द्राक्ष वेलींसाठी विश्रांती देणे का आवश्यक असते ? वाचा सविस्तर; Draksh Bag Vishranti 2025

Draksh Bag Vishranti 2025 द्राक्ष बाग विश्रांतीचा कालावधी म्हणजेच द्राक्ष बागेच्या नव्या हंगामाची सुरुवातच असते. वेलींच्या निरोगी वाढीसाठी, पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वेलींना विश्रांती देणे गरजेचे असते. द्राक्ष वेलींसाठी हा विश्रांतीचा काळ का आवश्यक असतो, याबाबत या लेखातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात…

Draksh Bag Vishranti 2025

WhatsApp Group Join Now

Draksh Bag Vishranti 2025 वेलीला विश्रांती देणे

  • गेल्या हंगामात चांगल्या प्रतीचे उत्पादन घेतलेले असल्यास काडीमधून अन्नद्रव्याचा ऱ्हास झालेला असेल.
  • साधारणतः 500 ग्रॅम वजनाच्या द्राक्ष घडाकरिता आठ ते दहा मिमी जाड काडीची गरज असते.

‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 105 कोटी रुपये आले वाचा शासन निर्णय;

  • या जाडीच्या काडीमध्ये घडाच्या विकासासाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये साठवून पुरवठा करण्याची क्षमता असते.
  • गेल्या हंगामात अशा प्रकारचा घड तयार झालेला असल्यास या वेळी त्या काडीची झीज झालेली असेल.
  • वेलीची ही झीज भरून निघण्यासाठी या वेळी खरड छाटणी पूर्वी वेलीला विश्रांती देणे महत्त्वाचे असते.

  • Draksh Bag Vishranti 2025 विश्रांतीचा कालावधी म्हणजे नुसतीच विश्रांती इतका त्याचा अर्थ नसतो.
  • तर वेलीला थोड्याफार प्रमाणात नत्र, स्फ़ुरद आणि पाणी यांचा पुरवठा करणे गरजेचे असते.
  • वेलीला पाणी अशाप्रकारे द्यावी की वेलीची झालेली झीज फक्त भरून येईल.
  • पाण्याचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त झाल्यास नुसत्याच नवीन फुटी निघू लागतील.
  • यामुळे गाडीमध्ये जे काही अन्नद्रव्य शिल्लक राहिलेले असेल, तेही नवीन फुटी सोबत निघून जाईल.
  • Draksh Bag Vishranti 2025 विश्रांतीच्या काळात साधारणतः डीएपी (18-46-0) 15 ते 20 किलो किंवा युरिया 10 किलो प्रति एकर प्रमाणे दोन हप्त्यात विभागून द्यावे.
  • वेलीच्या विश्रांतीच्या कालावधी 20 ते 30 दिवस इतका असू शकेल.
  • किमान कालावधी फळ काढणीनंतर 15 दिवस इतका तरी असावा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment