Drone For Farming 2025 नाशिक: जिल्ह्यातील क्षेत्रात (एग्रीकल्चर डिपार्टमेंट) आता आधुनिक तंत्रज्ञानाची लाट आली असून, ड्रोन ची शेती ही त्यातील एक क्रांतिकारी संकल्पना ठरत आहे.

पारंपारिक औषध फवारणी व खते छिपणीसाठी त्या ठिकाणी अधिक श्रम आणि वेळ लागतो, तिथे आता ड्रोनचा वापर करून अचूक आणि जलद शेती करणे शक्य झाले आहे.
राज्याच्या हवामानात मोठे बदल; पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस!
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची भर घालणारे ‘ड्रोन शेती’ ही संकल्पना आता नाशिक जिल्ह्यात वेगाने रुजत आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक आरक्षण आणि अचूक असा हा पर्याय ,अनेक तरुण व प्रगतशील शेतकऱ्यांनी या नवकल्पनेला प्रकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ड्रोन शेती म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर खते व कीटकनाशके फवारणी, सर्वेक्षण करणे,जमिनीचे मोजमाप करणे, अशी कामे केली जातात. या पद्धतीत अचूक आणि सम प्रमाणातील फवारणी मुळे उत्पादनाचा दर्जा टिकतो आणि खर्चात मोठी बचत होते.
Drone For Farming 2025 विषारी औषधांपासून सुरक्षितता
ड्रोन शेतीचे स्वरूप अत्यंत सोपे असून, यामध्ये जीपीएस यंत्र नाही यंत्रणेसह उडणाऱ्या ड्रोन द्वारे पिकांवर हवे तेवढे औषध मोजके पणे फवारता येते त्यामुळे औषध तुमचा अपव्यय होत नाही, वेळ व मजुरीची बचत होते. शिवाय शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून सुरक्षितता ही मिळते.
या तालुक्यात होतो उपयोग
Drone For Farming 2025 पिंपळगाव बसवंतसह निफाड तालुक्यातील शेतकरी ड्रोन शेतीचा अवलंब करत आहेत. टोमॅटो आणि मका पिकांमध्ये ड्रोनच्या मदतीने औषधे व जैविक खते फवारले जातात. ड्रोन शेतीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना मदत होत आहे. उत्पादनात वाढ होत असल्याने तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
Drone For Farming 2025 ड्रोन वापरण्याचे फायदे!
- एक एकर वर अवघ्या 7-8 मिनिटात फवारणी.
- औषधाचा अचूक वापर आणि कमी अपव्यय.
- शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचतो ठीक वाढीवर नियमित नजर ठेवण्यास मदत.
- ड्रोन वापरण्याच्या टिप्स प्रशिक्षित ऑपरेटर करूनच ड्रोन चालवावा.
- फवारणी साठी योग्य हवामान निवडावे. पीक प्रकारानुसार औषधाचे प्रमाण निश्चित करावे.
- ड्रोनचे प्रशिक्षित व मेंटेनन्स आवश्यक आहे.
- शेताच्या क्षेत्रानुसार योग्य क्षमतेचा ड्रोन निवडावा.
ड्रोनच्या साह्याने आम्ही 10 एकर टोमॅटो व 25 एकर मका पिकावर औषध फवारणी करतो. शासनाकडून मिळणाऱ्या 50% सबसिडीमुळे ड्रोन खरेदी सुलभ झाली आहे. भाडे तत्वावर 500 रुपये प्रती एकर दराने याचा चांगला उपयोग करता येतो. 1 एकरसाठी केवळ 40 लिटर पाण्याची गरज असते. मजुरी व अन्य खर्चात बचत होत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांचा कल ड्रोन शेतीकडे वाढेल, अशी खात्री आहे.
-समाधान साठे, शेतकरी, पालखेड मिरची, पिंपळगाव बसवंत
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |