Dudh Anudan Yojana 2025 सांगली : राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी गायदूध अनुदान खरेदीवर प्रति लिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली.

त्यानुसार सांगली जिल्ह्यातील 5 कोटी 4 लाख 85 हजार 896 लिटर दुधाचे 35 कोटी 31 लाख 71 हजार 28 रुपयांचे अनुदान मंजूर आहे.
वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सहा कोटींचा निधी मंजूर’ नवीन शासन निर्णय वाचा सविस्तर;
पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झाले नाहीत. आर्थिक अडचणीतील शेतकरी शासनाच्या अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत.

गाय दुधाच्या दरात घसरण झाल्याने राज्य शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला होता. 11 जानेवारी ते 10 मार्च 2024 या दोन महिन्याच्या कालावधीसाठी हे अनुदान देण्यात आले आहे.
यासाठी शासनाच्या ॲपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती. पशुधन टॅगिंग असणे बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांची अडचण झाली होती.
म्हणून काही शेतकरी दुधाच्या अनुदानापासून वंचित राहिले पण ज्या दूध संघानी ऑनलाईन माहिती भरलेली आहे, त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Dudh Anudan Yojana 2025 ऑनलाइन माहिती न भरल्यामुळे ही अनुदानापासून शेतकरी वंचित :
- शासकीय अनुदान वेळेत मिळेल की, नाही याची खात्री नसल्यामुळे अनेक पशुपालकांनी पशुधनाचे टॅगिंग केले नाही.
- दूध संघ, डेअरी चालकांकडे अनुदानासाठी ऑनलाईन माहिती भरण्यासाठी पाठपुरावा केला नाही. म्हणूनही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
Dudh Anudan Yojana 2025 चारा, पशुखाद्याच्या वाढत्या खर्चामुळे अडचणी :
ज्वारीच्या कडबा, कडबा कुटींचे दर दुप्पट वाढले आहेत. सरकी पेंडच्या बॅगचा दर 1,700 रुपये असून, 34 रुपये किलो दराने विकली जाते. खापरी पेंडच्या बॅगचा दर 1,700 ते 2,900 रुपये असून, 30 ते 40 रुपये प्रति किलो भाव आहे. पशुखाद्यांच्या वाढत्या दरामुळे पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे.
“ अनुदानाच्या घोषणेनंतर 20 दिवसच पैसे मिळाले, त्यानंतर नाहीच शासनाने गाय दूध अनुदानाची घोषणा केल्यानंतर जून, जुलै 2024 या दोन महिन्याचे मिळाले. तेही 20 दिवसाचेच. खर्च परवडत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. – गणेश शिंत्रे, पशुपालक “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |