Effects of cold on crops शेतीचे उत्पादन आणि गुणवत्ता ही त्या त्या भागातील प्रादेशिक हवामानावर अवलंबून असते. हिवाळ्यात तापमानातील घट म्हणजे थंडीच्या लाटा, गारपीट आणि त्यामुळे पीक गोठणे याचा पिकाच्या Effects of cold on crops उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मटकी, ज्वारी, मका ऊस यासारखी पिके थंडीच्या या परिणामांना बळी पडतात. यापूर्वी आपण वाढत्या थंडीचा ऊस पिकावरील परिणाम पाहिलेला आहे. या लेखात आपण हिवाळ्यातील तीव्र हवामानाचा महाराष्ट्रातील प्रमुख पिकावर होणाऱ्या प्रभावांचा Effects of cold on crops अभ्यास करून, त्या संदर्भात करावयाच्या योग्य उपयोग योजनेची माहिती घेणार आहोत.

विविध पिकासाठी विद्यापीठांना सुचवलेल्या उपाययोजना Effects of cold on crops:
गहू-
गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. गव्हाच्या वाढीसाठी साधारण 10 ते 25 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. मात्र तापमान अचानक कमी झाल्यास गव्हाच्या पानावर दहा(फ्रॉस्ट बर्न) होतो. त्यामुळे पाणी जळल्यासारखे दिसतात. अचानक तापमानात घट झाल्यास पानांचे पृष्ठभाग गोठतात. ज्यामुळे पानांची कार्यक्षमता कमी होते त्याचा परिणाम पीक वाढीवर होऊन उत्पादनात घट येते. हेच तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेल्यास गव्हाचे पीक पूर्णतः नष्ट होऊ शकते.
अशावेळी तापमान कमी झाल्यास, गव्हाचे पिकात वेळेवर सिंचन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीतील तापमान स्थिर राहून पिकांचे संरक्षण होते. Effects of cold on crops
पाण्याच्या कमी प्रमाणामुळे गव्हाच्या मुळांचे कार्य कमी होते. याचा परिणाम पिकाच्या(Effects of cold on crops) वाढीवर आणि दाण्यांच्या आकारावर होतो
हरभरा-
हरभरा हे सुद्धा रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. हरभऱ्याच्या पिकाला कमी तापमान सहन करण्याची क्षमता असली तरी अति थंडीने नुकसान होते. थंडीमुळे हरभऱ्याच्या फुलांची गळती होते. ढगाळ वातावरणात घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी कोराजन, अम्प्लिगो, अलीका, बॅराझाईड यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. हरभऱ्याच्या पानावर थंडीमुळे आणि हिवाळ्यात पाण्याला अतिरेकाने काळसर डाग पडतात याचेच रूपांतर पुढे जाऊन बुरशीजन्य आजारात होते. यामुळे उत्पादनात मोठी घट होते. बरेचदा पूर्ण पीकच नष्ट होते.Effects of cold on crops
रोपावस्थेत या रोगापासून संरक्षण मिळण्याकरता ट्रायकोडर्मा या जैव बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
हरभऱ्याच्या पिकावर योग्य प्रमाणात तुषार सिंचन वापरून तापमान स्थिर ठेवता येते आणि बुरशीजन्य आजारापासून बचाव करता येतो.
रब्बी ज्वारी-Effects of cold on crops
ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धान्य पीक आहे. जे हिवाळ्यात रब्बी ज्वारी या नावाने मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. अति थंडीमुळे या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ज्वारीच्या दाण्याच्या आकारावर आणि त्यातील पोषणमूल्यावर थंडीचा विपरीत परिणाम होतो थंडीच्या लाटेमुळे ज्वारीच्या पानावर फ्रॉस्ट (पीक गोठते) होतो. त्यामुळे पानांचा रंग बदलतो आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. तापमानात घट्ट झाल्यामुळे ज्वारीच्या दाण्यांचा विकास खुंटतो त्यामुळे दाण्यांचे वजन कमी भरते.
ज्वारीच्या शेतात मातीचे अच्छादन (मल्चिंग) करून मुळावर होणारा थंड हवामानाचा परिणाम Effects of cold on crops कमी करता येतो.Effects of cold on crops
तूर-
तू हे रब्बी हंगामातीलच एक पीक आहे. अति थंडीमुळे तुरीच्या फुलांच्या गळतीत वाढ होते. तापमानात घट झाल्यास तुरीच्या झाडांची वाढ खुंटते आणि फुलगळ वाढते.
तुषार सिंचनच्या सहाय्याने पाणी देऊन, तुरीच्या पिकाचे संरक्षण केले जाऊ शकते.
कांदा आणि लसूण-Effects of cold on crops
लागवडीनंतर कांदा आणि लसूण पिकांवर दव किंवा धोके पडल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. डायफेनोकोनाझोल 15 मिली किंवा टेब्यूकोनाझोल 15 मिली किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन+ टेब्यूकोनाझोल15 मिली 15 लिटर पाण्यातून 15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून बुरशीनाशकांची फवारणी करावी.
जास्त कोरडे किंवा ढगाळ हवामान असल्यास रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 25 मिली किंवा फिप्रोनील 20 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.Effects of cold on crops
ऊस-
ऊस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे. अति थंडीमुळे त्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो. थंडीची तीव्रता अधिक असेल तर उसाच्या उगवण क्षमतेत घट होते, त्यामुळे उगवणीचा कालावधी वाढतो. पानावर पिवळसर किंवा जांभळ्या रंगाचे डाग, पानांचे करपणे, मुळांची वाढ खुंटणे असे दुष्परिणाम दिसून येतात. मुळांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे उसाच्या पोषणात अडथळा येतो. त्यामुळे पोंग्यातील वाढ थांबते. पानावर पांढरे किंवा हिरवळ पट्टे दिसतात ज्याला कोल्ड क्लोरोसिस असे म्हणतात.
थंडीच्या दिवसात ऊसाला योग्य प्रकारे सिंचन करावे. जमिनीचे आच्छादन करण्यासाठी उंच वाढणाऱ्या गवताची लागवड करावी. यामुळे थंड वाहणाऱ्या वाऱ्यांनाही अडथळा निर्माण होतो. आपल्या कृषी सेवा केंद्र संचालकाच्या सल्ल्यानुसार शिफारशीत खत व्यवस्थापन करावे.
मल्चिंग पेपर टाकून भाजीपाला करायचा आहे ? मल्चिंग करण्याचे फायदे खर्च आणि अनुदान
पीक नुकसानीचे व्यवस्थापन: Effects of cold on crops
हिवाळ्यात तापमानात होणारी तीव्र घट, थंडीच्या लाटा, गारपीट, दव आणि पीक गोठणे यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होतो. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
1) तुषार सिंचन प्रणालीचा वापर
तुषार सिंचन हा पाण्याचा नियंत्रित वापर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. या प्रणालीद्वारे पिकावर पाण्याची फवारणी मारून, पानावरील तापमान नियंत्रित ठेवता येते. तसेच मातीतील ओलावाही टिकून राहतो. मातीचे तापमान नियंत्रित राहिल्यामुळे, थंडीत पिकावर होणारा दुष्परिणाम कमी होतो. तापमान नियंत्रित राहिल्यामुळे पानावर फ्रॉस्ट होण्याची शक्यता कमी होते यामुळे पिकांच्या पानांचे संरक्षण होते. परिणामी उत्पादनात वाढ होते. विशेषतः गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी हे खूपच उपयुक्त आहे.
2) आच्छादन (मल्चिंग)
कडाक्याच्या थंडीत मातीतील ओलावा टिकवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आच्छादन. मातीवर पालापाचोळा, पाचट किंवा प्लास्टिकच्या पेपरचे आच्छादन केल्यामुळे मातीचे तापमान वाढून पिकांचे संरक्षण होते. पिकांची मुळे अधिक कार्यक्षम राहतात तसेच थंडीमुळे होणाऱ्या दहा पासून पिकांचे संरक्षण होते.Effects of cold on crops
3) वेळेवर सिंचन
थंडीच्या दिवसात पाण्याची कमतरता असल्यास पिकांची मुळे पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत नाहीत. त्यामुळे पिकांची वाढ थांबते. यासाठी पिकांना योग्य वेळेत पाणी देणे आवश्यक आहे. योग्य वेळी नियमित सिंचनामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो त्यामुळे फ्रॉस्ट चा परिणाम कमी होतो.Effects of cold on crops
4) शेडनेट मधील शेती
शेडनेटचा वापर करून पीक लागवड केल्यामुळे थंडीपासून पिकांचे संरक्षण होते. तसेच पॉलिहाऊस किंवा शेडनेटचा वापर केल्यास, हवामानात होणार तीव्र बदलामुळे पिकांचे जे नुकसान होते, ते टाळता येते. पॉलिहाऊस मध्ये नियंत्रित तापमानामुळे पिकांचे संरक्षण होते. भाजीपाला आणि फुल शेतीसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते.Effects of cold on crops
5) रासायनिक उपाययोजना
थंडीच्या दिवसात पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर योग्य बुरशीनाशक तसेच गरजेनुसार कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे.Effects of cold on crops
अति थंडीमुळे होणारे पानगळ आणि फुलगळ टाळण्यासाठी एन. ए. ए सारख्या काही हार्मोन्सचा वापर करता येतो. जेणेकरून अकाली होणारी फुलगळ आणि फळगळ रोखता येते.
6) संरक्षक जाळी
बरेचदा गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. द्राक्ष, डाळिंब, ऊस यासारख्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी गारपीट विरोधी संरक्षण जाळीचा वापर करता येतो. ज्यामुळे फळांचे आणि पिकाचे नुकसान टाळता येते.Effects of cold on crops
7) पिक विमा योजना Effects of cold on crops
हिवाळ्यात हवामानातील होणाऱ्या तीव्र बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना विमा योजनेद्वारे संरक्षण मिळते. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरावा.
हिवाळ्यातील थंडीच्या लाटांचा मुकाबला करण्यासाठी Effects of cold on crops शेतकऱ्यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार नियोजन करावे.
हवामान आधारित पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा अवलंब केल्यास वातावरणातील अनिश्चिततेवर मात करून शेतकऱ्यांना आपले उत्पादन वाढवता येईल.Effects of cold on crops
याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होईल.