E-Pik Pahani 2025 कुसुर : कराड तालुक्यातील कोळे वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. या नुकसान भरपाईसाठी वन विभाग सज्ज आहे.

मात्र, ई-पिक नोंदणी अभावी महसूल विभागाकडून उदासीन आत्ता दिसून येत आहे. परिणामी, नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
कोळे वन परिक्षेत्रातील तारूख, कुसूर परिसरात अनेक शेतकऱ्यांचे शाळू, मका पिकांचे रानडुकरांकडून मोठे नुकसान करण्यात आले आहे.हातात-तोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पिकांचे वनविभागाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, ई-पिक नोंदणी नसल्याने महसूल विभागाकडून पंचनाम्यावर सही करण्यास मज्जाव केला जात आहे.
त्यामुळे नुकसान होऊन ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी अगोदर कबाड कष्ट करून शेती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नुकसान झालेल्या पिकांचे वन विभागाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, ई-पिक नोंदणी नसल्याने महसूल विभागाकडून पंचनाम्यावर सही करण्यास मज्जाव केला जात आहे.
ग्रामीण भागामध्ये इंटरनेट अभावी अडचण
सध्या ग्रामीण भागात स्वतः ई-पिक नोंदणी करण्याइतपत शेतकरी सज्ञान दिसून येत नाहीत. परिणामी, ई-पिक नोंदणी करायची कोणी? हा प्रश्न निर्माण होतो. तर आजही इंटरनेटच्या जमान्यात अनेक ठिकाणी नेट नसल्याने नोंदणी कशी करायची? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात जावे लागते.
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत करा अर्ज…
तर लाभला मुकाल E-Pik Pahani 2025
शासनाने ई-पिक नोंदणी सक्तीची केली आहे. ई-पिक नोंदणी शिवाय शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही, असे महसूल विभागाकडून सांगण्यात येते. मात्र, याबाबत शेतकऱ्यांमध्ये कोणतीही जागृती केल्याचे दिसून येत नाही.
नुकसान झाल्यास सात दिवसांमध्ये पंचनामा आवश्यक
- वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास पंचनामा केल्यानंतर सात दिवसात अहवाल सादर करावा लागतो.
- मात्र, ई-पिक नोंदणी अभावी महसुल अधिकाऱ्यांकडून पंचनाम्यांवर सही करण्यास मज्जाव केल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले आहे. त्यासाठी पंचनामा वेळेत होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

जनजागृतीची गरज E-Pik Pahani 2025
- ई-पिक नोंदणी बाबत कृषी विभाग व महापूर विभागाकडून कोणतीही जागृती केल्याचे दिसून येत नाही.
- कृषी सहाय्यकाद्वारे नोंदणी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी कोणतीही कृती दिसून येत नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |