पिक पाहण्यासाठी सहाय्यकांच्या मानधनात वाढ; राज्य सरकारचा निर्णय, E Pik Pahani 2025

E Pik Pahani 2025 डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहायकांना ओनर्स प्लॉट निहाय मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी 27 तारीख 27 घेतला आहे. शासन निर्णयानुसार आता तलाठी सहाय्याकाला एकल पिकासाठी प्रति प्लॉट 10 रुपये आणि मिश्र पिकांसाठी 12 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

E Pik Pahani 2025

WhatsApp Group Join Now

E Pik Pahani 2025 खरीप 2025 पासून निर्णय लागू करण्यात आला आहे. यापूर्वी सहायकांना 5 रुपये प्रति ऑनर्स प्लॉट याप्रमाणे मानधन देण्यात येत होतं.

हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका,

E Pik Pahani 2025 सध्या केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या जमिनीची, पिकांची आणि लागवडीची माहिती जमा करण्यात येत आहे. यामध्ये पिकांची माहिती गोळा करण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत पीक पाहणी राबवण्यात येत आहे.

E Pik Pahani 2025 डीसीएस मोबाईल ॲपचा वापर करण्यात येतो. या ॲपवर पहिल्यांदा शेतकरी माहिती भरून पीक पाहणी करतात. परंतु विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांना एपीक पाहणी करता येत नाही.

WhatsApp Group Join Now

त्यामुळे अशा शेतकऱ्यांची पीक पाहणी तालुका स्तरावर नेमलेल्या तलाठी सहाय्यका कडून करून घेण्यात येते. यात सहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पिक पाहणी नसेल तर शेतकऱ्यांना विविध लाभांपासून वंचित राहावं लागतं. तसेच पिकांची अचूक माहिती न मिळाल्यामुळे राज्य सरकारकडे आकडेवारी अचूक उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची एक पाहणी पूर्ण व्हावी आणि ॲग्री स्टॅक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारने सहाय्यकांच्या मानधनात वाढ केली आहे.

E Pik Pahani 2025 दरम्यान 15 एप्रिल 2025 रोजी सचिवांच्या अध्यक्षतेखाली ॲग्री स्टॅग प्रकल्प सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहायकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने आता शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment