Drainage of Soil Water to Improve Alkaline Soil 2025 मनुष्य व सजीवांसाठी जमीन, पाणी, वने ही नैसर्गिक साधन संपत्ती असून जसजसे लोकसंख्या वाढू लागली, तसतसा नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज लक्षात घेता पीक उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी जमीन सुपीक व उत्पादनक्षम असली पाहिजे. अशा जमिनीमध्ये हवा व पाणी यांचे प्रमाण 25% प्रत्येकी आणि सेंद्रिय पदार्थ 5% आणि खनिज पदार्थ 45 असावे लागते. हवा आणि पाणी यांचे प्रमाण योग्य प्रमाण राखण्यासाठी जमिनीतील पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे.

निचरा म्हणजे काय?
जमिनीतील पाण्याचे प्रमाण जलसंधारण शक्तीपेक्षा जास्त होते, आणि ते जास्त झालेले पाण्याचे प्रमाण कमी करणे यालाच जमिनीतून पाण्याचा निचरा करणे असे म्हणतात. पाण्याचा निचरा नैसर्गिक अथवा कृत्रिम रित्या करता येतो. बहुतांशज जमिनीत नैसर्गिक निचरा होण्याची क्षमता असते. परंतु, ज्या जमिनी नैसर्गिक निचरा होण्यास सक्षम नसतात. उदा. काळ्या जमिनी अशा वेळी मानवनिर्मित अथवा कृत्रिमरित्या पाण्याचा निचरा करण्याची आवश्यकता निर्माण होते.
जमिनीची मशागत नांगरटीचे महत्त्व!!
Drainage of Soil Water to Improve Alkaline Soil 2025 ज्या जमिनीसाठी जलसिंचनाची उपलब्धता असते किंवा जेथे पावसाचे पाणी तुंबून राहते अशा भागात किंवा जमिनीत मुख्यता जमिनीतील पाण्याचा निचरा याचा प्रश्न उद्भवतो. परिणामतः अशा जमिनीत नको असलेले अपायकारक क्षारांचे प्रमाण वाढते. तसेच जमिनी पाणथळ होतात आणि पीक उत्पादनात घट येते. म्हणून अशा जमिनीतून पाण्याचा निचरा करणे आवश्यक्य ठरते. तसेच, पावसाळ्यामध्ये सतत पाऊस पडल्यास काळ्या जमिनीमध्ये जास्त पाणी साठवून राहते त्यामुळे पीक पिवळे पडते.

जमिनीतील निचऱ्या मुळे होणारे फायदे!!
जमिनीत हवा खेळती राहते पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन जमिनीतील सूक्ष्म जिवाणू व गांडूळ यांना आवश्यक्य असणाऱ्या प्राणवायूंची निर्मिती होते.
जमिनीची चांगली मशागत लागवण आणि काढण्यासाठी जमिनीत आवश्यक्य असा चांगला ओलावा आखला जातो.
जमिनीची योग्य जडणघडण राखले जाते.
जमिनीतील तापमान वाढवून बीज रुजवण्याची प्रक्रिया चांगली होते आणि पीक वाढीस मदत होते.
जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते आणि सुपीकता टिकून राहते.
जमिनीची धूप कमी होते तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, आणि तणांचे नियंत्रण करण्यास मदत होते.
जास्त पाणी झाल्याने उद्भवणारे रोग नेत्रा पद्धतीने नियंत्रित होतात.
जमिनीतील अल्क व क्षारता नियंत्रित करण्यास मदत होते एकूणच जमिनीचे आरोग्य चांगले ठेवता येते.
Drainage of Soil Water to Improve Alkaline Soil 2025 पृष्ठभागावरील निचरा प्रणाली
जेथे नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नाही, आणि जमिनीतील पाण्याची पातळी जमिनीलगत आहे. तेथे नुकसान कारक क्षार जमिनीच्या खालच्या थरात जात नाहीत. त्यामुळे कृत्रिम रित्या निचरा करण्याची गरज भासते क्षारपळ जमिनी सुधारण्यासाठी ज्या निचऱ्या मुळे प्रणालीचा उपयोग करतात. त्यामध्ये प्रामुख्याने खोल उघड चर निचरा प्रणाली व बंदिस्त निचरा प्रणाली व विहिरींचा समावेश होतो.

खोल उघडे चर निचरा प्रणाली
जमिनीतील पाण्याच्या प्रवाहाची दिशा साधारणतः उंच भागाकडून सखल भागाकडे पाण्याचा प्रवाह वाहत जातो. त्यामुळे उताराला आडवे चर काढल्याने जास्त फायद्याचे ठरते.
दोन चरांमधील अंतर व खोली जमिनीचा प्रकार जडणघडण पाणी मुरण्याची क्षमता पाझराचा वेग इ. बाबींवर अवलंबून असते.
चरांचा आकार समलंब चौकोनाकृती असावा व बाजूंचा ढाळ चिकन मातीत1:1 तर मध्यम प्रकारात 1.5:1 ते 2:1, तर वायुकामय हलक्या जमिनीत 3:1 ठेवावा.
चरांचा शेवट नैसर्गिक ओढ्याला मोठ्याने आल्याला व नदीला करण्यासाठी आडवे चर उभ्या चरांचा जोडून घ्यावेत 0.10 % पर्यंत उतार द्यावा.
परंतु या चरांचा परिणामकारक कार्यरत घेण्यासाठी यात साचलेला गाळ वेळोवेळी काढून ते स्वच्छ ठेवणे फारच गरजेचे असते. शिवाय या चरांमुळे लागवडीखाली असणारे जमिनीचे क्षेत्र कमी होते.
Drainage of Soil Water to Improve Alkaline Soil 2025 बंदिस्त चर निचरा प्रणाली
खोल उघड्या चर प्रणाली सारखे यात चर प्रणालीमुळे लागवडीखालचे क्षेत्र कमी होत नाही. शिवाय यांना वारंवार साफ करावे लागत नाही. या बंदिस्त चरप्रणालीत स्वच्छिद्र पाईप प्रणाली व टाइल्स निचरा प्रणाली जमिनीखाली बसवलेले असते. टाइल्सच्या जोड्यांमधून व पाईपच्या छिद्रांतून क्षार आणि जादा असलेले पाणी जमिनीबाहेर काढले जाते.
प्रणालींचा आराखडा – यात प्रामुख्याने मुख्य नळ्या उपनळ्या इत्यादींचा समावेश होतो उपनद्या शेवट पाणी निगम स्थानात करावा प्रणालीचा आराखडा ठरवताना जमिनीची समस्या कोणत्या प्रकारची आहे ही बाब विचारात घ्यावी त्यानुसार हेरिंगबोन, इंटरसेप्टर, रॅंडम आणि ग्रिडीरॉन यापैकी निवड करावी.
प्रणालीत पाईपचा आकार ठरवताना एकूण क्षेत्र आणि एकूण क्षेत्रात पाझरामुळे आणि अन्य कारणामुळे एकत्रित होणारे पाण्याचे आकारमान विचारात घेणे आवश्यक आहे. जमिनीत पाझरणाऱ्या पाण्याचा प्रवाह व वेग या गोष्टींचा उपयोग नळ्या व उपनळ्या दिशा ठरवण्यासाठी होतो.
उपनळ्यांमधील अंतर आणि खोल – उपनळ्यांमधील अंतर ठरविताना जमिनीचा प्रकार जमिनीची जडणघडण पाणी मुरण्याची क्षमता बाजारचा वेग आणि जमिनीतील अभ्यद्य खडक, शहराची खोली जलसिंचनामुळे पावसामुळे जमिनीतील पाण्याचा पातळीत होणारी वाढ म्हणून जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म तपासणी करणे आवश्यक्य आहे. उपनळ्यांची खोली पिकाचा प्रकार जमिनीची पातळी सिंचनाच्या काळात पाणी मुरण्याची क्षमता व क्षाराची खोली इ.बाबींवर अवलंबून असते. यावर निगम स्थानाचा खोलीमुळे मर्यादा येऊ शकतात.
निगम पाईप – मुख्य नळीच्या शेवट निगम पाईप जोडावा पाईप धातूचा पीव्हीसी पाईप असावा त्याची लांबी 3 ते 4 मीटर असावी निगम पाईप ओघळीच्या व नाल्याच्या तळापासून कमीत कमी 30 ते 40 सेंटीमीटर उंच असावा व एक मीटर पर्यंत शेतात व इतर प्राण्यांचा प्रवेश रोखण्यासाठी एक पटल बसवावे.
जैविक पद्धतीने निचरा प्रणाली
जास्त पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत लवकर वाढ होणारी झाडे पिके लावावीत जेणेकरून अशी पिके जास्त प्रमाणात पाणी वाढीसाठी वापरतात. क्षारपड जमिनीत सुद्धा लवकर वाढणारी पिके लावावीत अशा जैविक पद्धतीने सुद्धा निचरा प्रणाली वापरतात. उदा. भात या पिकाची आणि निलगिरी वृक्षाची लागवड केल्यास जास्त पाणी शोषून घेतात.

जमिनीत पाण्याचा अतिवापर झाल्यास होणारे दुष्परिणाम
जमिनीत हवा खेळती राहत नाही तसेच पिकांच्या मुळांना आणि जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना आवश्यक्य असलेला प्राणवायू मिळत नाही पिकाची वाढ मंदावते तसेच पीक उत्पादनात घट येते.
बियाण्यांची रुजवण्याची क्रिया मंदावते रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
जमिनीत नत्राचा कार्यक्षम वापर होत नाही तसेच अनावश्यक क्षारांचे प्रमाण वाढून जमीन नापीक होण्याचा संभाव्य असतो.
पिकांच्या मुळांची वाढ खुंटून मुळांची पाणीधारण क्षमता कमी होते परिणामतः उत्पादनात घट होते, जमिनीची धूप होते.
जमिनीतील निचरा योग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
Drainage of Soil Water to Improve Alkaline Soil 2025 जमिनीतील पाणी जास्त दिवस साचून देणे किंवा शेतातील पिकांना जरुरीपेक्षा जास्त पाणी न देणे याकरिता शेतातील चाऱ्यांना किंवा पाटाला अस्तर करणे हा उपाय होय.
तसेच जमिनीत पाण्याचे प्रमाण एकदा वाढले की ते जमिनीच्या बाहेर काढून देण्याकरिता चर काढून त्याद्वारे पाण्याचा निचरा करणे.
पाणी साचून राहणाऱ्या जमिनीसाठी सुरुवातीपासूनच एकात्मिक पाणी व्यवस्थापन करावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |