Dudal Gai Mhashi Yojana 2025 पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशीचे अनुसूचित जाती/जमातीचा लाभार्थींना वाटप करणे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

WhatsApp Group
Join Now
महत्त्वाचे
लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
राज्यात ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता!
Dudal Gai Mhashi Yojana 2025 लाभार्थी निवडीचे निकष
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
- अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
- महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील)

WhatsApp Group
Join Now
योजनेसाठी अर्थसहाय्य
अ) गाईसाठी
| बाब | 2 जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
| संकरित गाईचा गट – प्रति गाय रु. 70,000/- प्रमाणे | 1, 40, 000 |
| 10.20 टक्के (अधिक 18 टक्के सेवाकर) दराने 3 वर्षाचा विमा | 16,850 |
| एकूण प्रकल्प किंमत | 1,56,850 |
ब) म्हशीसाठी
| बाब | 2 जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
| म्हशीचा गट – प्रति म्हैस रु. 80,000/- प्रमाणे | 1,60,000 |
| टक्के अधिक टक्के सेवा कर दराने तीन वर्षाचा विमा | 19,258 |
| एकूण प्रकल्प किंमत | 1,79,258 |
Dudal Gai Mhashi Yojana 2025 एकूण गटाच्या किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालील प्रमाणे
| गट | गाय |
| प्रवर्ग | शासकीय अनुदान अनुसूचित जाती 75 टक्के |
| दोन जनावरांचा गट (रक्कम रुपयात) | 1,34,443 |
| गट | म्हशी |
| प्रवर्ग | शासकीय अनुदान अनुसूचित जाती 75 टक्के |
| दोन जनावरांचा गट (रक्कम रुपयात) | 1,34,443 |
Dudal Gai Mhashi Yojana 2025 अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य).
- सातबारा (अनिवार्य).
- 8 अ उतारा (अनिवार्य).
- अपत्य दाखल (अनिवार्य)/ स्वयंघोषणा पत्र.
- आधार कार्ड (अनिवार्य).
- रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य).
- बँक खाते पासबुक सत्यप्रत (अनिवार्य).
- रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल (अनिवार्य).
- 7-12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्त्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य).
- अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य).
- दारिद्र्य रेषेखालील दारिद्र्य असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य).
- दिव्यांग असल्यास दाखल (असल्यास अनिवार्य).
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकचे पहिल्या पानाचे साक्षांकित प्रत.
- वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत.
- शैक्षणिक पात्रतेचा दाखल दाखला.
- रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डचे सत्यप्रत.
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणाची छायांकित प्रत.
अर्ज करण्याची कालावधी
02 मे ते 01 जून 2025.
अर्ज कसा कराल?
- खाली दिलेल्या अधिकृत लिंक किंवा गुगल प्लेस्टोअर वरून AH-MAHABMS मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
- टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करा.
- नंतर अर्जदार आवश्यक माहिती भरून नोंदणी करू शकतो.
| अधिकृत लिंक | https://ah.mahabms.com/ |
| संपर्क | पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कॉल सेंटर संपर्क 1962 ( 7 am to 6 pm) |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |