पपई वरील रोग व कीड नियंत्रण!! Disease and Pest Control 2025

पपई वरील मोझॅक रोगाची लक्षणे:

Disease and Pest Control 2025 हा विषाणूजन्य रोग आहे. पानांच्या खालील बाजूस बारीक अनियमित गर्द हिरव्या रंगाच्या रेषा तयार होतात. अशा रेषा पानांवरील शिरांना लागून तयार होतात. नवीन पाने लहान तयार होतात पानांवर ठिकठीसाठी अर्धपारदर्शक असे तेलकट डाग दिसून येतात. पाने पिवळी पडतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव राहिल्यास पानगळ होते, केवळ शेंड्या कडे लहान पानांचा झुपका शिल्लक राहतो. रोगग्रस्त रोपांच्या खोडावर पिन पॉईंटच्या आकाराचे ठिपके पडतात.

Disease and Pest Control 2025

Disease and Pest Control 2025 हे ठिपके रेषा किंवा मोठ्या ठिपक्यात रूपांतरित होतात. अशाच रेषा किंवा ठिपके पानांच्या देठावर दिसून येतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पानांचे देठ खालील बाजूस जमिनीच्या दिशेने वाकतात. लहान किंवा 2 आठवड्यांच्या फळांवर रिंग स्पॉट तयार होतात.

राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?

संक्रमण: Disease and Pest Control 2025

पपईवरील मोजक वायरस हा मावा केडीद्वारे होतो मावा किडे पानांवर रस शोषून घेत असताना पाण्यात व्हायरस सोबत असते केवळ एक मावा गेट देखील रोगाचा प्रादुर्भाव करण्यास सक्षम असते मावा कीड हा रोग केवळ दहा सेकंदाच्या काळात संक्रमित करत असते पानांवर लक्षणे लागण झाल्यापासून 18 ते 2824 दिवसात दिसतात पपईवरील मोजक व्हायरस संक्रमित करणारे मावा कीड काकडी टरबूज कलिंगड व इतर वेलवर्गीय पिकांवर देखील उपजीविका करत असते.

WhatsApp Group Join Now

रोग नियंत्रण: Disease and Pest Control 2025

  1. मावा किडीमुळे रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून पपई लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजूस किंवा दोन रांगा मका, ज्वारी, यासारखी पिके लावावीत.
  2. ज्या वेळेस मावा कीड प्रथम मका किंवा ज्वारी पिकावर उपजीविका करेल त्यावेळेस त्यातील व्हायरस सदरील पिकात संक्रमित होऊन जाईल यानंतर जरी मावा किडीने पपईच्या पानांवर उपजीविका केले तरी पपई पिकावर व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होते किंवा अजिबात राहत नाही.
  3. प्रादुर्भाव ग्रस्त रोपांपासून नवीन रोपास त्वरित लागण होते. त्यामुळे अशी रोपे नष्ट करावीत, किंवा सर्व पाने काढून टाकावीत.
  4. पपईच्या शेताच्या जवळपास वेलवर्गीय पिकांची लागवड करू नये. मावा कीड नियंत्रणात ठेवावी.

पपई रिंग स्पॉट रोगाची लक्षणे:

व्हायरस ग्रस्त रोपांच्या पानाच्या कडा वरील बाजूस गोलसर वाकतात. पानांचा झुपका तयार होतो, तसेच पानांवरील शिरांच्या मधील भागात पानांवर फुगवटे तयार होतात. लागण झालेली पाने वजनाने हलकी असतात. व्हायरस ची लागण झाल्यानंतर हवामानानुसार 9 ते 39 दिवसात लक्षणे दिसून येतात. उन्हाळ्यात लागण झाल्यास 3 महिन्यांपर्यंत लक्षणे येत नाहीत. हिवाळ्यात लागण झाल्यास 6 आठवड्यात लक्षणे दिसून येतात. लागण झालेल्या खोडांवर तेलकट ठिपके दिसून येतात.

खोडावरील लक्षणे जमिनीपासून अर्ध्या भागापासून दिसून येतात. फळांवरील लक्षणे जास्त स्पष्ट असतात. फळांवर पिवळे ठिपके आणि पिवळ्या रंगाची रिंग पडते, आतील भाग हिरवा राहतो. पपई रिंग स्पॉट व्हायरसची लक्षणे हि जवळपास पपई मोझॅक व्हायरस सारखीच असतात. केवळ त्यांची तीव्रता कमी प्रमाणात असते.

संक्रमण: Disease and Pest Control 2025

पपई रिंग स्पॉट व्हायरसची लागण मावा किडीमुळे होते. मावा किड केवळ 2 मिनिटात लागण झालेल्या पानातून व्हायरस ग्रहण करू शकते त्यानंतर नवीन पानांवरील 5 मिनिटांच्या फीडिंग काळात ही कीड नवीन पानांवर लागण करू शकते. जर किडीने लागण झालेल्या पानातून व्हायरस ग्रहण केला तर त्यानंतर ती कीड केवळ एकदाच त्या व्हायरस चे संक्रमण करू शकते, त्यानंतर तो व्हायरस किडीमध्ये राहत नाही.

WhatsApp Group Join Now

रोग नियंत्रण: Disease and Pest Control 2025

  1. मावा किडीमुळे रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून, पपई लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजूस एक किंवा दोन ओळींमध्ये मका, ज्वारी यासारखे पिके लावावीत.
  2. ज्यावेळेस मावा किड प्रथम मका किंवा ज्वारी पिकावर उपजीविका करेल त्यावेळेस, त्यातील व्हायरस सदरील पिकात संक्रमित होऊन जाईल, यानंतर जरी मावा किडीने पपईच्या पानांवर उपजीविका केली तरी पपई पिकावर व्हायरस संक्रमित करण्याचे प्रमाण कमी होते, किंवा अजिबात राहत नाही.
  3. प्रादुर्भाव ग्रस्त रोपांपासून नवीन रोपांस त्वरित लागण होते, त्यामुळे अशी रोपे नष्ट करावेत किंवा सर्व पाने काढून टाकावेत.
  4. पपईच्या शेताच्या जवळपास वेलवर्गीय पिकांची लागवड करू नये. मावा कीड नियंत्रणात ठेवावी.
  5. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतात 15 दिवसाच्या अंतराने 10 मि.ली. डायमेथोएट प्रति 10 लिटर पाण्यातून फवारल्यास मावा किडीचे नियंत्रण होते.

अँथ्रॅक्नोजू रोगाची लक्षणे:

कोलेक्टॉट्रिकम ग्लोईओस्पोरिडिस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. पक्वतेकडे झुकलेल्या फळांवर गर्द रंगाचे ठिपके पडतात. हा रोग शक्यतो हिरव्या रंगाच्या फळांवर दिसून येत नाही, केवळ अर्ध पक्व झालेल्या फळांवर दिसून येतो. फळ पक्व होत असताना फळांवरील डाग देखील मोठे होतात. काढणी साठी सदरील फळे अयोग्य असतात. रोगाची बुरशी तळा कडील पानांच्या देठांवर देखील संक्रमित होते, ज्यामुळे पाने गाळून जातात. तसेच रोगाच्या पुढील प्रादुर्भावास चालना मिळते.

रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम 45 कॉपर ऑक्सिक्लोराईड कॉपर हायड्रोकसाईड, यापैकी एकाची 10 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस फवारणी घ्यावी.

पपई वरील काळे ठिपके:

हा रोग सरकोस्पोरा पपई या बुरशी मुले होतो. पानांवर करड्या तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. जास्त प्रमाणात संक्रमण असल्यास पपई ची रोगग्रस्त पाने पिवळी पडतात व सुकून जातात. फळांवर देखील ठिपके दिसून येतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम 45, सिनेब, कॅप्टन, कॉपर ऑक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रोकसाईड, यापैकी एकाची 10 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस फवारणी घ्यावी.

ड्राय रॉट रोगाची लक्षणे:

पपई ची फळे खोडांवर किंवा एकमेकांवर ज्यावेळेस घासली जातात, त्यावेळेस त्यास ईजा होते, अशा ठिकाणातून बुरशी फळात प्रवेश करते. बुरशीने प्रवेश केल्यानंतर फळांच्या देठाच्या जवळ संक्रमित होते, हा भाग काळसर नरम पडतो या रोगाच्या नियंत्रणासाठी ठराविक उपाययोजना ज्ञात नाहीत, तरी फळे देठा सकट काढली असता साठवणुकीत हा रोग जास्त पसरत नाही.

कॉलर रॉट रोगाची लक्षणे:

Disease and Pest Control 2025 हा रोग अनेक प्रकारच्या बुरशी मुळे होत असतो. या बुरशींमध्ये पिथियम अफिनिडमार्ट्स पिथियम अल्टियम फायोटप्थोरा पॅरासिटिका तसेच रायझॊक्टॉनिया स्पे. चा समावेश होतो.

रोगाची लक्षणे:

  • बुरशी जमिनीत राहते आणि कोवळ्या रोपांवर हल्ला करते. रोगाची लागण प्रामुख्याने उबदार आणि ओलसर वातावरणात जास्त प्रमाणात होते पाण्याच्या संतुलनात बिघाड झाल्यास देखील रोगाची त्वरित लागण होते.रोपांच्या खोडात पाणी जमा झाल्या सारखे ते नरम पडते व खोड खाली झुकून जाते, व मरून जाते.
  • रोग येवु नये म्हणून पिकास नियमित पाणी पुरवठा करावा, पाणी देताना खूप जास्त किंवा खूप कमी असा फरक अचानक करू नये.
  • रोप लागवड केल्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी बुरशीचा वापर करावा.
  • रासायनिक बुरशी नाशक वापरीत असल्यास ट्रायकोडर्मा चा वापर करू नये. या रोगाच्या प्रतीबंधासाठी ट्रॅकोडर्माचा वापर हा रासायनिक बुरशीनाशकांपेक्षा जास्त प्रभावशाली ठरतो.
  • रासायनिक बुरशीनाशके जमिनीत नष्ट होत असल्याने जास्त काळासाठी सैरक्षण प्रदान करू शकत नाहीत. मात्र ट्रायकोडर्मा बुरशीसाठी हि मर्यादा राहत नसल्याने जास्त काळ सौरक्षण मिळते. 30 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस ट्रायकोडर्माचा वापर करावा.

फायटोफथोरा ब्लाईट रोगाची लक्षणे:

पपई रोपाच्या खोडावर हा रोग प्रामुख्याने दिसून येतो जमिनीलगत खोडावरील भाग हलक्या रंगाचा होतो. जसे संक्रमण वाढत जाते तसे हि बुरशी संक्रमित भाग पूर्णपणे नष्ट करत जाते, ज्यामुळे त्या ठिकाणी खड्डा पडल्यासारखे किंवा हत्याराने इजा झाल्या सारखे भासते. जमिनी लगतच्या खोडाच्या भागास इजा झाल्याने झाडास अन्नपुरवठा नियमित होत नाही, ज्यामुळे झाड मरून जाते. फळधारणा झालेले किंवा मोठे झाड कोलमडून पडून जाते.

अशा झाडांना नवीन सशक्त फूट देखील येते. मात्र, पावसाळ्याच्या वातावरणात मरून जाते. फळांवर देखील हि बुरशी हल्ला करते. फळे आकुंचन पावतात, त्यांचा रंग गर्द तपकिरी होतो, अशी फळे तपकिरी काली होतात. बागेस पाणी देताना पाणी खोडास स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी. रोगाच्या प्रतिबंधासाठी डायथेन एम 45, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्सईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.

पपई वरील भुरी रोगाची लक्षणे:

हा रोग ओडियम कॅरीके या बुरशी मुळे होतो. बुरशी पानांच्या खालील बाजूस वाढते. पानांच्या खालील बाजूस पांढऱ्या रंगाचा पदार्थ दिसून येतो. रोगाच्या पारंभीक लक्षणांत पानांच्या वरील बाजूने पिवळसर किंवा हलक्या हिरव्या रंगाचे ठिपके दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास खोडावर देखील पांढऱ्या रंगाची बुरशी दिसून येते. रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल, टोपास, सल्फर, या पैकी एकाच वापर करावा.

पिठ्या ढेकूण: Disease and Pest Control 2025

या किडीचा प्रादुर्भाव पपईची पाने, खोड व फळांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भाव ग्रस्त पानावर काळी बुरशी वाढल्यामुळे अनिष्ट परिणाम होतो व फळे खाण्यास अयोग्य होतात.

उपाय:

प्रादुर्भावग्रस्त झाडे 5 % निंबोळी अर्क तसेच प्रोफेनोफॉस 50 इसी. 20 मि.ली. व बृप्रोफेझीन 25% प्रवाही 20 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा: Disease and Pest Control 2025

या किडी कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडाच्या कोवळ्या फांद्या सुकल्यासारख्या दिसतात वाढ थांबते व फुल गळ होऊन फळधारणेची क्षमता कमी होते. तसेच मावा कीड विषाणूजन्य रोगप्रसारास कारणीभूत असतात.

उपाय:

मावा किडीमुळे रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून, पपई लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजूस एक किंवा दोन रांगा मका, ज्वारी, यासारखी पिके लावावीत. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच 15 दिवसाच्या अंतराने 10 मि.ली. डायमिथोएट प्रति 10 लिटर पाण्यातून फवारल्यास मावा किडीचे नियंत्रण होते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment