शेतामध्ये दोडका लागवड करणार आहात ? पहा दोडका लागवड तंत्रज्ञान Dodka Lagwad 2025

Dodka Lagwad 2025 दोडक्याची भाजी दैनंदिन आहारात सर्वश्रुत आहे. ही भाजी निरोगी आहारासाठी प्रसिद्ध आहे. या भाजीत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ ‘ब’ व ‘क’ जीवनसत्वे, खनिज पदार्थ, कॅरोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह इत्यादी घटक आढळतात.

Dodka Lagwad 2025

WhatsApp Group Join Now

पचनास सुलभ, थंड अशी ही भाजी आहे. मधुमेही साठी आवश्यक असणाऱ्या कमी कॅलरीयुक्त आहार या भाजीचा समावेश होतो. कोवळ्या दोडका फळाच्या घराचा तसेच वरील शिरा व सालीचा भाजी म्हणून वापर केला जातो.

शास्त्रीय भाषेत या भाजीला लुफा अकूटांगूला असे संबोधतात. दोडक्याची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. समशीतोष्ण हवामानात हे पीक चांगले येते. हिवाळ्यात कमी तापमानात झाडाची वाढ खुंटते. थंड व कोरड्या हवामानात बुरी या रोगाचा फार प्रादुर्भाव होतो. खरिपातील लागवड जून-जुलै तर उन्हाळी लागवड जानेवारी – फेब्रुवारीमध्ये करतात. उष्ण आणि कोरड्या हवेमुळे फळधारणा कमी होते या पिकावर मावा आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.

प्रमुख जाती :

फुले सुचेता

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून निवड पद्धतीने विकसित केलेल्या फुले सुचेता या वाणाची 2001 सालापासून लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीची फळे सरळ असून शिरा आकर्षक लांब आणि गर्द हिरव्या रंगाच्या आहेत. खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी हा वाण चांगला आहे. सदर वाहनांची ताटी पद्धतीने नुसार लागवड केली असता हेक्टरी 119 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते फळांची लांबी सरासरी 33 सेंटीमीटर तर वजन 95 ग्रॅम आहे प्रत्येक वेळी सरासरी 18 ते 20 फळे लागतात.

पुसा नसदार

मध्य प्रदेशातील स्थानिक वाणातून विकसित केलेली ही जात आहे. प्रत्येक वेळेस 15 ते 20 फळे लागतात. ही जात 60 दिवसात फुलोऱ्यात होते.

WhatsApp Group Join Now

कोकण हरिता

कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून हा वाण विकसित झालेला आहे. या वाणाची फळे 30 ते 35 सेंटीमीटर लांब हिरवी आहे. या वाणाच्या प्रत्येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात.

सातपुतिया

बिहारमध्ये लावल्या जाणाऱ्या या एकमेव दोडक्याच्या जातीमध्ये नर आणि मादी फुल भिन्न नसते. म्हणजेच, या मानाचे फुल हे परिपूर्ण नर आणि मादी अशी दोन्ही लिंगे असणारे असते. अशी द्विलिंगी फुले पुंजक्यात येतात. फळे आकाराने छोटी असतात.

जमीन व पूर्व मशागत :

हलकी ते मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी निवडावी. पाणी धरून ठेवणारी, चोपण जमीन या पिकासाठी वापरू नये.जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. तिचा पोत चांगला असावा. पूर्व मशागत करताना जमीन उभी आडवी चांगली नांगरून घ्यावी व चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 ते 25 टन शेतात टाकावे आणि ते कुळवाच्या साह्याने चांगले मातीत मिसळून घ्यावेत. या पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ताटी पद्धतीचा अवलंब करावा.

लागवडीसाठी 1.5 मीटर अंतरावर 50 ते 60 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. जमिनीचा उतार पाहून 5 ते 6 मीटर अंतरावर पाणी देण्यासाठी आडवे पाट टाकावेत. राणबांधणी झाल्यानंतर रासायनिक खताच्या योग्य मात्रा बिया टोकण्यापूर्वी मातीत मिसळाव्यात.

सरीच्या बिया टोकताना एका बाजूस मध्यावर एका ठिकाणी दोन ते तीन वेळा टोकाव्यात व त्यानंतर हलके पाणी द्यावे.

बियाण्याचे प्रमाण व लागवडीचे अंतर :

दोडक्यासाठी हेक्टरी दोन ते तीन किलो बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी दोन सऱ्यातील अंतर 1.5 मीटर व दोन रोपांतील अंतर 1 मीटर ठेवावे.

शेतकऱ्यांनो अशी करा आंबा लागवड मिळवा दुप्पट उत्पादन; आंबा लागवडीबाबत संपूर्ण माहिती

खत व पाणी व्यवस्थापन :

भरखते व रासायनिक खते 50:50:50 किलो नत्र :स्फ़ुरद :पालाश प्रति हेक्टरी पूर्व मशागतीच्या वेळी म्हणजे लागवडीपूर्वी द्यावीत. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा व भर लावावी. पिकास पाण्याचा ताण बसणार नाही, अशा पद्धतीने हंगामानुसार पाण्याचे योग्य नियोजन करावे. उन्हाळी पिकास दोन पाळयातील अंतर कमी ठेवावे व खरीप लागवडीस पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

आंतर मशागत :

बियांच्या उगवणीनंतर वेल 1 ते 1.5 महिन्यात ताटीवर पोहोचतात. त्यानंतर मुळाच्या सर्‍या मोडून वेल वरंब्यावर घ्यावेत. याच वेळी नत्राची अर्धी मात्रा द्यावी. दोन वरंब्याच्या मधील पट्टा चाळून घ्यावा. तने असतील तर खुरपणी करावी. दर दोन पाण्याच्या पाळयानंतर जमीन भुसभुशीत ठेवावी.

पिक संरक्षण :

दोडक्यावर केवडा, भुरी इत्यादी रोग तसेच फळमाशी, मावा, नागअळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो.

Leave a Comment