Dushkali Paristhiti 2025 जत तालुक्यातील पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. तलाव बंधारे, विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका आटल्या आहेत.

पाण्याअभावी डाळिंब बागातील झाडांची पाने झडून गेली असून फक्त फांद्या, खोडाचे सांगाडेच शिल्लक राहिले. शेतकरी बागा काढून टाकत आहेत.
मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करा आणि सव्वा तीन लाख रुपये मिळवा, पण ‘ही’ अट;
शेततळी, कूपनलिका खोदून उजाड फोंड्या माळरानावर बागा फुलविल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.

सध्या 15 गावांना ट्रॅक्टरने पाणीपुरवठा सुरू आहे. 21 गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विस्तारित म्हैसाळचे योजनेतून पाणी सोडण्याचे केवळ आश्वासन दिले जात आहे.
तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी कमी पडल्याने पुढील हंगामातील डाळिंबाच्या उत्पादनाबाबत शंका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
तालुक्यात 2012 ला दुष्काळ पडलेला होता. तेव्हा सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी 10 हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागांना सरकारी मदतीची गरज आहे.
Dushkali Paristhiti 2025 डाळिंब पिक विमा दुजाभाव
Dushkali Paristhiti 2025 तालुक्यात 2022-23 सालचा डाळिंब फळबाग पिक विमा ट्रिगरच्या निकषानुसार नुकसान भरपाई देताना दुजाभाव झाला आहे.
जत, शेगाव, डफळापुर, मुंचडी, कुंभारे, माडग्याळ, तिकोंडी या मंडलाला हेक्टरी 92 हजार 500 रुपये, तर उमदी, संख मंडलला केवळ 32 हजार 500 रुपये विमा मिळाला आहे.
“डाळिंब बागांना चार महिन्यापासून पाणी नाही. पाणी अभावी बागा वाढल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत. डाळिंब बागा जिवंत ठेवण्याची गरज आहे. सरकारने बागांना पाणी द्यावे. -लक्ष्मण कोळी डाळिंब बागायतदार”
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |