अखेर 20 हजार रुपयांचा धान बोनस आला, ‘या’ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार!! Dhan Bonus 2025

Dhan Bonus 2025 गोंदिया: राज्यातील महायुती सरकारने धान उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये दोन हेक्टर पर्यंत जाहीर केला होता. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धान्याची विक्री करणारे नोंदणीकृत 1 लाख 30 हजार शेतकरी पात्र ठरले होते.

Dhan Bonus 2025

Dhan Bonus 2025 शासनाने महिनाभरापूर्वी बोनस साठी 180 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यातून 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आली, तर 40 हजार शेतकरी निधीअभावी प्रतीक्षेत होते. यानंतर शासनाने गुरुवारी बोनस साठी 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

खरीप हंगामातील फुलझाडे!! 

शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी बोनस जाहीर केला जातो. गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुती सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस दोन हेक्टर पर्यंत जाहीर केला. पण या संबंधिताचे आदेश मार्च 2025 मध्ये निघाला तर बोनस साठी निधी उपलब्ध करून देण्यास जून महिना उगवला.

WhatsApp Group Join Now

Dhan Bonus 2025 जून महिन्यात शासनाने बोनससाठी गोंदिया जिल्ह्याला 180 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आदेशानंतर तब्बल तीन महिन्यांनी निधी उपलब्ध करून दिला. पण तेदेखील पूर्ण उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्यातील कोणासाठी पात्र ठरलेले 40 हजार शेतकरी 70 कोटी रुपयांच्या निधी अभावी बोनसच्या प्रतीक्षेत होते.

त्यानंतर शासनाने गुरुवारी बोनस साठी 70 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारपासून पैसे जमा केले जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले.

Dhan Bonus 2025 धान खरेदीला मुदतवाढ नाही

शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला 30 जुलै रोजी 94 हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले. पण खरेदीची मुदत 31 जुलै रोजी संपली पण शासनाने धान खरेदीला पुन्हा मुदतवाढ दिली नाही त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी बंद झाली. पावसाळा सुरू असल्याने धान खरेदीला आता पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment