Draksh Bajarbhav 2025 पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील द्राक्ष हंगाम मध्यान्हावर आला आहे. वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षामधील साखरेचे प्रमाण चांगले असल्याने गोडी वाढली आहे. यामुळे रसदार आणि गोड द्राक्षांची मागणी वाढली असून, मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे उपवास सोडण्यासाठी द्राक्षांची मागणी वाढल्याने दर देखील टिकून आहेत. अशी माहिती बाजार समितीमधील द्राक्षाचे आडतदार अरविंद मोरे यांनी दिली.

मोरे म्हणाले, ” यंदा द्राक्षाचा आगाप हंगामात द्राक्षाची आवक कमी राहीली. तर मुख्य हंगाम उशिरा सुरू झाल्याने द्राक्ष हंगाम आणखी एक दीड महिना सुरू राहील असा अंदाज आहे. बाजार समितीमध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, आणि सांगली भागातून विविध वाणांची आवक होत असते. यामध्ये सोनाका, सुपर सोनाका, थॉमसन, माणिकचमन, तास ए गणेश, आणि जम्बो वाणांचा समावेश आहे.
आनंदाची बातमी ! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
सध्या सरासरी रोज 15 ते 20 टन द्राक्षांची आवक होत असून, रविवारी ही आवक 30 टन एवढी असते. सध्या उन्हाचे प्रमाण चांगले असल्याने द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरली आहे. यामुळे द्राक्षांची गोडी वाढल्याने मागणी वाढली आहे. यामुळे दर टिकून आहेत. त्यातच रमजान महिन्यातील मुस्लिम बांधवांच्या उपवासामध्ये फळांचे प्रमाण अधिक असल्याने यात द्राक्षांचा मोठा समावेश असतो. यामुळे देखील मागणी वाढल्याने दर चांगले आहेत.

माझी 8 एकर जम्बो आणि 2 एकर क्रीमसन वाणांच्या द्राक्षांची लागवड होती. माझा हंगाम संपत आला असून, आणखी 8 दिवस हंगाम चालेल. यंदाच्या हंगामात बंगालदेश, दुबईसाठी 115 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळाला. तर युरोपसाठी 150 रुपये दर मिळाला. आता स्थानिक बाजारपेठेसाठी 70 ते 80 रुपये दर मिळत आहे. रमजान साठी बागवान खरेदी थेट करत आहेत.
Draksh Bajarbhav 2025 असे आहेत 10 किलोचे दर…
सुपर सोनाका | 400-600 |
सोनाका | 450-600 |
थॉमसन | 400-500 |
माणिक चमन | 400-500 |
ताश ए गणेश | 400-600 |
जम्बो (काळी ) | 700-1100 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |