Dodka Cultivation 2025 दोडक्याची भाजी दैनंदिन आहारात सर्वश्रुत आहे. ही भाजी निरोगी आहारासाठी प्रसिद्ध आहे. या भाजीत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ, ब व क जीवनसत्वे, खनिज पदार्थ, कॅरोटीन ,कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, इ. घटक आढळतात.

Dodka Cultivation 2025 पचनास सुलभ थंड अशी ही भाजी आहे. कोवळ्या दोडका फळाच्या गराचा तसेच वरील शिरा व सालीचा भाजी म्हणून वापर केला जातो. शास्त्रीय भाषेत या भाजीला ‘लूफा अक्यूटांगूला’ असे संबोधतात. दोडक्याची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. समतोष्ण हवामानात हे पीक चांगले येते.
खरीप भुईमूग लागवड तंत्रज्ञान!!
Dodka Cultivation 2025 हिवाळ्यात कमी तापमानात झाडाची वाढ खुंटते. थंड व कोरड्या हवामानात भुऱ्या रोगाचा फार प्रादुर्भाव होतो. खरिपातील लागवड जून-जुलै तर उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करतात. उष्ण आणि कोरड्या हवेमुळे फळधारणा कमी होते. या पिकावर मावा आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.

Dodka Cultivation 2025 प्रमुख जाती
1.फुले सुचेता:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून निवड पद्धतीने विकसित केलेल्या फुले सुचेता या वाणाची 2001 सालापासून लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीची फळे सरळ असून शिरा आकर्षक लांब आणि गर्द हिरव्या रंगाच्या आहेत. खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी हा वाण चांगला आहे. सदर वाणाची ताटी पद्धतीनुसार लागवड केली असता, हेक्टरी 119 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. फळांची लांबी सरासरी 33 सेमी तर वजन 95 ग्रॅम आहे. प्रत्येक वेलीस सरासरी 18 ते 20 फळे लागतात.
2.पुसा नसदार:
मध्य प्रदेशातील स्थानिक वानातून विकसित केलेली ही जात आहे. या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट आहेत. प्रत्येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात ही जात 60 दिवसात फुलोऱ्यात येते.
3.कोकण हरीता:
कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून हे वाण विकसित झालेला आहे. या वानाची फळे 30 ते 35 सेमी लांब हिरवी आहेत. या वाणाची प्रत्येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात.

4.सातपूतीया:
बिहारमध्ये लावल्या जाणाऱ्या या एकमेव दोडक्याच्या जातीमध्ये नर आणि मादी फुल भिन्न असते. म्हणजेच या वाणाचे फुल हे परिपूर्ण नर आणि मादी अशी दोन्ही लिंगे असणाऱ्या असते अशी द्विलिंगी फुले पुंजक्यात येतात. फळे आकाराने छोटी असतात. बाजारामध्ये किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये विविध प्रकारचे सुधारित वाण आणि खाजगी कंपन्यांचे संकरित वाण उपलब्ध आहेत. आपल्या शेजारील शेतकरी किंवा नेहमी दोडका पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवावरून जातीची लागवडीसाठी निवड करावी.
Dodka Cultivation 2025 जमीन व पूर्वमशागत
हलकी ते मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी निवडावी. पाणी धरून ठेवणारे चोपण जमीन या पिकासाठी वापरू नये. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे, तिचा पोत चांगला असावा पूर्ण मशागत करताना जमीन उभी आडवी चांगली नांगरून घ्यावी व चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 ते 25 टन शेतात टाकावे आणि कुळव्याच्या सहाय्याने चांगले मातीत मिसळून घ्यावेत.
या पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ताटी पद्धतीचा अवलंब करावा. लागवडीसाठी 1.5 मीटर अंतरावर 50 ते 60 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाण्यात जमिनीचा उतार पाहून 5 ते 6 मीटर अंतरावर पाणी देण्यासाठी आडवे पाट टाकावीत रानबांधणी झाल्यानंतर रासायनिक खतांच्या योग्य मात्रा बिया टोकण्यापूर्वी मातीत मिसळाव्यात बिया टोकताना सरीच्या एका बाजूस मध्यावर एका ठिकाणी 2 ते 3 बिया टोकाव्यात व त्यानंतर हलके पाणी द्यावे.
बियाण्याचे प्रमाण व लागवडीचे अंतर
Dodka Cultivation 2025 दोडक्यासाठी हेक्टरी 2 ते 3 किलो बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी दोन सऱ्यांतील अंतर 1.5 मीटर व दोन रोपातील अंतर 1 मीटर ठेवावे.
खत व पाणी व्यवस्थापन
भरखते व रासायनिक खते 50:50:50 किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टरी पूर्व मशागतीच्या वेळी म्हणजे लागवडीपूर्वी द्यावीत. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. वर भर लावावी पिकास पाण्याचा ताण बसणार नाही अशा पद्धतीने हंगामानुसार पाण्याचे योग्य नियोजन करावे. उन्हाळी पिकास दोन पाण्याच्या पाण्यातील अंतर कमी ठेवावे तर खरीप लागवडीस पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

आंतर मशागत
Dodka Cultivation 2025 बियांच्या उगवणीनंतर वेल 1 ते 1.5 महिन्यात ताटीवर पोहोचतात त्यानंतर मूळच्या सऱ्या मोडून वेल वरंब्यावर घ्यावेत. याचवेळी नत्राची अर्धी मात्रा द्यावी दोन वरंबाच्या मधील पट्टा चाळून घ्यावा. तणे असतील तर खुरपणी करावी दर दोन पाण्याच्या पाळ्यानंतर जमीन भुसभुशीत ठेवावी.
पीक संरक्षण: दोडक्यावर केवडा भुरी इ. रोग तसेच फळमाशी मावा, नागअळी, इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो.
फळांची तोडणी प्रतवारी व पॅकिंग
Dodka Cultivation 2025 बियांच्या उगवणीनंतर 55 ते 60 दिवसात पहिला तोडा निघतो आणि त्यानंतर 3 ते 5 दिवसांच्या अंतराने तोडे होतात. कोवळ्या दोडक्यांना बाजारात चांगली मागणी असते. वेलींची चांगली निगा ठेवली तर 18 ते 20 फळे मिळू शकतात. फार कोवळी फळे तोडू नयेत. तोडणी नेहमी सकाळी 9 ते 10 च्या आत किंवा सायंकाळी करावी. फळे सावलीत ठेवावी किडकी जून आणि वाकडी फळे वेगळे करावेत. सरळ एकसारखे कोवळी फळे निवडावीत. अशा चांगल्या प्रतीच्या प्रतवारी केलेल्या फळांना बाजारभाव चांगला मिळतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |