Dudh Anudan 2025 कोल्हापूर : राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात 785 कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात 339 कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत.

त्यामुळे ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यातील 435 कोटींचे अनुदान अजून प्रलंबित राहिले आहे. गेले वर्षभर दूध अनुदानाचे गुऱ्हाळ सुरू आहे. राज्यात गाईचे दूध उत्पादन वाढल्याने डिसेंबर 2023 पासून गाय दूध खरेदी करत संघांनी कपात केली होती.
पिकाच्या नुकसानीच्या भरपाई साठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन;
दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने 11 जानेवारी ते 10 मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति लिटर तीन रुपये अनुदान जाहीर केले.

हे अनुदान शेतकऱ्यांना वेळेत मिळाले. उन्हाळ्यातही दर वाढले नसल्याने शासनाने जुलै ते सप्टेंबर महिन्यातील दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
तोपर्यंत निवडणूक तोंडावर आल्याने नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देत असताना अनुदान सात रुपयांपर्यंत वाढवले; पण सहा-सात महिन्यांचा कालावधी संपला तरी जुलै ते सप्टेंबरचे अनुदान मिळाले नव्हते.
शासनाने अर्थसंकल्पात नोव्हेंबर पर्यंतचे अनुदान देण्यासाठी 785 कोटींची तरतूद केली; पण दुग्ध विभागाकडे 339 कोटींचे पाठवले.
यातून सप्टेंबर पर्यंतचे प्रलंबित 160 कोटी प्राधान्याने दिले जाणार आहे, उर्वरित 188 कोटी नोव्हेंबर पर्यंतचे दिले जाणार आहे; ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी 623 कोटी 85 लाखांची गरज असल्याने अजून 435 कोटी द्यावे लागणार आहेत.
Dudh Anudan 2025 अनुदान असे मिळणार (कोटींत)
जिल्हा | अनुदान |
अभिनय नगर आहिल्या नगर | 221 |
पुणे | 185 |
सोलापूर | 118 |
सांगली | 75 |
कोल्हापूर | 52 |
सातारा | 44 |
नाशिक | 29 |
संभाजीनगर | 24 |
धाराशिव | 16 |
बीड | 11 |
जळगाव | 9 |
नागपूर | 1 |
धुळे | 1 |
लातूर | 0.71 |
बुलढाणा | 0.65 |
जालना | 0.58 |
अमरावती | 0.46 |
भंडारा | 0.45 |
वर्धा | 0.13 |
नांदेड | 0.09 |
परभणी | 0.05 |
” ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यातील 188 कोटी यातून दिले जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना या महिन्याअखेर अनुदान वितरित करण्याचा प्रयत्न आहे.- प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्ध व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |