रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर…Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025 कवठेएकंद : कवठेएकंद (ता.तासगाव) परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एसएस जातीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे.

Draksh Bajarbhav 2025

दर वर्षी 150 ते 180 असणाऱ्या दर यंदा 220 ते 300 रुपये प्रति चार किलो पेटी असा दर मिळत आहे. मागील हंगामापेक्षा 60 ते 100 रुपये प्रति पेटी जादा दर मिळत आहेत. मात्र, आता द्राक्ष उत्पादन कमी राहिल्याने दर तेजीत आहेत.

यांना बहुतांश द्राक्ष पट्ट्यात आती पाऊस झाल्यामुळे फळधारणेवर परिणाम झाला होता. ते द्राक्ष घड जोपासणे हे शेतकऱ्यांसाठी आव्हान होते. त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादन कमी असल्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्ष दर तेजीत असल्याने त्याची गोडी अधिक वाढली आहे. द्राक्षांबरोबरच यंदा नव्या बेदाण्यालाही चांगला दर मिळत आहे.

रमजान महिना असल्याने द्राक्ष इतर फळे, तसेच बेदाणा, ड्रायफूट अशा पदार्थांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. तासगाव सांगलीतून मुंबई, गोवासह मुस्लिम राष्ट्रांमध्ये बेदाणा पाठवला जातो. त्यामुळे बेदाणा दर वधरला आहे.

उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची मागणी वाढली आहे. द्राक्षाची किरकोळ विक्री 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे होत आहे. मालाची प्रतवारी बघून कमीत कमी 60 ते 120 रुपये असा दर आहे.

मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल हवामान, वाचा सविस्तर

उन्हाळा वाढेल तसा हंगामाच्या शेवटी दराने थोडीफार उचल घेणार, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील आठवड्यात चंद्रकांत धोंडीराम नागजे यांच्या अनुष्का जातीच्या द्राक्षांना 290 रुपये प्रति पेटी असा दर मिळाला.

Draksh Bajarbhav 2025 सध्या द्राक्षांचा सध्याचा दर 180 ते 300 प्रति चार किलो पेटी आहे. तर मागील हंगामातील दर 100 ते 160 प्रति चार किलो पेटी असा होता. या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now

Draksh Bajarbhav 2025 काळात द्राक्षांना अधिक पसंती…

  • जिल्ह्यातील वाळवा, पलूस, विटा, तासगाव भागात काळ्या जातीच्या कृष्णा व ज्योती या व्हरायटी द्राक्षांची लागवड केली जाते.
  • यंदा काळ्या रंगाच्या द्राक्षांचा क्षेत्र कमी आहे.
  • काळ्या द्राक्षांचे दर 400 ते 450 प्रति चार किलो पेटी असा सुरू आहे.
  • बाजारपेठेत ग्राहकांकडून अशा द्राक्षांना अधिक पसंती आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment