Fal Pik Vima Yojana 2025 सोलापूर : खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसान भरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानिकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे.

विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या फळ पिकाचे केंद्र व राज्य शासन हिस्सा भरणार नाही. सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचा मृग बहारासाठी केंद्र व राज्य शासन विमा हप्ता भरणार नाही. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान खरेतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर होते.
उसाच्या एफआरपीमध्ये वाढ; राज्यातील शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा 15 हजार कोटी रुपये जादा मिळणार!
Fal Pik Vima Yojana 2025 पेरणी झाल्यानंतर बरेच दिवस पाऊस गायब होतो, पेरणी झालेल्याची वाट सुरू असतानाच, बराच दिवस पाऊस विश्रांती घेतो, पिकांची चांगली वाढ होत असताना, अचानक वारे व मोठा पाऊस पीक आडवे करतो, पीक काढणीला आल्यानंतर बरेच दिवस पाऊस पडत राहिल्याने पिकांचे नुकसान होते.

अशावेळी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत असायची. इंटीमेशन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्या पटीत विमा कंपनी नुकसान भरपाई देते.
Fal Pik Vima Yojana 2025 मात्र, राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला असून, केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामुळे सध्या अतिवृष्टी, सतत धार पावसामुळे होणारे पीक नुकसान प्रमाणे यापुढे शेतकऱ्यांचे नुकसान मिळणार नाही.
याशिवाय हवामान आधारित फळपिक विमा योजनेतही मोठे बदल केले आहे. 2024-25 व 2025-26या दोन वर्षात मृग बहारासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
मृग भारत अंबिया बहारात केंद्र व राज्य शासन प्रत्येकी 15 हजार 200 रुपयांचा हिस्सा भरणार आहे. मात्र मृग बहारात सरकार एक दमडी भरणार नाही.
Fal Pik Vima Yojana 2025 विम्याचा हप्ता केंद्र भरणार नाही
- मृग बहारात अमरावती जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, लिंबू, पेरू, सिताफळ
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लिंबू ,पेरू, चिकू, सीताफळ
- जालना जिल्ह्यातील मोसंबी, डाळिंब
- परभणी जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू, चिकू, सीताफळ
- धाराशिव जिल्ह्यात डाळिंब, मोसंबी, लिंबू, चिकू, पेरू, सीताफळ,
- यवतमाळ व हिंगोली जिल्ह्यात मोसंबी तर आंबिया बहारात अमरावती, अकोला, परभणी, धाराशिव, नागपूर, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मोसंबी, डाळिंबाचा विम्याचा हप्ता केंद्र व राज्य शासन भरणार नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |