सांगली भागात द्राक्षाच्या खरड छाटणीला सुरुवात; एकरी किती येतोय खर्च? Draksh Chatani 2025

Draksh Chatani 2025 घाटनांद्रे : कवठेमंकाळ तालुक्यातील द्राक्ष हंगाम हा अगदी अंतिम टप्प्यात आला असून, उर्वरित द्राक्ष माल हे देण्याचीही बळीराजाची गडबड घाई सुरू आहे.

Draksh Chatani 2025

या द्राक्ष हंगामानंतर आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना छाटणीसाठी ही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. संपूर्ण तालुक्यात द्राक्ष पिकाचे सुमारे 378376 हेक्टर इतके द्राक्ष क्षेत्र आहे. केवळ घाट माथ्यावरील म्हणजे घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरातच 445.90 इतके द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे.

पांढऱ्या सोन्याला मिळाली झळाळी, ‘या’ बाजारात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर;

Draksh Chatani 2025 सध्या व्यापारी व दलाल यांच्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे होणारी फसवणूक, मिळणारा कमी दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडेच लक्ष केंद्रित केले आहे.

WhatsApp Group Join Now

यावर्षी द्राक्ष हंगामातील आर्थिक ताळेबंद बसवून शेतकरी सावरतोय तोच छाटणीसाठी शेतकऱ्यांना एकरी सुमारे 25 हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागणार आहे.

Draksh Chatani 2025 सध्याचा द्राक्ष छाटणीचा एकरी दर पुढील प्रमाणे

छाटणीस5,000
पेस्ट लावणे3,000
काडी निरळने4,000
पहिले सबकेन2,500
शेंडी मारणे2,000
पहिला खुडा3,000
दुसरा खुडा3,000
तिसरा खुडा2,500

असा एकूण 24,500 रुपये एक एकर बाग छाटणीसाठी खर्च येत आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment