द्राक्षबागेत फळछाटणीपूर्वी करावयाच्या उपाययोजना!! Draksh Pik 2025

Draksh Pik 2025 द्राक्षबागेत सध्या काडी पक्व झाली असून बागेची फळछाटणी करून घेण्याची कामे सुरु झाली आहेत. तसेच द्राक्ष क्षेत्रात पाऊस व ऊन या दोन्हीचे आलटून पालटून चक्र चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखून काडीमध्ये सशक्त घड निर्मिती करून घेण्यासाठी फळछाटणीपूर्वी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्धल थोडे जाणून घेऊ.

Draksh Pik 2025

बोद मोकळे करून घेणे: Draksh Pik 2025 बाग छाटणीपूर्वी कमीत कमी 25 ते 30 दिवस आधी बोदातील माती कुदळीने मोकळी करून घ्यावी. यामुळे बोदावर टाकलेले शेणखत मातीत मिसळते व जुनी मुळी तुटल्याने नवीन पांढरी मुळी फुटण्यास मदत होते. तसेच मुळांजवळ हवा खेळती राहते.

कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ, वाचा सविस्तर;

मुळांच्या वाढीसाठी संजीवकांचा वापर: Draksh Pik 2025

द्राक्ष बागेची छाटणी करण्यापूर्वी पांढऱ्या मुळीचा विकास करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच घडाचा विकास चांगल्याप्रकारे होण्यासाठी मुळी व्यवस्थितरित्या कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. द्राक्ष बाग छाटणी पूर्वी 8 ते 10 दिवस पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी ह्युमिक ऍसिड, अमिनो ऍसिड, पोटॅशियम ह्युमेट इ. संजीवकांचा वापर करावा. उदा. ह्युमीफोर, रूटशाईन, हंस, फुलविलाईट, इ. तसेच स्फुरदाची उपलब्धता वेलीस हळूहळू होत असल्याने छाटणीपूर्वी 10 ते 12 दिवस आधी एसएसपी किंवा ड्रिपमधून फॉस्फरिक ऍसिड द्यावे. पूर्वी जमिनीचे ॲसिडीफिकेशन करावे. ज्यामुळे सर्व मूलद्रव्य योग्य प्रमाणात उपलब्ध होतील. यासाठी बेसल डोस मधून गंधक पावडर व ड्रीप मधून विद्राव्य गंधकाचा एकरी 3 किलो याप्रमाणे 5 दिवसांच्या अंतराने 2 वेळा वापर करावा.

WhatsApp Group Join Now

एप्रिल छाटणी वेळी सर्व व्यवस्थापन जरी व्यवस्थित असले तरी ऑक्टोबर छाटणी वेळी पांढऱ्या मुळीची विकास व्यवस्थित झाला नसल्यास गोळी घड, घड पांढरे पडणे, फुटेंची जोम कमी मिळणे, वेली रोगास बळी पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पांढरे मुळी सतत कार्यरत राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले तरच द्राक्ष बागेचे अपेक्षित व दर्जेदार उत्पादन मिळेल.

द्राक्ष बाग फुटण्यासाठी स्फुरद, पालाश, कॅल्शियम व नत्राची गरज मोठ्या प्रमाणावर असते. त्यासाठी बेसल डोस मध्ये योग्य ते नियोजन करावे बेसल डोस छाटणीच्या 8 ते 10 दिवस आधी द्यावा.

द्राक्ष बागेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सिलिकॉन हे मूलद्रव्य महत्त्वाचे कार्य करते द्राक्ष वेलीला ऑर्थो व पॉलिसिलिसिक ऍसिड स्वरूपात सिलिकॉन उपलब्ध करून देण्यासाठी एस.आर.पी.-9 चा वापर एकरी 18 किलो दोन टप्प्यात पुढील प्रमाणे करावा बाग छाटताना बेसल डोस मधून 9 किलो व द्राक्ष मण्यांत पाणी फिरताना पोटॅशियम सोबत 9 किलो द्यावे.

एस.आर.पी.-9 मुळे जमिनीतील स्थिर म्हणजेच अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद व पालाश द्राक्ष वेलीस उपलब्ध होण्यास मदत होईल. संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, ज्या पिकांना सिलिकॉन दिले जाते, त्या पिकांचे रोग व किडींना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते व पिकांच्या वजन व गुणवत्तेत वाढ होते. एस.आर.पी.-9 प्रमाणे एसआरपी हे पावडर स्वरूपातील सिलिकॉन मिनरल फवारणीद्वारे वापरल्यास द्राक्ष वेलीच्या रोग व कीड प्रतिकारक शक्तीत वाढ होते.

सिलिकॉन या मूलद्रव्याप्रमाणेच कॅल्शियम सुद्धा पिकाच्या रोगप्रतिकारशक्ती मध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. द्राक्ष वेलीस ऑरगॅनिक कॅल्शियमचा पुरवठा करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कायटोसांवर आधारित या प्रतिजैविकाचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतात.

WhatsApp Group Join Now

बागेतील नवीन फुटी: Draksh Pik 2025

द्राक्ष बागेमध्ये यापूर्वी झालेल्या पावसामुळे नवीन फुटींचा जन्म वाढलेला दिसून येईल पावसाळी वातावरणामुळे आद्रतेचे प्रमाण वाढल्याने या फुटींवर डावणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. अशावेळी या फुटी तशाच राहू दिल्यास नवीन फुटींवर रोगाचा प्रादुर्भाव वाढेल तसेच काडीतील अन्नसाठा संपेल त्यामुळे फळ छाटणी पूर्वी अशा फुटी काढून टाकाव्यात म्हणजेच खुडा अवस्थेपूर्वीच खुडून टाकावा.

काडीवरील जून पानांवर तांबेरा, डावणी, भुरी व करपा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पानगळ करेपर्यंत बाग निकोप रहावी यासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या वेळच्यावेळी घ्याव्यात. म्हणजे बागेतच रोवकारक बीजाणूंच्या वाढीस अटकावून छाटणीनंतर रोगाचे प्राबल्य कमी होण्यास तसेच बुरशीनाशकाच्या फवारण्या कमी करण्यास मदत होईल.

छाटणीपूर्वी पानांवरील डावणी व भुरी रोगांच्या प्रतिबंधासाठी स्ट्रॉबीलीन व ऍझोक्सीस्ट्रॉबीलीन ग्रुपमधील आंतरप्रवाही औषधांचा वापर करीत असताना आपण कोणत्या ग्रुपमधील औषधांचा वापर करत आहोत. त्याचा द्राक्षवेलीवर व डावनीच्या बुरशीवर होणार परिणाम कसा आहे, याकडे विशेषशकरून लक्ष द्यावे. बऱ्याचवेळा अजाणतेपणे किंवा अनावधानाने एकाच ग्रुपमधील औषधांचा वापर पुन्हापुन्हा होण्याचा संभव असतो. त्यामुळे फवारणीवेळी औषधांची पूर्णपणे माहिती घेऊनच वापर करावा.

पोंगा अवस्थेमध्ये पाऊस सुरू असल्यास धुरळणीवर विशषत्वाने लक्ष द्यावे. धुरळणी सकाळी लवकर व सूर्यप्रकाश पडण्यापूर्वी घ्यावी. म्हणजे पोंग्यातील पाणी वेलीमध्ये शोषण होण्यापूर्वी व सूर्यप्रकाशाने पाण्याचे बाष्पीभवन होण्यापूर्वी धुरळणी घ्या. धुरळणीसाठी एम-45 झेड-78 एसआरपी, सीओसी चा वापर करा.

धुरळणीसाठी वापरण्यात येणारे पावडर पूर्णपणे बाष्परहित असेल याची काळजी घ्या. नुसत्या रोगप्रतिबंधक बुरशीनाशकांवर भर न देता वेलीस आवश्यक ती मूलद्रव्य पुरविण्यावर भर द्या. तसेच, बागेत व बागेभोवती स्वच्छता ठेवावी डावणीग्रस्त प्लॉट शेजारी असल्यास त्या बाजूने बीजाणूंचा प्रसार होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. उदा. शेडनेट दुहेरी करून प्लास्टिक पेपरमध्ये टाकून बागेच्या उंचीच्या वर 4 ते 5 फूट व जमिनीपर्यंत बांधून घ्या.

द्राक्षबागेची पानगळ करून घेणे:

Draksh Pik 2025 फळ छाटणीपूर्वी काडीवरील डोळे फुगलेले असणे आवश्यक आहे यासाठी वेलीची पानगळ करून घेणे गरजेचे आहे. यामुळे काडीवरील डोळे उन्हात येऊन फुगतात व यानंतर 8 ते 10 दिवसात डोळा फुटतो याला पोंगा अवस्था असे म्हणतात. बागेमध्ये फळ छाटणीच्या 10 ते 12 दिवस आधी पानवळ करून घ्यावी किंवा ज्या बागांमध्ये निम्यापेक्षा जास्त पानगळ झाली असेल, अशा ठिकाणी 4 ते 5 दिवस आधी पानगळ करून घ्यावी.

पानवळ ही मजुरांकडून हाताने किंवा रासायनिक फवारणी द्वारे करावी. रासायनिक फवारणीसाठी इथ्रेल 12:61:00 व चा वापर करावा. हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यास व पाऊस सुरू असल्यास या फवारणीचा हवा तसा परिणाम मिळत नाही त्याकरिता मजुरांकडून छाटणी आधी 4 ते 5 दिवस आधी पानगळ करून घेणे फायद्याचे ठरते भाग एकसारखे फुटण्यासाठी संपूर्ण बागेची एकावेळी पानगळ करून घेणे आवश्यक आहे. अर्धवट पानगळ झालेल्या बागेत इथ्रेल चा वापर करू नये.

रोग नियंत्रण व बुरशीनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी:

Draksh Pik 2025 द्राक्ष बागेत पावसामुळे आद्रतेचे प्रमाण वाढते व असे वातावरण विविध रोगांच्या प्रसारासाठी अनुकूल असते. त्यामुळे बागेत विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच पानगळी वेळी विविध रोगांचे जिवाणू पानांसोबत जमिनीवर पडतात व वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्यास झपाट्याने वाढतात. त्यामुळे पानगळ झाल्यानंतर रोगप्रसार रोखण्यासाठी काड्या, ओलांडे, व खोडे बोर्डो चा वापर करू शकता.

वेली बरोबर जमिनीवर बोदावरसुद्धा बोर्डाची फवारणी करून घेतल्यास रोगाच्या प्रसारास अटकाव होतो. बागेमध्ये छाटणी नंतर पहिले 30 दिवस बुरशीनाशकांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी. यामध्ये मुख्यत्वे करून डावणीसाठी फवारणी करताना डावणीला प्रतिकारक्षम अशा बुरशीनाशकांचा वापर करणे हितावह ठरते. कारण डावणीच्या बुरशीमध्ये बुरशीनाशकाविरुद्ध लवकर प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता आहे.

छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या:

Draksh Pik 2025 फळ छाटणी झाल्यानंतर साधारणता 11 ते 13 दिवसां दरम्यान बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या आढळून येते ही समस्या मुखत्वे करून वेलीमध्ये जिब्रेलिन्सची पातळी वाढल्यामुळे व सायटोकायनिन कमी झाल्यामुळे निर्माण होते. अशावेळी सायटोकायनिन यांची पातळी वाढवणाऱ्या संजीवकांची फवारणी घेणे हितावह ठरते. उदा. एक्स्पो, सीझर. बागेमध्ये मुळाभोवती हवा खेळती राहील व पाणी साठवून राहणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच वेलीस स्फुरद व पालाशची आवश्यक मात्रा द्यावी.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment