फळपीक विमा काढला का? ‘या’ पिकांसाठी आज अखेरची मुदत; Fal Pik Vima 2025

Fal Pik Vima 2025 नाशिक: हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी मृग बहरात लिंबू, सीताफळ, चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्ष या फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Fal Pik Vima 2025

Fal Pik Vima 2025 योजनेत सहभागीसाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. मोसंबी, चिकू 30 जून, तर लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्र 14 जून, डाळिंब १४ जुलै, सिताफळ 31 जुलै पर्यंत पिक विमा उतरवता येणार आहे.

शेतकऱ्यांना द्राक्षाच्या पुढील हंगाम वाया जाण्याची भीती का आहे? वाचा सविस्तर;

Fal Pik Vima 2025 द्राक्ष या फळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी 19 हजार रुपये आहे. द्राक्ष बहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असा आव्हान कृषी विभागाने केले आहे. असे देखील कळवण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्याने अद्यापही विमा काढला नसल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

WhatsApp Group Join Now

Fal Pik Vima 2025 फळपिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत, हवामानावर आधारित फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. ज्यामध्ये डाळिंब, संत्र, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई आणि स्ट्रॉबेरी या नऊ फळपिकांचा समावेश आहे.

Fal Pik Vima 2025 योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी पुढील प्रमाणे आहे….

ऍग्री स्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, जिओ टॅग फोटो ई-पीक पाहणी बंधनकारक आहे, ई-पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो.

Fal Pik Vima 2025 ई-पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात करू शकतात. जास्त माहिती घेण्यासाठी नजीकच्या विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment