagwad Yojana 2025 नाशिक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2025-26 अंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड आणि आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू व आवळा या फळ पिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच आळंबी डाळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबींचा समावेश होतो.

योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्व्ये केले आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे.
एक रुपयात पिक विमा बंद! आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना;
Falbag Lagwad Yojana 2025 जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
- दरम्यान योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधाचा वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी बाबीमुळे फळभागांची उत्पादकता कमी होते.
WhatsApp Group
Join Now

- त्यामुळे जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक ठरते.
- म्हणजे जुन्या आणि उत्पादन क्षमता कमी झालेल्या फळबागांची उत्पादकता वाढवणे.
- यासाठी छाटणी योग्य खत व्यवस्थापन किडी आणि रोगांवर नियंत्रण तसेच पाणी व्यवस्थापनासारख्या उपाययोजना केल्या जातात.
Falbag Lagwad Yojana 2025 ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक असणारे कागदपत्र कागदपत्रे
- सातबारा
- आठ अ
- आधार कार्ड ची छायांकित प्रत
- आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पाण्याची छायांकित प्रत
- जातीच्या प्रमाणपत्र (अनुजाती/अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
- यापूर्वी कोणत्याही योजनेतून लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
- पासपोर्ट फोटो
| अधिकृत लिंक योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकरी | https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login |
| संपर्क | योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |