सततच्या पावसामुळे कापूस पिकावर ‘मर’ रोगाची शक्यता; त्यासाठीचे उपाय!! Diseases of Cotton 2025

Diseases of Cotton 2025 सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडाने मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. हि आकस्मिक मर विकृती असून यामुळे प्रादुर्भाग्रस्त झाडे पूर्णता: वाळण्याची शक्यता असते.

Diseases of Cotton 2025

Diseases of Cotton 2025 जमिनीत वापसा नसल्यामुळे आकस्मिक मर प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण होत नाही. त्यामुळे झाडे कोमजतात. पाऊस पडल्यानंतर 36-48 तासात आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात.

बाजारात वाढली सोयाबीनची आवक कसा मिळतोय दर!!

Diseases of Cotton 2025 सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. सततच्या व मोठा पाऊस आणि जमिनीत वापसा नसणे व हवेतील आद्रता जास्त झाल्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसतात.

WhatsApp Group Join Now

तसेच सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये वाफसा परिस्थिती नसल्यामुळे कापसाच्या मुळांमध्ये बुरशीची वाढ होऊन रसवाहिनी बंद होऊ शकतात. यालाच बुरशीजन्य मर असे म्हणतात.

Diseases of Cotton 2025 उपाय:

Diseases of Cotton 2025 पाण्याचा निचरा करावा

शेतातील साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढावे.

Diseases of Cotton 2025 आळवणी:

प्रमाण प्रति 100 लिटर पाणी कॉपर ऑक्सीक्‍लोराईड 205 ग्रॅम + 2 किग्रॅ युरिया + 1 किग्रॅ पांढरा पोटॅश (00:00:50) 100 लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी फवारणी पंपाद्वारे आळवणी करावी. प्रत्येक प्रादुर्भावग्रस्त झाडास जवळपास 100 मीली द्रावण पडेल याप्रमाणे आळे/बांगडी पद्धतीने आळवणी करून झाडांच्या बुद्धांजवळील माती व्यवस्थित दाबून घ्यावी.

किंवा पोटॅशियम नायट्रेट हे (13:00:45) हे विद्राव्य खत 500 ग्रॅम + कोबाल्ट क्लोराइड 1 ग्रॅम यांचे 100 लिटर पाण्यात मिश्रण तयार करून द्रावणाची प्रती झाड 100 मिलि द्रावणाची आळवणी करावी. वरील प्रमाणे द्रावणाचे आळवणी म्हणजेच ड्रेचिंग करावी. फवारणी करू नये आवळणी न करता फवारणी केल्यास फायदा होणार नाही.

WhatsApp Group Join Now

Diseases of Cotton 2025 खोडजवळील माती दाबणे

पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास झुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास दोन पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.

जमिनीतील हवा खेळती ठेवणे

शेतजमीन वाफश्यावर आल्यानंतर हलकी अंतरमशागत करून कापसाच्या मुळांना हवा खेळती ठेवावी म्हणजे झाडे लवकर पूर्ववत होतील.

Diseases of Cotton 2025 वरील सर्व उपाययोजना कापसाच्या शेतामध्ये मर होत असलेले दिसताच त्वरित (24 ते 48 तासाच्या आत) कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. व्यवस्थापनास जेवढा उशीर होईल तेवढा फायदेशीर परिणाम कमी होईल.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment