चला जाऊया धूळपेरणीला! असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला! हिरव्या पिसांचा ध्यास सुधारणेला टिपूर मोत्यांची आस मोरणीला

Dhul Perani 2025 अर्धा मे महिना संपत आला होता. यात वाडी वाडीच्या गावपूजांचे कार्यक्रम आणि त्याला जोड म्हणून नमन, भजनाची डबलबारी, नाटके यांची नुसतीच रेलचे चालली होती. त्यात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडा केव्हा गेला ते कळलेसुद्धा नाही.
आधार कार्ड बँकेला लिंक नाही तर योजनेचे अनुदान मिळणार नाही, वाचा सविस्तर;
Dhul Perani 2025 चार दिवस चाकरमानांबरोबर आनंदात घालवलेल्या कोकणी शेतकऱ्याला आपल्या खरीतल्या, बावळीतल्या, मळ्यातल्या शेताची आठवण आली. त्यात आकाशात कार्यकाळ ढग पळताना दिसू लागले होते. म्हणजेच पावसाळ्याची चाहूल लागली होती.

Dhul Perani 2025 या आमच्या शेतकरी दादांनी कवळ तोडून, जमीन भाजून, मशागत करून, जमीन पेरणीसाठी स्वच्छ साफ करून ठेवलेली आहे. ते वाट बघत आहेत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याची.
कारण मे महिन्याच्या कडक उन्हात जमीन तापलेली असते. जमिनीला चांगली ऊब आलेली असते. त्यात थोड्याशा पावसाने शिडकावा केला की, हे आमचे शेतकरी दादा पूर्वीच्या काळी जोताने म्हणजेच औताने नांगरणी करायचे.
आता मात्र सर्वत्र छोटे नांगरणीचे ट्रॅक्टर आले आहेत. नांगरणी केल्यावर त्याला चांगले दोन-तीन दिवस कडक ऊन लागलं की, चांगला मुहूर्त बघून भाताची पेरणी करतात. यालाच धूळपेरणी (धुरळेवाफ) असे म्हणतात.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पेरण्या पूर्ण होतात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात यानंतर मिरगाच्या पावसाची वाट पाहिली जाते. हळूहळू पेरणीला दाढ त्याला कोंब येतात. त्याची छोटी छोटी रोपे तयार होते.
Dhul Perani 2025 त्याची काढणी केली जाते व पुन्हा त्याची चिखलात लावणी केली जाते आणि मग पुन्हा शेतीच्या कामांना सुरुवात होते. भातपेरणीच्या निमित्ताने जी पायाला, अंगाला, कपड्यांना, धूळ, माती, चिकल लागतो.
ती धूळ म्हणजेच शेती हा देशाचा कणा व प्रगतीचा पाया आहे, याची जाणीव करून देतात. या धूळपेरणीच्या निमित्ताने त्या कष्टाची जाणीव होणे हे महत्त्वाचे आहे. ज्याला या कष्टाची जाणीव झाली तो कधीच या शेतकऱ्याला कधीच विसरणार नाही.
धूळपेरणी म्हणजे बियाणे मातीमध्ये मिसळून पेरण्याची पद्धत जी विशेषतः पाऊस येण्यापूर्वी केली जाते. यात बियाणे मातीमध्ये मिसळून त्यावर मातीचा थर दिला जातो. त्यानंतर फळी फिरवली जाते.
या धूळपेरणीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अनुभव घ्यावा व त्यातील आनंद अनुभवावा मग काय? आपला ताण तणाव कुठल्या कुठे निघून जाईल.
शेतातील माती कपाळाला लावून. धन्यता मानावे म्हणजे आपला देश कृषी प्रधान असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटेल तर मग चला जाऊया धूळपेरणीला…
Dhul Perani 2025 धूळपेरणी म्हणजे काय?
खरीतील, तळीतील, वाफ्यातील, मळ्यातील जमीन थोड्याशा ओलाव्यावर नांगरली जाते. त्याला कडक ऊन लावले की, ती ढिकळ आलेली असते ती कुदळ फावडे किंवा ढेकळ्याने फोडले जातात. त्यामुळे अशी माती पिठूळलेली होते.
Dhul Perani 2025 तिची बारीक बारीक माती होते, त्यातून हात जरी फिरवला तरी सर्र्कन खाली पडते म्हणजे या मातीत बारीक धूळ होते. त्यात भाताचे धान्य पेरले की त्याला चांगली ऊब लागते त्यावर थोडासा जरी पाऊस पडला तरी त्याला चांगले कोंब येतात. मातीच्या धुळीत पेरणी केली जाते म्हणून याला ‘धूळपेरणी’ म्हणतात.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |