जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा एक जैविक वरदान!! Disease Control 2025

Disease Control 2025 पीक संरक्षण व कृषी संवर्धन किंबहुना एकूण कृषी विकासाच्या दृष्टीने जैविक कीड व रोग व्यवस्थापन सारख्या संकल्पना अलीकडच्या काळात पुढे येऊ लागल्या आहेत. रासायनिक खताप्रमाणेच कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Disease Control 2025

Disease Control 2025 भाजीपाला, फळे व इतर पिकांना बुरशीचा व किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून रासायनिक बुरशीनाशके व कीटकनाशके वापरल्याने नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत होऊन एकूणच पर्यावरणास हानिकारक ठरतात.

बाजार तेजीत; हळदी उत्पादनात महाराष्ट्र अव्व्ल!!

Disease Control 2025 निसर्गाने स्वतःच अनेक गोष्टींचा समतोल साधण्याची व्यवस्था केली आहे. निसर्गामधील काही जैविक घटक यामध्ये विशेष महत्त्वाचे कार्य पार पाडतात. त्यामध्ये ट्रायकोडर्मा ही परोपजीवी, जमिनीत आढळणारी व इतर रोगकारक बुरशींचा नायनाट करते.

WhatsApp Group Join Now

Disease Control 2025 ती इतर रोगकारक बुरशीचे धागे नष्ट करून बीजाणू कमकुवत बनवते. त्यामुळे त्यांची गुणक्षमता कमी होऊन रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होते.

ट्रायकोडर्मा बुरशी जमीन/बियाणेद्वारा प्रसारित होणाऱ्या विविध रोगांचे नियंत्रण करते. फळबाग, भाजीपाला, कापूस, डाळी वर्ग, व गळीत धान्यावर येणाऱ्या मूळकूज/रोपे सडणे, मर व तत्सम रोगांचे नियंत्रण करते.

ट्रायकोडर्मा बुरशीचा शोध पसरवून या शास्त्रज्ञाने 1794 मध्ये लावला आणि भारतात ठाकूर नॉरीस यांनी 1928 साली मद्रास येथे जमिनीतून लावला.

Disease Control 2025 ट्रायकोडर्मा बुर्शीची शास्त्रीय माहिती पूर्वीप्रमाणे.

ट्रायकोडर्मा बुरशीच्या अनेक प्रजाती आहेत त्यापैकी ट्रायकोडर्मा हरजीएनम व आयकोडर्मा व्हिरीडी या दोन प्रजाती रोग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या आहेत. या बुरशीचे प्रयोग शाळेत संवर्धन करून शेतकऱ्यांना रोग नियंत्रणासाठी उपलब्ध होऊ शकते. ट्रायकोडर्मा बुरशी खालील जमिनीत वाढवणाऱ्या रोगावर बुरशीचे नियंत्रण करते.

WhatsApp Group Join Now

Disease Control 2025 जागा/अन्नासाठी स्पर्धा:

ट्रायकोडर्मा बुरशी जमिनीत वाढत असताना इतर रोगकारक बुरशी जागा अन्नासाठी स्पर्धा करते. शोषण करीत असल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्यांचे कमतरता येते. अन्न उपलब्ध न झाल्यामुळे रोगकारक बुरशी कमकुवत होऊन नाश पावतात. तसेच ट्रायकोडर्मा बुरशीचे कवकतंतू पिकांच्या मुळावर पातळ थरात वाढतात व त्या आवरणामुळे रोगकारक बुरशीचे कवकतंतू मुळांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

Disease Control 2025 परोपजीविकता:

ट्रायकोडर्मा ही परजीवी बुरशी असल्यामुळे जमिनीतील तंतुमय धागे रोगकारक बुरशीच्या धाग्यांमध्ये प्रवेश करतात, प्रवेश करण्याआधी रोगकारक बुरशीच्या धाग्याभवती ट्रायकोडर्मा तिच्या तंतुमय धाग्यांचा विळखा घालून रोगकारक बुरशी मधील अन्नद्रव्य शोषण घेऊन त्यांना कमकुवत बनवितात व त्याची वाढ रोखतात.

Antibiosis अँटीबायोसिस

ट्रायकोडर्मा बुरशी जमिनीत वाढत असताना काही रोग प्रतिकारके व जैव रसायनांची निर्मिती करते. त्यामुळे रोगकारक बुरशीच्या वाढीवर त्यांचा विपरीत परिणाम होऊन त्यांची वाढ थांबली जाते. उदा. ट्रायकोडर्मा ही परोपजीवी बुरशी जमिनीत ग्लायोटॉक्झीन यासारख्या प्रतिजैविक रसायनांचे स्त्रावण करते. त्यामुळे इतर रोगकारक बुरशींचा नायनाट होतो.

ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत:

बीजप्रक्रिया:

ट्रायकोडर्मा हि बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पद्धत म्हणजे बीजप्रक्रिया. पेरणीच्या वेळेस 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाणास ट्रायकोडर्मा पावडरची बीजप्रक्रिया करावी सर्व बियाण्यांवर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी व बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावे.

माती प्रक्रिया:

जमिनी मार्फत प्रसार होणाऱ्या रोगकारक बुरशीच्या नियंत्रणासाठी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून एक हेक्टर क्षेत्रात पसरून द्यावी व शक्य असल्यास पाणी द्यावे.

द्रावणात रोपे बुडविणे:

मिरची, वांगी, फुलकोबी, पानकोबी, इ. भाजीपाल्याची गादी वाफ्यावर रोपे तयार झाल्यावर लागवडीपूर्वी ट्रायकोड्रामाच्या द्रावणात बुडवावीत ट्रायकोडर्मा पावडर 500 ग्रॅम प्रति 5 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात रोपांची मुळे 5 मिनिटे बुडवावीत व नंतर त्यांची लागवड केल्यास फायदा होतो.

ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे:

  • नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर कसलाही विपरीत परिणाम होत नाही.
  • ट्रायकोडर्मामुळे रोगकारक करण्यात बुरशी मध्ये रोग पसरविण्याची क्षमता कमी करण्यास मदत होते.
  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन जमिनीचा पोत सुधारणास मदत होते.
  • बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता वाढून बिजांकुरण क्षमता वाढण्यास मदत होते.
  • हानिकारक व रोगकारक बुरशींचा नायनाट होतो.
  • पिकांचे संपूर्ण वाढीच्या काळात कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो.

ट्रायकोडर्मा बुरशीचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक बाबी

ट्रायकोडर्मा कार्यक्षमता वाढविण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात मिसळावे.

ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकीट द्रावण सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.

रासायनिक बुरशीनाशके लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडरची मात्रा दुप्पट लावावी.

ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम तसेच स्फुरद विरघळणारे जिवाणूंची व जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते. अशा प्रकारे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीचे एकात्मिक रोग व्यवस्थपणाचे मध्ये महत्वाचे स्थान आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment